पोस्ट्स

जानेवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

वृंदा भार्गवे यांच्या आदराप्रती एक पोस्ट. मी लिहिलेली नाही, एक पान संग्रहातून

इमेज
>> म. टा. विशेष प्रतिनिधी। नवी दिल्ली दुदैर्वाने अंधत्व लादले गेलेली सिद्धी देसाई आणि तिची आई सुस्मिता आयुष्यातल्या संघर्षाला ज्या धाडसाने सामोऱ्या गेल्या, त्यांच्या जीवनयात्रेवर लिहिलेली 'व्हाय नॉट आय' ही कादंबरी देशातल्या लाखोंच्या आयुष्यात प्रकाशाचे किरण पेरणारी, मायलेकींच्या उजेडयात्रेची लखलखती यशोगाथा आहे... पुस्तके अनेक लिहिली जातात, राष्ट्रपती भवनात त्याचे अर्पण सोहळेही होतात मात्र, सिद्धी आणि सुस्मिता यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा हा भावस्पशीर् सोहळा मन हेलावून टाकणारा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढले. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या गतवर्षाच्या महिला दिन विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या एका छोट्याशा संघर्षकथेतून जन्मलेली 'व्हाय नॉट आय' ही वृंदा भार्गवेलिखित कादंबरी, राष्ट्रपतींना अर्पण करण्याचा सोहळा मंगळवारी राष्ट्रपती भवनात अत्यंत हृद्य वातावरणात झाला. या कार्यक्रमात प्रकाशक उल्हास लाटकर, लेखिका वृंदा भार्गवे आणि कथेची नायिका सिद्धी यांची सोहळ्यात नेटक्या शब्दांत लक्षवेधी भाषणे झाली. सकारात्मकतेचा परिसस्पर्श करणाऱ्या या ...

चुल्हीवरची स्पेशल साधना मिसळ

मंत्रभूमी अशी ओळख असलेले नाशिक आता खवय्यांचे नाशिक ही ओळख मिरवणारे शहर बनले आहे. जंकफूड, फास्टफूडच्या जमान्यातसुद्धा येथील दर्दी लोक खवय्येगीरी करण्यात  नंबर एकचं स्थान अबाधित आहे. नाशिकची मिसळ ही कोल्हापुरी मिसळ इतकीच महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. तर्रीदार रस्स्याची, काळ्या मसाल्याची, झणझणीत अशा तोंडाला पाणी आणणाऱ्या अनोख्या चवीची मिसळ शहरात ठिकठिकाणी मिळते.  मिसळ खाऊ घालणारे अनेक हॉटेल्स सेवेत हजर आहेत. पोहे, शेव, कांदा, कोथिंबीर, उसळीची भाजी आणि वरून पिळायला लिंबू शिवाय या प्लेटीच्या जोडीला दही आणि पापड म्हणजे नाश्त्याचा फक्कड बेतचं जणू. शहरातील नावाजलेल्या अनेक मिसळ डेस्टीनेशन्सपैकी एक लाजवाब मिसळ स्टेशन म्हणजे गंगापूररोडवरील बारदान फाट्यालगत असणारं ‘साधना मिसळ’. गेली बरीच वर्षे साधना मिसळ नाशिककरांची भूक भागवत आलेली आहे.  नाशिककरांना लज्जतदार मिसळ खाण्याची सवय साधनाने लावून दिली आहे.  जुन्या नाशकातील हॉटेलसोबतच गेल्या वर्षीच्या अक्षयतृतीयेला साधना मिसळची अजून एक शाखा ही मोतीवाला कॉलेज रोडवर सुरु करण्यात आली.  नाशिकला खास मिसळ खाण्यासाठी म्हणूनही अनेक पर्यटक ये...

My heart jingles like wind chimes

The day, when I saw you first time, I still remember my heart jingles like wind chimes I was stopped for that Long moment which was prime, my heart jingles like wind chimes You just got passed near by me; I expressed you for some time, my heart jingles like wind chimes You blushed over my look, I dwelled into your eyes, when your smile made atmosphere shine, my heart jingles like wind chimes Do think of me at least for some pulses, by your sayings, my love will be rejoice for you, to say, my heart jingles like wind chimes Oh my prince of heartbeats, I am alive for you. You take me out from this world, to be in a dreamy world for the whole life, my heart jingles like wind chimes My heart jingles like wind chimes, my heart jingles like wind chimes Vishu    

आर के वरचा फिल्मी ‘कट्टा’

कट्टा. कट्टा म्हटलं की आठवते ते गप्पागोष्टी करण्याचे ठिकाण. एक अशी जागा जिथे माणसे जमतील आणि चार सुख-दुखाच्या, हित-अहित, संधी, संशोधन, मार्गदर्शन अशा अनेक गोष्टींची बोलून देवाणघेवाण करण्याची जागा म्हणजेच कट्टा होय. ग्रामीण भागात आजही मंदिरांच्या बाहेर झाडाला गोल चबुतरे बांधलेले दिसतात, त्यांना ‘पार’ असे ही म्हटले जाते. मुंबई शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या बाहेर कलाकारांचा असंच एक कट्टा आहे. जिथे नाटक, चित्रपट, मालिका आदींशी संबंधित कलावंत, तंत्रज्ञ एकत्र जमतात, आणि फावल्या वेळेत चहाच्या घोटासोबत नवीन माहिती, संधीयाबाबत चर्चा, मत-मतांतरे रंगतात. नाशिक सारख्या फिल्मी दुनियेत नव्याने ओळख निर्माण करू पाहणाऱ्या शहरातील कलाकार मुंबईत संधी शोधायला   म्हणून जातात पण फसतात. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कलाकारांच्या उत्साहावर पाणी फिरते, आणि चंदेरी दुनियेत काही तारे उगवण्यापूर्वीच निखळून जातात. नाशिक शहराचे, येथील कलाकारांचे होणारे नुकसान टळावे, कलागुणांना वाव मिळावा हा सामाजिक हेतू मनात ठेवून राजेश भालेराव, अरुण गिते, विजय दीक्षित, रफिक सैय्यद आदी नाशिकच्या नाट्य-चित्रपट संबंधित कलाकारांनी ए...

संकल्पांनी दिलं काय ?

वर्ष कुठलेही असो म्हणजे मराठी किंवा इंग्रजी, जानेवारीत म्हणा, चैत्रात म्हणा त्याची नवीन सुरुवात ही होतेच. जुने वर्ष सरते म्हणजे काय ? जुन्यातून नवे स्थित्यांतर, नवीन वेळापत्रकही कधीकधी, वृत्तपत्रांच्या, वाहिन्यांच्या बाबतीत मात्र कार्यकारिणीत बदल केला जातो, काही वेळेस कामांची पद्धती बदलली जाते, पण हटकून दरवर्षाची एक सवय मात्र आपली तशीच टिकून आहे, हो अनेक लोकांची सवय असते. कुठली ? सोप्पं उत्तर आहे, संकल्प करायची. हे संकल्प नवीन येत्या वर्षांच्या गाजेवरून मनात उसळून, उफाळून येतात. कुणी खरंच दर्यात तुफान झेलून नेणारा खलाशी असेल तर तो संकल्पसिद्धीस नेतोच, पण कुणी जर त्या लाटांवरच गटांगळ्या खावू लागला असेल तर मात्र संकल्प लाटे सोबतच विरून जातो. यंदाच्या वर्षी मी संकल्प सोडला होताच, अनेक लोकांप्रमाणे, सुटलेलं पोट कमी करायचा, जेवण कमी करायचा. पण काहीच उपयोग झाला नाही ओ ! पण एक संकल्प असाही होता जो तडीस नेले गेला, पूर्ण झाला त्याविषयी जास्त काही बोलणार नाही. बारीक व्हायचंच हा निर्धार अगदी पक्का असल्याने मी एक वेळापत्रकच ठरवून टाकलेलं. सकाळी सहा वाजता उठायचे आणि रोज शंभर सूर्यनमस्कार घालायचे, ...

आमची स्वप्ने

पालकांना सांभाळावे की नाही अनेकदा असे होते की आपले पालक हे ग्रामीण भागातले, मागसलेल्या विचारांचे, शिक्षणापासून अनभिज्ञ असे असतात. हजारो गोष्टी स्वभावात अशा बसलेल्या असतात की ज्यांचा खूप त्रास होतो, आणि तो ही शुद्ध अडाणीपणामुळे. मग त्या वेळेला स्वाभाविकपणे आपल्याला असा विचार येऊ शकतो की सांभाळतोय आपण आपल्या पालकांना. सुशिक्षित घरात रोज, आठवड्यातून एकदा, महिन्यातून दोन-तीनदा कडकड भांड्यांचे आवाज येतातच. इथे तर सगळं असते म्हणजे पुढारलेपण विचारात, शैक्षणिक प्रगती असते मग तरीही मतभेद होतात. इथे एकही बाजू दुबळी नसते कोणत्याच बाजूने त्यामुळे कधीकधी जो फटाक्यांचा जॅकपॉट बार काढला जातो ना, त्याचे वर्णन इथे नाही देत बसत. मुद्दा हा  की याहीप्रकारे पालकांचा कंटाळा हा केला जाऊ शकतो. नाही म्हणाल तरी नियती असतेच, प्रारब्ध कधी कुणाला चुकत नसते. मग ज्यांनी आपल्या आयुष्याच्या प्राक्तनाला गुलाबाचा आयाम दिला, प्राजक्ताच्या सुगंधाप्रमाणे ज्यांनी जीवनाला गंध ल्यायला त्या जन्मत्रात्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात निराधार करून टाकायचे का ? ज्यांनी आपला एकटेपणा घालवला, समाजात आपल्या अस्तित्वाला एक ...

आमची स्वप्ने

फेसबुक कशासाठी ? गेल्या काही वर्षात प्रचंड विस्तृत झालेलं हे माध्यम. फक्त मैत्रीसाठी सुरु करूनदेखील मार्क फेसबुकवर प्रेमात पडलाच आणि विवाहबद्ध झाला. फेसबुक हे मैत्री आणि लग्न यांतील एक प्रकारे दुवाच बनून राहिलंय. फेसबुक व्यावसायाकरिताही वापरले जाते; पण जाहिरात, विक्री आणि सरळ भाषेत ‘धंदा’ करण्यासाठी बांधले गेलेलंच नाही किंबहुना तसा उपयोग याचा व्हायला नको होता. फेसबुक शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक प्रश्न यांकरिता मंचित होऊन बदल घडवू शकते, फेसबुक वापरामागचा हा एक दृष्टीकोन बरोबर वाटतो. दुसरं असे की सध्याचे युगात  ‘कागदावरील सर्जनशीलता’ विस्मृतींत जात आहे. आपल्यानुसार अनेक नवोदितांचे कोणतेही सादरिकरणाचे व्यासपीठ फेसबुक बनलंय, त्यातून समाज विकास आणि उन्नती साध्य करण्याचा आणि अर्थात स्वतःचीही प्रगती करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा, पण अनिष्ट रूढी इथे रुजू देऊ नये, तसेच गैरफायदाही घेवून कुणाचा छळ करू नये. यासाठीच फेसबुक वापरायला हवे. 

आमची स्वप्ने

लिव-इन लिव-इन. ही संकल्पना खूप कोती वाटते. बघा, ना एकत्र तर रहायचं मात्र एकदम स्तिमित. जोडीदारावर प्रेम हे करायचं पण ते  स्वतःच्याही नंतर, तीच गत नात्यांतील विश्वासाची होते आहे. आपल्या आईवडिलांनी जर असा विचार केला असता आणि आपला जन्मच होऊ दिला नसता तर. कुठून आणली असती, चॉइस जगण्याची, मनमानी वागणे, खाणे-पिणे, भटकणे पण शेवटी खोलीच्या एका टोकाला तो, एका टोकाला ती. हे कसे काय योग्य म्हणू शकतोय आपण ? हा सुसह्य मार्ग नव्हे सहजीवनाचा. लिव-इनमध्ये राहणे हे अनेक धोक्यांनी भरलेले, भीतीच्या सावटात वावरू देणारे असते. आपल्यापासून मूठभरही समाज प्रगत होत नाही. ज्या युवकांचा देश म्हणून आज आपण अग्रण्यात तोलले जातो, तिथे अशी संकल्पना रुजली, पटली तर भविष्यातील पिढी निर्माण होण्यालाच आळा बसू शकतो. अख्या एका पिढीवर आपण क्रूर अत्याचार करतो. पृथ्वीचे सरांक्ष्ण व्हावे याकरीता सरंक्षक उपाय युजावे यासाठी लख्ख बुद्धिमत्ता असलेल्या भावी पिढीची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे, सामाजिक बिघडणारे स्वास्थ्य स्थिर सावरण्याविरुद्ध ही लिव-इन संकल्पना असल्याचे जाणवते. तेव्हा आपलं करियर एका ठिकाणी, आपण एका ठिकाणी आणि आ...

आमची स्वप्ने

राबायचं का ? युवा चेतना, युवा प्रेरणा, युवा शक्ती. भारत देशाची ही युवा ताकद कशासाठी वापरत यायला हवी ? बरोबर, खरंच या तरुण, उफाळत्या, सळसळत्या रक्ताची ऊर्जा परत तरुणांकरीताच उपयोगी यायला हवी आहे. नित्य वागणुकीतून, वैयक्तिक तामझामातून आपली सार्वत्रिक अशी एखादी तरी गोष्ट घडू शकत नाही का ? नक्कीच घडू शकते. यार हो, राबायचं खऱ्या अर्थाने याचकरीता. जेणेकरून आपली पिढी आणि भविष्यातील आपला निसर्ग हा सुरक्षित, पोषणात्मक मूल्यवर्धित आयुष्य जगू शकेल. याचबरोबर आज आपली व आपली पूर्वजांची, गुरुजनांची, वडीलधार्यांची म्हणजेच मागची पिढीही आपण विसरून चालणार नाही. राबायचं ते वर्तमान, भूत आणि भविष्यासाठी. एक कथा वाचली. थंडीने कुडकुडनाऱ्या एका म्हातारीने त्याच्या मुलाला शाल आणायला सांगितली, तर त्याने उर्मटपणे घरखर्च आणि तिच्या सुनेच्या कपड्यांवर खूप खर्च झाला आहे तर पुढच्या थंडीत शाल घेऊन देईल असे सुनावले. आपल्या मुलाला थंडी वाजू नये म्हणून वेळप्रसंगी स्वतः फाटक्या चादरी पांघरून, लेकराला गोधडीत लपेटलेले उबदार बालपण देणाऱ्या आईने त्याच रात्री जीव टाकला. अंत्यसंस्कारांच्यावेळीस त्या मुलाने नवी महागडी शाल आईस पा...

आमची स्वप्ने

कपडे आणि फॅशन फॅशन, करावी का ? हो, पण कशी आणि कोणती ? हा आपल्या सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, यावर अनेक कमी लोक हो बोलतील. आपले कपडे कसे  असावे, तर ज्या कपड्यांत आपण सहजतेने रोजची दिनचर्या जगू शकतो तीच. असंच राहावं, तर रोज वावरताना सुलभता येईल, अन्यथा उगाच आपले चार चौघात हसु होऊ शकते. आपल्याला कळते ना की काय शोभेल, त्याचाच विचार करून कपड्यांची यथोचित निवड करायला हवी, ते आकलन, ती समज आपल्याला प्रौढत्व येईपर्यंत अर्थातच आलेली असते. कपडे आणि त्याची फॅशन ह्यांचा स्वतःचा एक आवेग आहे, जो सतत धावता असतो, यात नेहमी बदल झालेले दिसतात. पण बदल होतात, नव्या तऱ्हेचे कपडे येतात म्हणून आपणही प्रत्येक प्रकार अंगीकरावाच का ? कशाला ? रोज रोज रस्त्यांवर, दुकानांत........ हो त्या तुमच्या....  मॉल्समध्ये चिक्कार गर्दी असते, करोडोंची उलाढाल होते तिथे, पण एकतरी कपडे उत्पादकाला वाटू नये की अरे, देशात लाखो लोक असे आहेत, की त्यांच्या अंगावर एकाच कपडा आहे, छिद्र, छिद्र घालून गरिबांच्या पोरी, खांद्यावर अफू पाजलेला, गाढ निद्रिस्त झालेलं तान्ह मुल फिरवत भिका मागत फिरतात, अशा एकतरी गरीब आया-बहिणीच्या अंगावर...

आमची स्वप्ने

जीवन जीवन. आपल्या जीवनावर काय लिहावं. खरतर जितकं लिहाल, तितकं कमीच आहे. जीवन म्हटलं की आपण एका वेगळ्याच विश्वात मग्न होतो, विचारांच्या. त्या विचारांच्या रेघांचे अगदी सहज जाळे होवून बसते. गुरफटून जेव्हा आपण एकटच असतो, आपल्याकडे सांगण्यासारखं काहीही नसते. अशा वेळेस प्रारब्ध एक वेगळ वळण घेतं, कुणी नवीन आपल्याला भेटते; आपणच नव्याने आपल्याला. पण अशा काळाच्या मखमली नेहमी उलगडल्या जायला हव्यात मित्रांनो. एखाद क्षणी ज्या समयी निर्णय घेणे कठीण असते, तेव्हा प्रवेश करून अशीच आत्मफेरी मारावी, ही मुशाफिरी जिथे संपेल, तिथून आपली पायवाट सापडून जाईल. कदाचित मग एक नवीन ध्येय्याची ती सुरुवात असेन.  परंतु सगळ्या तयारीनिशी, खिलाडूवृत्ती ठेवून पुढे वाटांनी धावायची तयारी ठेवा. घात येतील, अडचणीच्या वळणांचे, पुढ्यात काय येईल ते कळणारे नसेल. चढवे लागतील उंच उंच चढ कारण माथ्यावर असेन विजयी सीमा, पण अडथळे अन मेहनत यांच्या बनवाव्या मोजाव्या लागतील परिसीमा. जिद्दीच्या, निश्चयाच्या, घोर आत्मविश्वासाच्या बाहुबळावर, अन ज्या समस्यांची येण्याला निमीत्त आपणच ठरू त्यांनाही काठीण्य पातळीच्या परीक्षा पार करून दूर करावे...

आमची स्वप्ने

देशप्रेम आम्ही देशप्रेम दाखवतो ते फक्त २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टलाच आणि ते तितकंच मर्यादित असते. बाकी आम्ही रस्त्यांवर तावातावाने गद्य चालवून गरीब जनतेला, वृद्धांना, मुला-मुलींना छेडू, त्रास देऊ. कोणी बघत असो वा नसो घरासमोर कचर्याचा ढीग डम्पिंग करण्याकडे आम्ही नेहमीच बघत असतो. लहान लेकरू खात नाही पोटभर, उष्ट टाकते तर त्याच्यावरून ओवाळून आम्ही फेकून देतो, मुंजापासून लग्नापर्यंत कुठल्याही कारणाला अमाप खर्च, लिटरेच्या लिटरे इंधन जाळतो, भलेही देशाचे असो, आम्ही खरेदी करतो ना ? पंगती-जेवणावळी उठता तेव्हा दहा पंगती पुन्हा जेवतील इतुके अन्न वाया न घालविले तर सुख कसे लाभेल ? तुडुंब भरभरून रोषणाई, झगमगाट करूच हो, शहरात राहतो, १५-१५ तास लोडशेडिंग असलेल्या गावांशी आम्हाला काय करायचंय ? पण हा, कुनीबी अभिव्यक्ती म्हणून आमच्या भारतभूचा अपमान करेल तर सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान करून आमचं देशप्रेम चिडून, पेटून जातो, मग जाळपोळ, दंगली, लाठीमार, यांतून आमची देशसेवा करतो. आणि हो, आम्ही रक्षक जरी असलो कधीकधी तरी आम्हाला गप्प बसायला ‘मुग’ विकत घेवून द्यावे लागतात, बाकी तुम्हाला शेंडी लावून, बाटलीत उतरवून पुढी...

आमची स्वप्ने

poket मनी जीवनात काही बनण्यासाठी आपल्या वडिलांनी, पालकांनी रक्ताचे पाणी केलेले असते. हसत, खेळत  यातना, वेदना सहन करत मरमर कष्ट करून त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वृक्ष बनण्यासाठी आपले घरचे जातात असतात. मात्र आपण, त्यांना एक रुपया तरी आणून देऊ शकतो का ? मग अनास्त्व अवाजवी खर्च करून, पैसे मनमानेल तसे उधळून कुठलं जागतिक सुख आपण मिळवतो ? एका मृगजळ आयुष्याचे बनवून टाकतो आणि स्वतः मौलिक  आयुष्य त्याच्यापाठी खर्च करत बसतो. आणि जेव्हा आपण सगळं हरलेलो असतो तेव्हापाठी आधारवड आपल्या पालकांचाच असतो ना ! पैसे आपण कमवलेले असले तरी ते मिजास करत वायफळ खर्च न करता आपल्या घरच्यांना सुख देयला हवे. अन जर घरचेच अजूनही पाकिटात पैसे कोंबत असतील तर बचत करायला हवी, नाहीतर बंगल्यात राहणार्याची सवय जडलेल्या इसमास झोपडीत राहवे लागेन. भविष्य त्याला मिणमिणत्या दिव्याच्या अंधुक उजेडात कांदा-भाकर खात दिवस कंठत काढावे लागतील. तेव्हा मिळणारा पौकेट मनी आपण सदुपयोगासाठीच वापरावा. शक्य तितका बचत करुन ठेवावा. आणि जेव्हा सढळ खर्च करावासा वाटेल तेव्हा फक्त आणि फक्त कुटुंबावर खर्च करावा. आणि एखाद्या गर्जूस दान दिल...

आमची स्वप्ने ...

पब आणि आम्ही नाशिकसारख्या छोट्या शहरात कॉलेज रोड, गंगापूररोडवर तरुण-तरुणींचा धिंगाना रात्रभर सुरु असतो.  मेट्रो-सिटीज म्हणून नावारूपाला आलेल्या मुंबई-पुणे शहरात याचे प्रमाण अफाट आहे. वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्रात ‘सांस्कृतिक स्थित्यंतर’ किंवा ‘पाश्चिमात्य अनुकरणाचा’ पाया हा याच मेट्रो सिटीजमध्ये रोवला जातोय. का ? कशासाठी ? आपल्या मराठमोळ्या संस्कृतीतही नृत्य, गायन या कला तुम्हाला करमणूक करवून देण्यासाठी समृद्ध आहेतच की. त्यां जोपासून, विकसित करून, जतन- संवर्धन करून आपली अस्मिता टिकवून पुढच्या पिढीस देणे हे मी  महाराष्ट्रीय टेंभा मिरवणाऱ्या प्रत्येक कलंदराचे आदिकर्तव्य होते. परंतु मराठी/ भारतीय  संस्कृती ही  परकीय भाषा, परंपरा यांच्या मुसळधार, अविरत अशा भडीमाराने लोप पावत चालली आहे, किंवा तिचे दर्शन दुर्लभ झाले आहे. परदेशातील लोक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आपण भारतीयांची खिल्ली उडवत राहतात, बहुतांश देशात भारतीय नागरिकांना जगताना मानहानी, त्रास होत आहे, आणि भारतीयांनी त्यांच्या म्हणण्यानुसार वागले पाहिजे असा त्यांचा हेका आहे. बळजबरीचा ! मग मला सांगा आपण भारतीय का एक प...

आमची स्वप्ने

क्लासमेट्स हाय फ्रेंड्स, कसे आहात ? कशी झाली तुमची संक्रांत ? मला खात्री आहे, तुम्ही खूप धमाल केली असणार ! चला तर, आज एका हटके विषयावर आपण बोलणार आहोत. तुमच्या  फ्रेंड्स ग्रुपचे नाव काय आहे ? ग्रुपमध्ये कितीजण  आहात ? आणि या ग्रुपमध्ये ते दोघे एकमेकांचे  अगदी ‘खासमखास’ असे असतीलच ना ! फ्रेंड्स आमच्या टीमनेही या विषयाला समोर ठेवून एक हटके रिसर्च केला, शहरातील कॉलेजेसच्या  ‘कट्टेकरी’ मंडळींना  प्रश्न विचारला,  तुमच्या ग्रुपमध्ये कुणी असेही आहे का, की जे आधी मित्र-मैत्रिणीच होते पण मग ते प्रेमाच्या  बंधनात  अडकले  आणि मग त्या नंतर ग्रुपबरोबर त्यांचे संबंध कसे राहिलेत. तर चला, बघू   कुणी काय, म्हणणं मांडलय, ग्रुपमधील त्या खास ‘मित्रांच्या’ जोडीबद्दल. मित्रांनो, आमची टीम सगळ्यात आधी पोहोचली ती ‘बी. वाय. के कॅम्पसमध्ये, इथे भेटलेल्या पार्किंग ग्रुपने आमहाला बरीच ‘इन्फो’ दिली. या ग्रुपमधील मेहुल म्हणतो, “ माझा मित्र हेरंब आणि मैत्रीण केतकी अगदी जीवश्च, कंठश्च अशी आमची यारी, पण पुढे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, एक हळवं, गहिर नातं रेशमा...