पोस्ट्स

सप्टेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

article on elections

इंजिन पडले ‘बंद’, कमळ ‘बेधुंद’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार!! आजच्या टीव्ही आणि उद्याच्या पेपरमधील हीच मुख्य बातमी, याच आशयाचा मथळा, आणि पुढे इतिवृत्तांत. पण याच निवडणुकांमुळे मला घडल्या आणि घडणाऱ्या घटनांचा लेखाजोखा घ्यायची जबाबदारी खांद्यावर पडली आहे, असो आता होऊनच जाऊ द्या!! (खर्च नको रे बाप्पा, खिशाला परवडत नाही...) निवडणूक आणि राजकारण म्हटले की त्यात अनेक गोष्टींची राजकीय गुंफण असते, अगदी सर्वसामान्य कार्यकर्ते, समर्थक ते पदाधिकारी ते नेत्यांपर्यंत. सगळ्या सगळ्या पात्रांची अतिशय चिवट खेळींची सरमिसळ झाल्याने, राजकारणात घडणारी प्रत्येक घटना ही महत्वाची असतेच, परंतु बर्याचदा ती रंजक, रोचक अशी ठरते. राजकारण हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यावर महाराष्ट्रातला शाळेत जाणारा शेंबडा पोरगापण टिप्पणी करून जातो, माझ्या संपर्कात अनेक असे धडाडीचे माणसे आहेत ज्यांना त्यांच्या ‘साहेबांचा’ अपमान कधीही सहन होत नसतो. ज्यांचा खरोखर त्यांच्यावर श्रद्धापूर्ण विश्वास असतो... कदाचित तो डोळस असावा.... असो. ( या मोबाईलचा मला फार राग येऊ लागलाय, नेमकी तंद्रीभंग करणे याला अचूक जमत...