विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

स्वप्नांचा मार्ग शोधायला लावणारा - the alchemist

स्वप्नांचा मार्ग दाखवणारी परीकथा - The Alchemist

स्वतःच्या ईच्छा, आकांक्षा नसणारा माणूस पृथ्वीतलावर सापडणे तसे कठीणच ! माणसांपैकी साधारणपणे ९० टक्के लोक तरी असे असतातच, ज्यांना दैवावर, नशिबावर प्रचंड विश्वास असतो. नशिब बलवत्तर व्हावं, म्हणून विविध मार्गाने माणसाचे प्रयत्न सुरू असतातच. यांच्यपैकीच काही जण असे असतात, जे फारच स्वप्नाळू असतात. सतत नवनवीन स्वप्ने पाहणे, त्याबद्दल आपल्या आजुबाजूच्या लोकांना सांगणे त्या स्वप्नांत रमणे ही त्यांच्यासाठी नित्याचीच बाब झालेली असते. स्वप्ने ही निव्वळ स्वप्नेच असतात का ? त्यांचा संबंध केवळ एका झोपेपुरता मर्यादीत उरतो का ? काही लोक याच्याशी सहमत होतील, तर काहींचे विचार नक्कीच वेगळे असतील. अनेक लोक, आपल्या स्वप्नांचा गांभीर्याने विचार करतात अन त्यांना पूर्ण करण्याच्या दिशेने स्वतःला झटवतात. स्वप्ने पूर्ण करतात. अशा माणसांचे आयुष्य इतर लोकांसाठी दंतकथाच बनून जाते. आपल्या स्वप्नांना खरे करणाऱ्या लोकांचे आयुष्य एखाद्या परीकथेत असावे असेच घडते. त्यांचीच चर्चा सगळीकडे घडते. स्पेनमधील सॅन्तियागो या मेंढपाळ मुलाच्या असेच आयुष्य वाट्याला आलं. त्याचीच कथा आपल्याला वाचायला मिळते ती, पाऊलो कोएलो लिखीत, नितीन कोतापल्ले अनुवादित ‘द अल्केमिस्ट’ या पुस्तकात. 
 वाचनाकडे फार लक्ष न देणारा व्यक्तीही हे पुस्तक अगदी काही तासांत संपवेल. मीसुध्दा ते चारच तासांत वाचून पूर्ण केलं होतं. या पुस्तकाच्या कथानकात खरोखर वाचकांना विवश करण्यासारखी शक्ती आहे. केवळ कथानकात अडकवून न ठेवता त्याहीपलिकडे जात आपलं भाग्य घडवण्याची ताकदसुध्दा हे पुस्तक देऊ करते. ही कथा वाचल्यावर माणूस अंतर्मुख होऊन विचार करावासा वाटतो. आपल्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने बघण्याला आपण स्वतःच खूप प्रेरित व्हायला लागतो. सॅन्तियागो नावाचा मेंढपाळ असतो. जो खरंतर, त्याच्या मेंढ्यांसोबतच्या आयुष्यात खूश असतो. त्याच्या कुटुंबाला सॅन्तियागोला धर्मगुरू बनवायचे होते. त्यासाठी त्याचा धर्मशास्त्राचा अभ्यासही झाला होता. पण, त्याच्या आयुष्याचे आकर्षणबिंदूच काहीसे वेगळे होते. त्याला बाहेरचे जग कसे आहे याचंच फार अप्रूप होते. ते सगळं त्याला जाणून घ्यायचे होते. पाहायचे होते. अन यासाठीच त्याने मेंढपाळ होण्याचा निर्णय घेतला होता.  मग, इथून तो स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्याच्या उद्देशाने प्रवासाला सुरूवात करतो. त्याला पडलेल्या स्वप्नांना साकार करून त्याच्या जीवनाला तो अर्थपूर्ण बनवणार होता. याचसाठी तो पुढे तरिफा नावाच्या गावात जातो. जिथे स्वप्नांचा अर्थ सांगणारी म्हातारी राहत असते.

फ्रॉस्ट फ्री फ्रीज

द अल्केमिस्ट हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाबद्दल मला येथे सांगितलंच पाहिजे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच आपली अन त्याची ओळख होते. अन त्याचे वैयक्तिक आयुष्याला पडले गेलेल्या पैंलूबद्दल वाचले तर अशा प्रकारची व्यक्ती जगभर कोट्यवधी प्रती विकले गेलेल्या पुस्तकाची लेखनही करू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणेच आपल्याला जड जाते. ‘द अल्केमिस्ट – अर्थात किमयागार’.  पाउलो हे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले होते. धार्मिक गोष्टींत ते कधीच अडकून राहिले नाहीत. त्यांनी लहानपणापासूनच लेखक बनण्याचा निश्चय केला होता. पण, मला वाटतं, लेखक होण्याइतकं अवघड या जगात काहीच नसेन. पण, पाउलो मात्र त्यांच्या पालकांच्या या मतावर अगदीच बंडखोरपणे वागू लागले. त्यांचे वागणे पाहून पाउलोला कुटुंबांनी वेड्यांच्या इस्पितळात ठेवले. मनोरूग्ण असल्याप्रमाणे त्यांना दोन-तीनदा वेड्याच्या इस्पितळात भरती करण्यात येत होते. यानंतर मात्र पाउलो यांचं आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यांवर भरकटत गेले. आयुष्यभर ते संपादक, लेखक, गीतकार म्हणून जगले. परंतु या दरम्यान त्यांना मरणप्राय यातनादेखील भोगाव्या लागल्या. अन अखेर १९८८ साली त्यांनी द अल्केमिस्ट ही कादंबरी लिहीली. अन, ती बेफाम वाचकप्रिय ठरली. इंग्रजी  अनुवाद झाल्यानंतर ही कादंबरी जगभरात वाचली गेली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या कोट्यवधी प्रतींचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कादंबरीची नोंद आहे. या कादंबरीवर वॉर्नर ब्रदर्सने एका सिनेमाची निर्मितीही केली आहे. स्वप्नांचा शोध घेण्यासाठीचा मार्ग दाखवणाऱ्या या कादंबरीने वाचकांचे ह्रदय हेलावून जाते हे नक्कीच.

सिंगल डोअर, बजेट फ्रीज, वीज वाचवणारा, मॅन्युअल डिफ्रॉस्ट

तर, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचं सॅन्तियागो ठरवतो, अन त्या दिशेने वाटचाल सुरू करतो. तेव्हा त्याला उलगडते की, त्याला जे स्वप्नात दिसते ते ठिकाण  एक गुप्त खजिन्यापर्यंत नेणारे आहे. अन, तोच मिळवण्याच्या उद्देशाने तो कूच करतो. पिरॅमिड्सच्या देशाकडे. याचे कारण त्याला स्वप्नात दिसलेल्या ठिकाणी दोन त्रिकोणी पिरॅमिड्स असतात. अन, त्यांच्यापर्यंत जाऊनच सॅन्तियागोला खजिना मिळणार असतो. तिथे जाण्यापर्यंतच त्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागणार असतो. पण, मग त्याला सेलाम देशाचा राजा गुरू म्हणून लाभतो. त्याच्या भेटीनंतर सॅन्तियागो हा आत्मविश्वासाने स्वप्नाचा पाठलाग करू लागतो. त्याच्या गुरूने दाखविलेल्या रस्त्यावर आपल्या विवेक आणि तर्कबुद्धीचा वापर करून तो निर्धाराने पुढे जातो. या त्याच्या प्रवासात अनेक संकटांचा त्याला सामना करावा लागतो. त्यात काही मित्र त्याला मदत करतात. तर कुणी त्याच्या या स्वप्नाळूपणाचा फायदाही घेतं. विश्वासघात करतं. या प्रवासात त्याच्यावर एक मुलगी प्रेम करू लागते. अन, सरते शेवटी सॅन्तियागो त्याला हवं ते मिळवण्यात यशस्वी ठरतो. ते, कसे हे वाचकांनी स्वतःच वाचणे योग्य ठरेल.

डबल डोअर, उत्तम सुविधा फ्रीज

द अल्केमिस्ट खऱ्या अर्थाने बोधपर अशी कथा आहे. आपल्या आतील संवेदना, जाणिवा यांना ती साद घालते. आजुबाजूला, आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे परस्परांशी संबंध जोडत आपला स्वविकास कसा साधला जाऊ शकतो याबद्दल ती आपल्याला मार्गदर्शन करते. ते करत असतानाच यात कोणताही उपदेश दिले जात असल्याचे आपल्याला बिलकुल जाणवत नाही. पाउलो कोएलो हा जगद्विख्यात लेखक
 तो तसा का झाला हे कळून घेण्यासाठी ‘द अल्केमिस्ट’ पुस्तक वाचायलाच हवं.

© विशाल लोणारी, २०१९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका