विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आमची स्वप्ने

देशप्रेम

आम्ही देशप्रेम दाखवतो ते फक्त २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टलाच आणि ते तितकंच मर्यादित असते. बाकी आम्ही रस्त्यांवर तावातावाने गद्य चालवून गरीब जनतेला, वृद्धांना, मुला-मुलींना छेडू, त्रास देऊ. कोणी बघत असो वा नसो घरासमोर कचर्याचा ढीग डम्पिंग करण्याकडे आम्ही नेहमीच बघत असतो. लहान लेकरू खात नाही पोटभर, उष्ट टाकते तर त्याच्यावरून ओवाळून आम्ही फेकून देतो, मुंजापासून लग्नापर्यंत कुठल्याही कारणाला अमाप खर्च, लिटरेच्या लिटरे इंधन जाळतो, भलेही देशाचे असो, आम्ही खरेदी करतो ना ? पंगती-जेवणावळी उठता तेव्हा दहा पंगती पुन्हा जेवतील इतुके अन्न वाया न घालविले तर सुख कसे लाभेल ? तुडुंब भरभरून रोषणाई, झगमगाट करूच हो, शहरात राहतो, १५-१५ तास लोडशेडिंग असलेल्या गावांशी आम्हाला काय करायचंय ? पण हा, कुनीबी अभिव्यक्ती म्हणून आमच्या भारतभूचा अपमान करेल तर सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान करून आमचं देशप्रेम चिडून, पेटून जातो, मग जाळपोळ, दंगली, लाठीमार, यांतून आमची देशसेवा करतो. आणि हो, आम्ही रक्षक जरी असलो कधीकधी तरी आम्हाला गप्प बसायला ‘मुग’ विकत घेवून द्यावे लागतात, बाकी तुम्हाला शेंडी लावून, बाटलीत उतरवून पुढील काही साल ‘चू’ बनवून आमच्या देशाबद्दलचा जाज्वल्य स्वाभिमान आम्ही पटवून देतो. आमच्या देशप्रेमाची गाथा सांगायला खंडच्या खंड ही कमी पडतील हो.


हे असते का देशप्रेम ? नाही ना ..... तर चला खरे देशप्रेमी व्हा. आपलं परिसर स्वच्छ ठेवा. अन्न, वस्त्र, पाणी, इंधन इत्यादी मानवांच्या मूलभूत बाबींचे रक्षण, संरक्षण आणि बचत करा. आपल्यामुळे एक जीव पोसा, परंतु जीवाश्म नष्ट होणार नाही याची काळजी घ्या. अंधश्रद्धा निर्मुलनासाठी पाऊले उचला. मानवतेचे, देशभक्तीचे ‘सत्य’ विचार आपल्या मनामनांत रुजवा. हाच खरा धर्म, हेच खरे देशप्रेम. आपण चांगल्याप्रकारेच आपले देशप्रेम व्यक्त करा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi