विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

गुलाब - प्रेयसीवर रचलेली मराठी कविता

दिसते सुंदर गुलाबी फुलाप्रमाणे
हसतेस जेव्हाही तू झऱ्याप्रमाणे
डोळ्यातूनी डोळ्यांशी बोलतेस तू
दाटलीस माझ्या मनाशी धुक्याप्रमाणे
पहाटेच्या कोवळ्या किरणामधूनी
तू भेटतेस मला उन्हाच्या नक्षत्रातूनी
तुझ्या आठवणींचा डाव रंगत गेला
उमलली याद, तेव्हा स्पंदनातूनी

beautiful girl with leafes in hand
Representative image



घडते उरात काही धडधड की काही
समजून येईना आता माझेच मला
पळभर मला डोंगर चढावेसे वाटले
नजरेने कसा जीव वेडापिसा झाला
लहरी लहरीतून येतेस सुगंधाप्रमाणे
हसून पाहता जीवाचे होई जळणे
हात प्रेमाचा जेव्हा खांद्यावर येई
त्याचे सांग कसे फेडणार मी पारणे
समुद्राची गाज कानात रे गुंजते
तू माझ्याशी जेव्हा मनातलं बोलते
कधी होतील पूर्ण सारे स्वप्न दिवाने
झुरतो विशाल हा कुणा चातकाप्रमाणे
दिसते सुंदर गुलाबी गुलाप्रमाणे
हसतेस जेव्हाही तू झऱ्याप्रमाणे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका