मित्रांनो, ऑनलाईन बिजनेस करणे ही आजकाळाची आता गरजच राहिली नाही, तर आता ही गोष्ट अपरिहार्य बनली आहे. देश-विदेशांतील व्यवसाय संशोधकांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. ऑनलाईन व्यवसाय करताना आपण वेबसाईट डेव्हलपमेंट करून त्यावरून सेवा व वस्तू पुरवू शकतो. पण, केवळ हाच एक मार्ग आपला व्यवसाय ऑनलाईन स्थापन करण्याचा आहे, असे नाही. तर, यातील एक सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेला राजमार्ग म्हणजे Amazon Business.
सहज सोपे रजिस्ट्रेशन
आपला व्यवसाय ऑनलाईन सुरू करणे अगदी सहज शक्य आहे. त्यासाठी नव्याने वेबसाईट बनवा, तिला गुगलवर प्रोमोट करा, एसईओ करा, सोशल मीडियावर ती शेअर करा, या सर्व तांत्रिक बाबींतून काही प्रमाणात तुम्हाला मुक्ती मिळते. तुम्हाला फक्त
Register on Amazon Business
वरील वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या व्यवसायाची नोंदणी करायची असते. त्यासाठी फक्त तुम्हाला Business PAN किंवा GST क्रमांक टाकावा लागतो. आपल्या व्यवसाय नोंदणीसाठी जीएसटी हा आवश्यक असतो. याचसोबत तो ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठीही अपरिहार्य ठरतो. अमेझॉनच्या धोरणानुसार ज्या देशांत सध्या GST धोरण लागू आहे, तेथील व्यावसायिकांनाच अमेझॉनद्वारे बिजनेसची ऑनलाईन नोंदणी करता येते. यामुळे, देशाला मिळणाऱ्या महसुलात सकारात्मक वाढ होते. जीएसटी करातून आलेला पैसा हा सरकारकडून देशातील राज्यांच्या विकासासाठी वापरला जातो. म्हणून जीएसटी क्रमांक असणे ही अमेझॉनसाठीची मुख्य अट आहे.
२८ % पर्यंत सवलत
जीएसटीसह रजिस्ट्रेशन केल्याने अमेझॉन तुमच्या व्यवसायाला हातभारदेखील लावते. व्यवसायवृद्धी करण्यासाठी आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५ ते २८ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याचाच अर्थ मोठ्या उद्योगांना तर अमेझॉन बिजनेस उपयोगाचे आहेच. परंतु, याचा उपयोग मोठ्या उद्योजकांना कच्चा पुरवणाऱ्या लघु उद्योगांनाही व्यवसायालाही उभारणी व प्रगती करण्यासाठी हातभार लागतो.
२०० कोटींची उलाढाल
अमेझॉनवरील व्यवसायांत २०१९ च्या आर्थिक वर्षात मार्केटप्लेसवरून तब्बल २०० कोटींचे आर्थिक व्यवहार केले गेले. टीव्हीवरील जाहिरात तुम्ही पाहत असालच, Amazon वर सगळं मिळतंय, Amazon वर सगळं उपलब्ध आहे. मग, हे फक्त ग्राहकांसाठी उपलब्ध आहे का? काय, Amazon ने थेट कंपनीकडून सगळं विक्रीसाठी ठेवलं आहे का? तर, नाही. हे जे काही सगळं उपलब्ध आहे, त्यात भारतात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या तर सामील आहेतच. पण, त्याचसोबत आहेत Amazon Business Partner. होय, तर पाहू या Amazon business काय आहे, अन कसे काम करते.
व्यवसाय गरजांची पूर्तता
Amazon Business तर्फे तुमच्या व्यवसायाला आवश्यक अनेक बाबींची पूर्तता करण्याची संधी मिळते. आपण भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी आपला व्यवसाय हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम Amazon अत्यंत विश्वासूपणे अन वेगाने करते आहे. म्हणूनच २०१९ मध्ये प्रसिध्द झालेल्या एका अहवालात देशातील लाखभर छोट्या-मोठ्या उद्योजकांनी आपले व्यवसाय Amazon Busines Account वर रजिस्टर केल्याने वस्तुंच्या एकूण विक्रीत तब्बल २००% वाढ झाल्याची नोंद केली गेली आहे.
B2B मार्केटव्यवस्थेत Amazon भारतात सुरू झाले तेव्हा केवळ ३४,००० विक्रेते सामील झाले होते. आता ती संख्या जवळपास ५ लाखांच्या घरात पोहोचली आहे, अन अजूनही संख्या वाढ यात सुरू आहे.
सप्टेंबर २०१७ मध्ये Amazon ने व्यवसाय सुरू केला. देशातील विक्रेत्यांना इतर विक्रेत्यांशी जोडणी करून देण्यास सुरुवात केली. यासाठी ऑनलाईन मार्केटप्लेस निर्माण केली गेली. अन, केवळ पुढच्या दोन वर्षातच ह्यात २००% वाढ दिसून आली.
प्रत्यक्ष व्यावसायिक फायदे
आपला व्यवसाय Amazon वर रजिस्टर असेल तर, आपल्याला देशभरातील ग्राहकवर्गापर्यंत एका क्लीकवर पोहोचता येते.
आधीच असलेल्या ग्राहकवर्गासही आपण आपल्या ऑनलाईन बिजनेसवर वळवून आपली विक्री फुटफॉल तसेच ऑनलाईनही वाढवू शकतात.
ऑनलाईन मार्केटप्लेस असल्यामुळे अनेक लहान उद्योजक आपल्या व्यवसायाच्या Amazon app किंवा संकेतस्थळावरून त्यांच्या व्यवसायाला लागणाऱ्या गोष्टी खरेदी करू शकतात. यामुळे त्यांच्याही व्यवसायाला हातभार लागतो.
आजघडीला १६ लाखांहून अधिक प्रॉडक्ट अमेझॉनवर रजिस्टर केले गेले आहेत. याचा अर्थ ज्याला व्यापार करायचा आहे त्याच्यासाठी तर आकाश पूर्णतः खुले झालेलं आहे. Amazon वरील अनेक वस्तू ग्राहकांना हव्या तितक्या दर्जेदार व किंमतीच्या निवडता याव्यात म्हणून Best deals, Deal of the day, Best sellers, Amazon brand, अशा अनेक कॅटेगरीमध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपला ग्राहक हा खरेदी करतानाच मनाजोगती खरेदी करता आल्याने अत्यंत संतुष्ट होतो. Amazon business वर रजिस्टर होण्यासाठी तुमच्याकडे व्यवसाय करण्याची जिद्द, मेहनतीची तयारी, विक्रीसाठी विविध वस्तू,अन हो GST नंबर असणे आवश्यक आहे. GST लागू झाल्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. Amazon business खातेधारकाला व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी विकत घेताना ५ ते २८ टक्के अतिरिक्त सवलत मिळत जाते. त्यामुळे अधिक अधिक विक्रेत्यांचा ओढा आता Amazon कडे वाढतो आहे.
आतापर्यंत टिव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल यांची मागणी सर्वाधिक होत होती. पण, आता त्यासोबत चहा, कॉफी, बिस्कीट, किराणा माल यांच्याही मागणीत वाढ होऊ लागली आहे. देशभरात Amazon fullfillement केंद्रीय जाळे विणले गेले असल्याने जलद व विश्वासार्ह शिपमेंट प्रक्रिया अतिशय सुलभ रीतीने amazon वर होते आहे.
ह्याच कारणामुळे Amazon business कडे लोक वळू लागले आहे. Amazon Business वर आज आपलं अकाऊंट असणे म्हणजे आपला ग्राहकवर्ग देशभर असणे. व्यवसाय-ग्राहक, व्यवसाय-व्यवसाय या दोन्ही श्रेणींमध्ये आपल्या आधीपासूनच असणाऱ्या उद्योगाला चालना मिळवून देणे शक्य होणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा