विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

ऑनलाईन व्यवसाय सुरू करा, वाचा खास टीप्स

Monsoon sale 50% off

जरी तुमचं स्वतःचं दुकान आहे. स्वतंत्र अथवा भाड्याच्या जागेत व्यवसाय सुरू आहे. अथवा, तुम्ही अगदी मंडईत किंवा चौकात दुकान लावत असाल. आजच्या काळाची, आजच्या युगातील ग्राहकांची गरज तुम्ही ओळखायलाच हवी. तुमचा ग्राहकवर्ग हा तुमच्याकडे चालत येणाऱ्या लोकांपैकीच जरी असला तरी तुम्ही मात्र त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला तयार करा. मानवनिर्मित वा नैसर्गिक कोणत्याही छोट्या- मोठ्या संकटात तुम्हाला व्यवसाय कमी वा बंद करायला लागू नये, म्हणून ऑनलाईन व्यवसाय स्थापना करण्याविषयी तुम्हाला जितका लवकर निर्णय घेता येईल ते बघा. काळ फार झपाट्याने बदलत पुढे जातो. प्रश्न निर्माण होतात, तशी त्यांची उत्तरेही काळाप्रमाणे बदलत राहतात. आज तुमचा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर त्यासाठी एकच महत्त्वाचा पर्याय तो म्हणजे, getting your business online. 

 आत्ताच सुरूवात करा -  तुम्हाला व्यवसायाची ऑनलाईन स्थापना करण्यासाठी विशिष्ट दिवस, परिस्थिती कधीही आड येवू शकत नाही. तुम्ही कोणत्याही वेळी त्यासाठी प्रयत्न सुरू करू शकतात. लोक आता फक्त ईमेल तपासण्यासाठी ऑनलाईन येत नाहीत. ते सिनेमाची तिकीटे काढतात. खेळणी, कपडे विकत घेतात, कॅब बुक करतात, टेलीफोन बिले भरतात. डेटिंगला जातात, विवाह ठरवतात, अन्य बरंच काही लोकांचे ऑनलाईन सुरू असते. या सर्व गोष्टींकडे अत्यंत सकारात्मक व संधी म्हणूनच आपण पाहायला हवे. डिजीटल माध्यमांचा सतत अभ्यास करत राहा. त्यातील गोष्टी कायम बदलत्या आहेत. अन. तुम्हालाही याची जाणीव करून घ्या. 


ऑनलाईन व्यवसाय पण, कसा? -  ऑनलाईन विश्वात तुमची गरज असेल तशी तुम्हाला उत्तरे मिळत जातील. तुम्ही फक्त शोध घेत राहायला हवा. सोशल नेटवर्किंगद्वारे लोकांशी संबंध प्रस्थापीत करा, ऑनलाईन विक्री करा, नवीन ग्राहक शोधाच, पण सध्याच्या ग्राहकांनाही तुमच्याशी जोडून ठेवा.

समजा, अ व्यक्तीचे केशकर्तनालय एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर, साहिजकच त्याचे उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांचे कस कापणे हे आहे. सोबतच सौंदर्य खुलवण्यासाठी आवश्यक सुविधा देणेही आलेच.  पण, त्याला दुकानातील ब्युटी प्रॉडक्टची विक्रीही करायची आहे. पण, जास्तीत जास्त लोकांना हे कसे समजणार?  हे एक मुख्य उद्देश्य व्यवसाय ऑनलाईन केल्याने साध्य होणार आहे. इथे सगळ्यात सहज मार्ग म्हणजे आपल्या केशकर्तनालयाची नोंदणी ऑनलाईन डिरेक्टरी, सर्च इंजिनमध्ये करणे होय. जेव्हा केशकर्तनकारांचा शोध घेण्यासाठी जेव्हा लोक ऑनलाईन येतील तेव्हा, तुमची माहिती वाचूनच ते तुमच्याकडे आत्मविश्वासपूर्वक येऊ शकतात. मग, कदाचित तुम्हाला तुमची वेबसाईट असावी असेही वाटू शकते. ऑनलाईन डिरेक्टरीत असणाऱ्या केवळ नोंद असून तुम्हाला मोठा फायदा होईन असे नाही. कधीकधी इतरही केशकर्तनालयांची माहिती दिसल्याने ग्राहक तिकडे ओढला जाण्याची शक्यता असते. 

वेवबसाईट च कशासाठी – डिजीटल अस्तित्व निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवलेल्यांसाठी वेबसाईट असणे अतिश गरजेचे आहे. आपल्या व्यवसायाची माहिती, पत्ता, नकाशे, फोन नंबर, तुमच्या वस्तू, सेवांच्या किंमती याबद्दल लोकांना पटकन ज्ञान प्राप्त होऊ शकते. जेव्हा कुणी त्या त्या भागातील केशकर्तनालयांचा शोध घेईल, तेव्हा तुमचे केशकर्तनालय सर्च रिझल्टच्या पहिल्या पानावर झळकले तर, लोक तात्काळ तुमची वेबसाईट तपासतील. तिथे दिसणाऱ्या फोटो, व्हिडिओमुळे त्यांची पाऊले तुमच्याच दुकानाकडे वळतील. तुमच्या फेसबुक, ट्वीटर पेजवरून, तुम्ही नवनवीन, ट्रेंडिग हेअरसस्टाईल, ब्युटी प्रॉडक्ट, मेकअप कीट, डिस्काऊंट, यांबद्दल सांगू शकतात. ज्यामुळे ग्राहकांनाही तुमच्याकडे येण्याची ओढ लागू शकते.
 


ग्राहक कसे बनवणार ? – हा अगदी रास्त प्रश्न ठरू शकतो. याचं कारण आपला व्यवसाय ऑनलाईन तर झाला. वेगवेगळ्या गोष्टीही प्रदर्शित करून झाल्या, पण आता पुढे काय? अर्थातच पुढील लक्ष्य म्हणजे वेबसाईट व्हिजिटर्सना तुमचे ग्राहक बनवणे हे होय. यासाठी वेबसाईटलाच तुम्ही काम करण्यास सांगू शकतात. यासाठी अनेक मार्ग खुले असतात. तुम्ही वेबसाईटवर रिव्ह्यू टॅब देऊन, लोकांना तुमचे कौतुक करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. लोकांकडून मिळणारे कौतुक तुमच्याकडे ग्राहकच आणणार नाही, तर अनेकांना दुकानात येण्याअगोदरच तुमच्याकडून सेवा घेण्याचे निश्चित केलेले असेल.  दुकानातील ब्युटी प्रॉडक्ट, वस्तू विक्रीसाठी ई-कॉमर्स सेक्शन आपल्या व्यवसायातत सुरू करणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. यातूनही अनेक ग्राहक तुम्हाला जोडले जातात. आता, तुमच्या योजनांत तुम्ही यशस्वी ठरत आहात की नाही, याची तपासणी फक्त करत राहायला हवे. ज्याला आपण Analytics हा शब्द वापरतो. व्यवसायची प्रगती होण्यासाठी कोणते घटक उपयोगी ठरत आहेत. तुमच्या योजनांमुळे किती फायदा होतोय, काय मारक ठरतेय या सगळ्यांचा अभ्यास अगदी बारकाईने करून पुढील निर्णय घेत राहणे गरजेचे आहे. 

क्रमश:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका