विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आपण संचिका मॅडमला ओळखता का? ३

मित्रांनो, नमस्कार ! आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करत आहे. द बेटर इंडिया या वेबसाईटवर आपण याच मालिकेचे इंग्रजी भाषांतर पाहू शकणार आहात. ब्लॉग मालिकेचा प्रयोग आवडल्याबद्दल अनेकांनी वैयक्तिक प्रतिक्रिया दिल्या त्यांचे आभार.. मी असेच नवनवीन विषय आपल्यापुढे या ब्लॉगद्वारे मांडणार आहे, तूर्तास सुरूवात करूया आजच्या ब्लॉगला 

आधीचे भाग वाचण्यासाठी 👈 

पुढे सुरू

आणि, पोलिसांचा मास्टर प्लॅन ठरला – असे काय होते, ज्यामुळे मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचण्यास नागरिक टाळायचे? पोलिसांची भिती त्यांना वाटे, की त्यांच्यावर अविश्वास होता? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संचिका यांना असे प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्यांनी कदाचित संचिका यांची ट्वीटरवर पोलिसांना आणण्याच्या निर्णयाचे एकीकडे कौतुक वाटत असतानाच त्यांची परिक्षाही बघायची होतीच. यावरही संचिका यांनी अगदी मार्मिक उत्तर द्यायचे ठरवले. त्यांनी म्हटले, नेहमी नेहमी काय हो, पोलिसांची कडक इस्त्रीचीच भाषा असते. पोलीस लोकांशी त्यांच्याशी मिळूनमिसळून राहू शकत नाही काय? त्यांना एखादा जोक, चुटकुला सांगवून हसवत, कधी चिमटे काढत शिस्तीचा धडा शिकवू शकत नाही का? यावर वरिष्ठांनी पोलीस स्टेशन हे पार्कसारखं खेळीमेळीत भेटण्याचे ठिकाण आहे का? असा ठिकाणावरचाही सवाल केला. पण, त्यालाही अगदी खुबीने संचिका यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, पोलिसांना भेटायला पोलीस स्टेशन एवढी एकच जागा कशाला पाहिजे, लोक एकमेकांना सोशल मीडियावर भेटतात, मग पोलीस का नाही भेटू शकत?
           (चहाप्रेमी संचिका पांडेय)

मग, पोलिसांना माणसाळवत, त्यांच्यावरील अविश्वास कसा दूर करणार? -   पोलीस विनोद सांगू शकत नाही? पोलीस दिलखुलास राहू शकत नाही? त्यांनाही सिनेमा पाहायला आवडते, क्रिकेट खेळण्यात रस असतो. त्यांनाही  कलाकारांचा अभिनय आवडतो. पोलीस म्हटलं की  प्रत्येक शहराच्या विविध घटकांचा अभ्यास करायचा असतो.  अन, लोकांशी जोडले जाण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधावा लागतो. एखाद्या व्यक्तीचा संदेश आल्यास त्याला उत्तर त्याने संदेशात वापरलेल्या भाषेतच देण्यात यावा. यामुळे लोकांशी तुमची नाळ घट्ट होत जाते. लोकांनी तुम्ही परिचित होत जातात. जर आजच्या पिढीपर्यंत तुम्हाला पोहोचायचे असेल तर तुम्हाला त्यांना आवडणाऱ्या गोष्टींनाच प्रदर्शनाचे प्राधान्य द्यायला लागेल. जर भारत चंद्रावर जाणार असेल तर या गोष्टीचा संदर्भ वापरत आपण सुरक्षेबद्दलची जागरूकता निर्माण करण्यात का वापरू शकत नाही?  अर्थात एखादे ट्वीटर हँडल कितीही सर्जनशील असले तरीही लोकांच्या समस्याही तितक्याच तात्काळ सोडवल्या गेल्याच पाहिजे. याबद्दलही संचिका आग्रही असतात. 

आणि हँडल सुरू झाले -  सोशल मीडियाची खाती सांभाळत त्यांच्यावर देखरेख ठेवणारे पोलीस कर्मचारी हेच मुंबई ट्वीटर हँडलचे खरे नायक ठरतात, संचिका या भूमिकेवर अगदी सुरूवातीपासूनच ठाम राहिल्या आहेत. चोवीस तास सातही दिवस प्रत्येक गरजूचे म्हणणे ऐकले जावे यासाठीच हे लोक झटत असल्याचं त्यांच प्रामाणिक मत आहे. अन, हे असे असल्यामुळेच मुंबई पोलिसांचे ट्वीटर हँडल अतिशय प्रसिध्दी पावलेले आहे.

मुंबई पोलिसांचा हा शिरस्ता राहिला आहे की, येणारी प्रत्येक तक्रार मग ती अनोळखी व्यक्तीकडून असो वा कुठल्याही विचित्र वेळेवर धडकली असो, तिच्याकडे लक्ष दिलेच जायला हवं. कोणाशीही भेदभाव इथे अमान्यच. जास्तीत जास्त लोकांना कळेल त्या भाषा माध्यमातून संवाद साधले जायला हवा. लोकांना धीर देत, सहानुभूती दर्शवत, पारदर्शकता ठेवत, त्यांना विश्वासात घेत, माणुसकीच्या नात्यात जोडत त्यांचे मार्गदर्शन केले जायला हवे. त्यांना योग्य त्या अधिकाऱ्यांशी जोडणी करून द्यायला हवी. सूचक अशी माहिती दिली जायला हवी. 
केवळ कुठलीशी माहिती पोस्ट करणाऱ्या व अजिबातच वाटाघाटी न करणाऱ्या हँडल्सपेक्षा, माहिती देत. जनजागृती करत, संवाद साधत, त्या त्यावेळेसच उत्तर देणाऱ्या हँडल्सची लोकप्रियता निश्चितच जास्त ठरते. इतकेच नाही तर अशा लोकांशी मिळतेजुळते घेणाऱ्या हँडल्सबद्दल लोकांची प्रतिक्रियाही आनंददायी असते. हे असे ट्वीटर हँडलचे स्वरूप ठेवल्याने आता, या हँडलची उपयुक्ततेत तत्काळ मदत करणाऱ्या हँडलच्या पुढची क्रमवारी गाठली आहे. आणि आता, ट्वीटर हँडलचे कौतुक करणाऱ्या अनेक पोस्ट इथे येत असतात.

पोलीसांसोबतचा अवर्णनीय आनंद – पोलिसांच्यासोबत काम करायला मिळणे ही संचिका यांच्यासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट होती. त्यांनी सांगितले.  पोलिसांना सुरूवातीला हे माध्यम समजणेच जड गेले. तरी, उत्तमोत्तम आशय सांगणाऱ्या पोस्ट बनवण्यासाठी पोलीस अगदी आग्रहाने विचारत.मुंबई पोलिसांच्या यशस्वी  ट्वीटर हँडलचा पोलिसांकडे बघण्याची लोकांची दृष्टीच बदलली. लोकांना खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्थेच्या कामाबद्दल समजले. 

मित्रांनो, याआधीचे अन पुढचेही नवनवीन विषयावरील, कथा, कविता, सिनेमा यांवरील ब्लॉग वाचण्यासाठी हा ब्लॉग फॉलो अन शेअर नक्की करा... अच्छा, भेटू पुन्हा लवकरच!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका