विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

achhe din hai kya ?



मोदी सरकारची वाटचाल आणि जनमत 

येत्या २६ तारखेला हायटेक प्रचार आणि प्रचंड जनमताने निवडून दिलेल्या भाजप किंबहुना मोदी सरकारला चार महिने पूर्ण होत आहे. या चार महिन्यांत अनेक निर्णय तात्काळ घेण्यात आलेत. मोदी यांनी भूतान, जपान नेपाळ आणि आता नियोजित अमेरिका देशांचे दौरे केले आणि त्यातून राजकारण न घडता मैत्री आणि करारच घडले. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी झिंग पिंग हे देखील भारताला भेटून गेले. परराष्ट्र धोरण हे अगदीच चाकोरीबाहेरचे असे आहे. अपारंपरिक आहे. यापूर्वी भारताने मोदी सरकारचा शंभर दिवसांचा लेखाजोखा बघितला आहे. हे शंभर दिवस आपण का मोजलेत ? इतर कधीही अशी तुलना करून न पाहणारा भारत देश आणि नागरिक यांनी अशी चाळणी का धरली. यामागेही एक इतिहास आहे, जगाच्या राजकारणात या शंभर दिवसांच्या इतिहासाची सुवर्णनोंद आहे. तो इतिहास काय आहे आणि एकूणच मोदी यांचा चार महिन्यातला प्रवास कसा घडला याचा संपूर्ण आढावा ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी नामदार गोपालकृष गोखले व्याख्यानमालेतून घेतला. गेल्या शनिवारी एच पी टी महाविद्यालात ते बोलत होते. 

भटेवरा यांनी मोदींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडताना सांगितले की मोदी हे ऐतहासिक सत्तांतर घडवून आणणारे देशाचे पंतप्रधान ठरले आहे. मोदी यांनी  स्वतःचा ठसा जनतेवर उमटवला आहे, आणि परराष्ट्र धोरण तर अगदी अपारंपरिक असे ठेवले आहे. नरेंद मोदी यांची थेट तुलना झाली ती फ्रँक्लीन रूझवेल्ट यांच्यासोबत. १९३० साली जेव्हा जगात आणि अमेरिकेत महामंदीचा प्रभाव होता त्या काळात रूझवेल्ट अमेरिका देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. रूझवेल्ट यांच्या काळात अमेरिकेतही आर्थिक घसरण झाली होती आणि ती सावरन्याकरिता म्हणून रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक या दोन्ही पक्षांनी रूझवेल्ट यांना पाठींबा दिला, अर्थात नरेंद्रभाई यांना मात्र विरोधकांचे समर्थन मिळवून नव्हे तर टीका करून दिल्ली जिंकता आली, अमेरिकेत मात्र या विरुद्ध परिस्थिती होती. रूझवेल्ट यांनी त्या काळात १०० दिवसांत अनेक विधेयके पारित करून घेतली. १५ विधेयकांचे त्यांनी कायद्यात रुपांतर केले. अशा प्रकारे मग अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात आली. जगाच्या इतिहासामध्ये रूझवेल्ट यांचे हे काम मैलाचा दगड ठरले आणि मग तेव्हापासून १०० दिवसांचा मापदंड लावून कुणाही नव्याने सत्तेवर आलेल्या नेत्याची मोजमाप करण्याची प्रथा सुरू झाली. मोदी यांनी काँग्रेस सरकारवर टीका करताना लोकांच्या अपेक्षांना केंद्रित करून घेतले. आणि आपल्या देशाची डळमळीत अर्थव्यवस्था पाहून लोकांच्या मानत खास करून उद्योग जगात मोदी यांना सत्तेवर बसविण्याची मोठी घाई झाली होती. 

भटेवरा यांनी त्यांच्या व्याख्यानात कॉँग्रेसच्या पराभवाची मीमांसा करताना सांगितले की जानेवारी २०१३पासूनच सरकार नैराश्यात गेले होते. या महिन्यातील चिंतन बैठकीत भटेवरा यांना कोमेजलेल्या काँग्रेसचे दर्शन झाले. आणि नेतृत्वाची धुरा सांभाळणारे राहुल गांधी राजकीयदृष्ट्या अपरिपक्व दिसले. तर दुसरीकडे मोदी यांचा हायटेक प्रचार, चाय पे चर्चा, राजकीय आणि औद्योगिक ताकद यांचा परिणाम मतदानात दिसून आला. 

यापुढे सुरेश भटेवरा यांनी मोदी यांचे अर्थकारणावर आपला मोर्चा वळवला. करमुक्त बजेट, काळा पैसा आणि रेल्वे बजेट विषयक सूक्ष्म समीक्षण सरांनी केले. अत्यंत कमी काळातील हे बजेट कधी सदर होतंय अशी अंबानी, अडाणी यांसारख्या उद्योगवर्गाला घाई झाली होती. यापुढे सरांनी करप्रणाली वर भाष्य करताना शरद पवार यांच्या काळाचे उदाहरण दिले. शरद पवार यांच्या सरकारवर मुंबई स्फोटाचे ओरखडे होते आणि तरीही अशा परिस्थितीत मुंबईत वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पवार यांनी उभे करून दाखवले होते, जिथे आज रोज करोडोंच्या उलाढाली होतात. नवीन आलेल्या कराबद्दलही सरांनी चर्चा केली. जी एस टी आणि एफ डी आय या करांना कधीकाळी भाजपने विरोध दर्शवला होता आणि आज त्यांनीच तो आमलात आणायचे ठरवले आहे. सरांनी पुढे परराष्ट्र धोरणाला हात घातला.

परराष्ट्र धोरण, सरंक्षण क्षेत्र आणि कमजोर देश असणार्या भारताचे पंतप्रधान अतिशय हट्टी स्वभावाचे असे आहे. भारत-जपान करार असेल, सोशल मीडियावर हिंदीचा सक्त वापर असे धोरणे राबविणारे मोदी यांनी अजूनतरी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. कृषी ही उपेक्षित राहिली आहे.  मोदी यांनी त्यांच्या पसंतीचा स्टाफ नेमला आहे. गुजरातमधीलच त्यांचे भिडू हे केंद्रात त्यांनी नेमले. मंत्री लोकांना अत्यंत धारेवर धरण्याचे धोरण मोदी राबविताना दिसतात. शिस्तबद्धता आणि कर्मचारी गुणवत्ता पुरस्कार ही त्यांची वेगळी आल्हादक कामे. रशिया भारत हा मैत्र वाढविणारा करार मोदी यांनी केल्याचे सरांनी सांगितले. शपथविधीला सार्क देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने तसेच नेपाळ, भूटान, ब्रिक्स समेट, जपान आणि आज अमेरिका या सर्व देशांत मोदी यांनी शुभ आणि आश्वासक कार्य करून जगाशी मैत्री घट्ट करण्याचा दृढ दृष्टीकोन समोर ठेवला असल्याचे समजूण येते. आणि हे कौतुकास्पद आहे. 

मोदी यांच्या बाबतीतील वादग्रस्त मुद्यांवरही भटेवरा यांनी कुठेही टीका न करता त्रयस्थ परीक्षण केले. त्यात प्रामुख्याने मांडलेले मुद्दे म्हणजे लोकपाल, विरोधी पक्ष नेता यांची न केलेली निवडणूक. राज्यपाल नाट्य असेल, वा १२ वी पास स्मृती इराणी यांच्याकडे आलेले मनुष्यबळ विकास मंत्रिपद यावरही सरांनी चर्चा केली. स्वस्त लोकप्रियता मोदी नेहमीच मिळवू पाहत आहे. लैंगिक शोषण आरोप असणारे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असण्याबद्दल भटेवरा यांनी अचंबा व्यक्त केला. अन्न सुरक्षा कायदा आणि दिल्लीकरांचा महाराष्ट्रावर असलेला आकस याबद्दलही भटेवरा सरांनी जमलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सुरेश भटेवरा यांनी व्याख्यान संपल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांच्या दहा प्रशांची उत्तरे दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi