पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

महाराष्ट्र हरवला आहे?

इमेज
महाराष्ट्र हरवला आहे! अगदी सोप्प झाले होते सगळंच. जेव्हा तुम्ही एव्हरेस्ट सर केलात मग तरी इतर डोंगर-टेकड्या सर करायला फार ताकदीची, कष्टाची आणि वेळेची गरज नव्हती. १६ मे या दिवशी भारतात नवा इतिहास रचला गेला होता आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला होता. थोड्या ताकदीच्या घटक पक्षांसमवेत महायुतीची ताकद तयार झाली होती. भटक्या विमुक्त जाती, मुस्लीम, मध्यम कनिष्ठ जाती या सगळ्यांची मोठ बांधून मुंडे साहेबांनी महायुतीचे सोशल इंजिनियरिंग करून टाकले होते. परंतु आता त्यांच्या आकस्मिक अनुपस्थितीमुळे जो घाव जनतेला बसला होता त्यावर येत्या १५ तारखेला आघाडी सरकार बुडवून औपचारिक मलमपट्टी होणार होती. प्रचार १२ दिवस झाला काय अथवा दोन दिवस झाला काय, जनतेच्या मनात निकाल तयार होता. पण आधीच घोडेस्वार असलेल्या भाजपचे सरदार आता अधिकच हिंदाकाळू लागले. त्यांच्या अंगभर वीरश्री संचारली. मोदी आणि सहा ही जोडगोळ उठली आणि त्यांनी घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला. एका मागोमाग एक गुऱ्हाळ लावून चर्चा दवडत शेवटी युती तोडलीच एकदाची. युतीसोबत महायुतीही तुटली. मिरर इफेक्ट होत आघाडीही तुटली. आणि आता पंच...

achhe din hai kya ?

मोदी सरकारची वाटचाल आणि जनमत  येत्या २६ तारखेला हायटेक प्रचार आणि प्रचंड जनमताने निवडून दिलेल्या भाजप किंबहुना मोदी सरकारला चार महिने पूर्ण होत आहे. या चार महिन्यांत अनेक निर्णय तात्काळ घेण्यात आलेत. मोदी यांनी भूतान, जपान नेपाळ आणि आता नियोजित अमेरिका देशांचे दौरे केले आणि त्यातून राजकारण न घडता मैत्री आणि करारच घडले. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी झिंग पिंग हे देखील भारताला भेटून गेले. परराष्ट्र धोरण हे अगदीच चाकोरीबाहेरचे असे आहे. अपारंपरिक आहे. यापूर्वी भारताने मोदी सरकारचा शंभर दिवसांचा लेखाजोखा बघितला आहे. हे शंभर दिवस आपण का मोजलेत ? इतर कधीही अशी तुलना करून न पाहणारा भारत देश आणि नागरिक यांनी अशी चाळणी का धरली. यामागेही एक इतिहास आहे, जगाच्या राजकारणात या शंभर दिवसांच्या इतिहासाची सुवर्णनोंद आहे. तो इतिहास काय आहे आणि एकूणच मोदी यांचा चार महिन्यातला प्रवास कसा घडला याचा संपूर्ण आढावा ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी नामदार गोपालकृष गोखले व्याख्यानमालेतून घेतला. गेल्या शनिवारी एच पी टी महाविद्यालात ते बोलत होते.  भटेवरा यांनी मोदींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडताना सांगितल...