मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
किंवा तुम्ही ब्लॉगच्या डावीकडे असलेलं पॅनलही उघडू शकतात.
अमरावतीचे तरूण लेखक शंतनू गोटे यांनी त्यांचे दुसरे पुस्तक After the rain the moon is beautiful वाचकांच्या भेटीस आले आहे. शंतनु यांनी आधीही Message Box या पुस्तकातून एक सुंदर प्रेमकहाणी सर्वांसमोर आणली होती. After the rain..... मधूनही त्यांनी समर्थ आणि स्वरा यांची हळवी प्रेमकथा गुंफली आहे. स्वरा, एक खेळाडू. महाविद्यालयातील अव्वल दर्जाची धावपटू, अभ्यासातही हुशार, अन अतिशय सुंदर, देखणी मुलगी. तर, दुसरीकडे कथानायक समर्थ हा अभ्यासात सर्वसाधारण असला तरी उत्तम नट व हरहुन्नरी कथालेखक आहे. या पुस्तकाची कथा या दोन पात्रांभोवतीच फिरते. पुस्तकाचे पान जसेजसे पलटत जातो तसतसे शंतनू समर्थ व स्वराबाबत उत्सुकता ओघवत्या लिखाणातून निर्माण करत राहतात. विविध विषयांना हाताळत नवनवीन प्रसंगातून ही प्रेमकथा फुलवत नेली आहे. त्यामुळे न कंटाळता वाचक शेवटच्या पानापर्यंत वाचत राहील.
कथेतील प्रसंगात साहस आहे, मजा-मस्तीचे प्रसंग आहेत. तर काही ठिकाणी वातावरण अतिशय गंभीरही होते आहे. ही काल्पनिक कथाही वाचताना हे जणू आपल्यासोबत घडून गेलं आहे किंवा आपल्या परिचयाचीच ही परिस्थिती आहे असे वाटतेच. शंतनू यांनी या कथेत दसऱ्याच्या दिवसाचे प्रसंग अतिशय खूबीने चित्तारलेत असे म्हणता येईल. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा यथोचित मान सन्मान वाचकांना नक्कीच संस्मरणीय प्रसंगातून होत असल्याचे वाचावयास मिळेल.याशिवाय ॲथलेट असणाऱ्या स्वराच्या स्पर्धाही अगदी ऑलम्पिक सामन्यांचे रसभरीत, रोमहर्षक वर्णन वाचत असल्याप्रमाणे वाटते. स्वरा आणि समर्थ व्यतिरिक्त इतर पात्रही कथेस पुरक प्रसंगातून भेटीस येतात. समर्थ व स्वरा हे अगदीच तरूणपणाच्या उंबरठ्यावर असलेले, त्यांच्या पहिल्या प्रेमाला पूर्णपणे न्याय देतात की त्यांचीही प्रेमकथा भरकटते हे सत्य शेवटीच उलगडते अन त्याची मजा पुस्तक वाचल्यानेच मिळणार आहे.
टिप्पण्या