विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

वेबिनार, मॉक टेस्ट आणि परीक्षा - ऑनलाईन परिक्षांचे हे तर नवे स्वरूप

वेबिनार, मॉक टेस्ट अन परीक्षा 

कसे असेल आता, परिक्षांचे स्वरूप ?
कोरोना अजूनही भारतातून गेलेला नाही. मात्र, तरीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचीच भूमिका आता सरकारला घेणे भाग पडणार आहे. शक्यता अशी आहे की या परीक्षा ऑनलाईन पध्दतीनेच घेतल्या जातील.

 ऑनलाईन परीक्षा घेताना, अनेक गोष्टी आपल्याला नव्याने कराव्या लागणार आहेत. नेहमीप्रमाणे एक्झाम सेंटर्सवर जाऊन या परीक्षा होऊ शकणार नाहीये. याचे कारण स्पष्टच आहे. कोरोनाची लाट आली असल्यामुळे जवळपास परीक्षा रद्देचा निर्णय घेण्याचा विचार सुरू होता. शेवटच्या वर्षांसाठी तो मंजूर झाला नाही. यामुळेच आता विद्यार्थ्यांना जोमाने अभ्यासाला लागावे लागणार आहे. इतकंच नाही तर, एमपीएससी, युपीएससी या परिक्षासुध्दा घेतल्या जाऊ शकतात. याबद्दलची ही आहे लेखनमीमांसा. 

 नॅशनल टेस्टींग एजन्सी तर्फे मला काल एक मेल रिसीव्ह झाला. ही एजन्सी भारत सरकारसाठी काम करते. ही एक स्वायत्त संस्था आहे. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कठीण परीक्षा आयोजनाचे कार्य NTA करते. या एजन्सीचे कार्य सुरू झाले त्यावेळी १८ परिक्षांचे आयोजन त्यांनी केले होते. ज्यांचा सामना ६९ लाख विद्यार्थ्यांनी केला होता. तर, माझीही एक परीक्षा घेण्यासाठी संबंधित केंद्रिय शासन विभागाने या संस्थेला विनंती केली होती. त्यानुसार लवकरच ते माझी परीक्षा घेणार आहेत. 


OBT WITH REMOTE PROCTOR – ही संस्था ऑनलाईन बेस्ड टेस्ट विथ रिमोट प्रॉक्टर घेणार आहे. हे काय आहे? तर, ही ऑनलाईन परीक्षा तुमच्या घरातून तुम्हाला द्यावी लागणार आहे. बरं, त्यात वेगळेपण काय? याआधी दिलेल्या ऑनलाईन टेस्ट या सर्व्हर बेस्ड होत्या, त्यातील लेखी टेस्ट देताना मात्र आपण कधीही वेबकॅम (मुलाखत सोडून) वापरण्यात आला नव्हता. यावेळी मात्र NTA ज्या परीक्षा घेणार त्या तुम्हाला WEBCAM  समोर बसून द्याव्या लागणार आहेत. आतापर्यंत, आपण मीटींग लॅपटॉप, डेस्कटॉप समोर केली आहे. पण, आता परिक्षाही त्याच प्रकारे द्यावी जाणार आहेत. कोरोनामुळे आपापल्या घरी किंवा जिथे राहत असू तिथे PLACE OF STAY(POS) द्यायची आहे. बाहेर सेंटरवर जाण्यासाठीही भेटावयाचे नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे HIGH SPEED INTERNET, LAPTOP/DESKTOP/ WEBCAM Microphone/ Headphones अत्यंत आवश्यक आहेत. तेव्हा त्याची व्यवस्था जर नसेल तर आत्ताच ती करून ठेवा. पुढील काळातील परीक्षा घेण्यासाठी ही पध्दती अवलंबली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

वेबिनार – माझ्या उदाहरणाबाबत सांगायचे झाल्यास टेस्ट कशी होणार याबाबत ओळख करून देण्यात येणार आहे. त्यासाठी वेबिनार चा आधार घेतला जाणार आहे. हा वेबिनार दोन तासांचा असेल. यात विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाणार आहेच. पण, तत्पूर्वी परिक्षा घेण्याच्या पध्दतीबद्दल जागृती करण्यात येणार आहे. 

मॉक टेस्ट – मॉक टेस्ट हा प्रकार परिक्षांच्या विद्यार्थ्यांना नवीन नाही. ज्याप्रकारे शाळेत चाचणी परिक्षा असायच्या, दहावीला प्रीलीम्स व्हायच्या. मॉक टेस्टही त्याचंच प्रौढ स्वरूप आहे. मॉक टेस्ट दिवसभर घेतली जाणार आहे. ज्यात विद्यार्थी जवळपास तीनवेळा ऑनलाईन परीक्षा देतील. त्याची प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येईल. जी अर्थातच मुख्य परिक्षेहून वेगळी असेल. मॉक टेस्ट दरम्यान जर काही तांत्रिक समस्या जाणवली तर तात्काळ तंत्रसहाय्यकांची टीम संपर्क करून मदत करणार आहे. मॉकचाही अंतिम निकाल समजू शकणार आहे.  

परीक्षा – ऑनलाईन बेस्ड टेस्ट विथ रिमोट प्रॉक्टर साठी तयारच व्हा मित्रांनो. आतापर्यंतच्या ऑनलाईन टेस्टमध्ये फक्त टेक्स्टशी आपला संबंध यायचा. कोणत्याही प्रकारे तिथे वेबकॅम नव्हते. तेव्हा, यंदा अशा प्रकारची परीक्षा द्यावी लागलीच तर गांगारून जाऊ नका. चित्त शांत ठेवा. अन, हे जे काही सांगितले ती एक शक्यता म्हणूनही आपल्याला पाहायला हवं. प्रत्येक परिक्षा अशा पध्दतीने होईन असे निश्चित नाही. तुमच्याकडे जर अशा प्रकारची परिक्षेसाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध नसल्यास जिथून तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्हाला जाता येणार आहे. यामुळे आगामी काळात अशा प्रकारे ऑनलाईन बेस्ड टेस्ट विथ रिमोट प्रॉक्टर देण्याची किमान शहरे, मेट्रो सिटीतील विद्यार्थ्यांनी तरी तयारी ठेवायची आहे. 

ऑनलाईन बेस्ड टेस्ट विथ रिमोट प्रॉक्टर साठी आवश्यक काय?
लॅपटॉप/ डेस्कटॉप – रॅम २ जीबी व जास्त
बिल्ट-इन मायक्रोफोन – एक्सर्टनल मायक्रोफोन
वेबकॅम – 640*480 @ 15fps – एक्सर्टनल व इंटर्नल कसाही
इंटरनेट स्पीड - १ एमबीपीएस – वायर्ड किंवा वायरलेस
प्रोसेसर – २ कोअर किंवा जास्त
ओएस – विंडोज १० (प्रो, एंटरप्रायजेस, एज्युकेशन एडीशन) किंवा विंडोज ८/८.१ (३२ बीट, ६४ बीट), विंडोज ७ (३२ बीट, ६४ बीट)
ब्राऊझर – लेटेस्ट क्रोम ब्राऊझर, .Net version 4.5.2 or above

Secured एक्झाम ब्राऊझर  लिंक तुम्हाला देण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका