मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
व्यवसायाची मार्केटींग ही
अविरत चालणारी प्रक्रिया असते. रोजच्या रोज त्यात विविध गोष्टींची नवीन भर घालणे,
वारंवार लोकांना आपल्या वस्तुंची माहिती लोकांना देत राहणे, त्यात रोज नवीन एखादी युक्ती वापरून
वस्तूचे आकर्षण वाढवणे यामुळे आपली मार्केटींग अत्यंत प्रगल्भ होत जाते. यामुळे
तुमच्या ग्राहकांना तुमच्यावर विश्वास बसू लागतो. हळूहळू तुम्ही ग्राहकांवर प्रभाव
पाडू लागतात. मेहनत घेत राहिल्याने ग्राहकांनासुध्दा तुमच्या वस्तू किंवा सेवेत रस
निर्माण होतो. तेव्हा आपला ग्राहक हा
व्यवसायापासून तुटू नये यासाठी अविरत प्रयत्न करत राहणे आवश्यक असते. डिजीटल
मार्केटींग क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. एकच वस्तू अगर सेवा देणाऱ्या अनेक
कंपन्या, संस्था रोजच निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपलं नाणं ग्राहकापर्यंत
खणखणीतच वाजलं गेलं पाहिजे. अन त्याचा नाद सतत होत राहील याची पण आपण काळजी
घ्यायला हवी.
रोजचा रोज संपर्क होत
राहावा यासाठी म्हणूनच रोजच्या वापरांतील गोष्टींचा मार्केटींगसाठी उपयोग करावा
लागतोच. त्यामुळेच या गोष्टी डिजीटल मार्केटींगमधील नियोजनबध्द साधन म्हणून समोर
आले आहेत. यात प्रामुख्याने सोशल मीडियाचा मोठा समावेश झाल्याचे आपल्याला पाहायला
मिळाले असेल. विक्रेत्याची वस्तू किंवा सेवा त्याला विकण्यासाठी रोजच कोठेही न
जाता अगदी कमीत कमी कष्ट व खर्चात विक्री करता येणं ही डिजीटल मार्केटींगमधील
आव्हानात्मक गोष्ट बनली आहे. अन, याच एका कामासाठी सोशल मीडिया हे डिजीटल
मार्केटींग करण्यासाठी प्रथम पसंतीचे साधन झाले आहे. सोशल मीडिया मार्केटींग हे एक
क्रांतिकारी माध्यम ठरत आले आहे. याचे महत्व आज वाढताना दिसते आहे. सोशल मीडिया
मार्केटींग हे ग्राहकांशी थेट संवाद साधत आपल्या वस्तुबद्दल त्यांना कुतूहल
निर्माण करून देत, तिची विक्री करण्यासाठी सर्वोत्तम साधन म्हणता येऊ शकते.
सोशल मीडियावर आज कपडे,
किराणा, ईलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आदी गोष्टी ज्यांची दुकाने बाहेरही आपल्याला
मोठी उलाढाल बघायला मिळतात. त्यांचीही अधिकृत खाती दिसतात. यातून अनेकजण थेट
विक्री तर करतातच. पण, सोशल माध्यमांवरून थेट संवाद, प्रश्नोत्तर, शंका निराकारण
यंसारख्या सेवाही अनेक व्यावसायिक रोज करत असतात. जिथे जिथे ग्राहक पोहोचू शकतो
आहे तिथे तिथे व्यावसायिकाला त्याचे अढळ स्थान निर्माण करावेच लागते. आज सोशल
मीडियावर असल्याने फेव्हिकॉल ब्रँडसोबत ती लोकही जोडली गेली आहेत, जी रोज एक कागदही
दुसऱ्या कागदाला चिटकवत नसतील.
जाहिरात क्षेत्रात ही टर्म आपल्याला सर्रास ऐकायला मिळते. जवळपास प्रत्येकाला याची जाणीव असते. अगदी प्रत्यक्षपणे होत नसली तरी काही लोकांची कृती अशीच असते. त्यांच्याकडे असलेल्या कंटेट अन त्याचे व्यवस्थित, चोख प्रेझेंटेशन. यावरच त्यांची मार्केटींगची गाडी सुसाट धावत जाते. याचमुळे डिजीटल मार्केटींग क्षेत्रातही या संकल्पनेनेच पाय रोवलेले आहे. अन, दबदबाही ठेवला आहे. याचमुळे अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट कंटेट तयार करणाऱ्यांना बक्कळ पैसे मोजून स्वतःच्या पदरी ठेवलेले आहे. तर, याच कंटेट मॅमेजमेंट, मार्केटींगमध्ये व्यावसायिकही चांगले पैसे कमावताना दिसतात. त्यामुळेच डिजीटल मार्केटींगच्या केंद्रस्थानी गोळीबंद, ठसठशीत असा कंटेट असतो. कंटेट हा कोणत्याही मार्केटींगचा आत्माच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच इंग्रजीत एक फ्रेज निर्माण झाली, कंटेट इज किंग अर्थात कंटेट हाच राजा.
जी कोणतीही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल, तर त्या गोष्टीत मांडण्यात काय आलं आहे. ते बघितले जाते. जे आपल्याला वाचावसं वाटतं, एखाद्या विषयावर लिहावंसं वाटतं. यापाठी जे कारण आहे, त्यालाच कंटेट असे म्हणता येईल. कंटेट म्हणजे आशय. ते ही नुसताच आशय नाही. तर साचेबध्द आखीव-रेखीव मांडणी केलेला आशय. त्यालाच आपण कंटेट म्हणू शकतो. कंटेटबद्दल हे जरी मी सांगितलं असलं तरी कंटेट म्हणजे एवढंच नाही. कंटेट समजून घ्यायचा झाला तर आपल्या विचारांच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत. कंटेट म्हणजे विचार, विचारांचे सार, विचारांचे संकलन, विचारांची मांडणी या सगळ्यांनाच आपण कंटेट म्हणू शकतो. डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात तर कंटेट किती विविध माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. लोकांना जे जे आवडू शकेल, आवडते अशा सर्वच गोष्टींना आपण कंटेट असे संबोधायला हवे. कंटेट म्हणजे केवळ माहितीचा फाफटपसारा असलेला मजकूर नव्हे. तर त्याची सुसुत्रबध्द पध्दतीने करण्यात आलेली मांडणी होय. अशा प्रकारे मांडणी केल्याने ग्राहकांवर प्रभाव टाकता येऊ शकतो. हा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहिल्याने आपली मार्केटिंग यशस्वी होत राहते. रस्त्याने भाजी विकत जाणारा भाजीवाला जर फक्त भाजी, भाजी करत गेल्यास त्याला कदाचित अल्प प्रतिसाद मिळेल, नेहमीचेच ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होऊन येतील. मात्र, हीच नेहमीची हारोळी त्याने गाण्याच्या चालीवर त्याचे शब्द योजून म्हटले तर जी व्यक्ती त्याच्याकडून भाजी घेणार नसेल तो ही त्याच्याकडे आकर्षित होईल अन त्याच्याकडून भाजी विकत घेईल. कंटेट हे तुमच्याकडे ग्राहकांना खेचून आणणारे शक्तिशाली साधन आहे. म्हणजेच डिजीटल मार्केटिंगमध्ये कंटेंट हाच राजा आहे.
कंटेट ऑप्टिमाईज असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पण, ऑप्टिमाईज कंटेट म्हणजे
नक्की काय? ऑप्टिमाईज म्हणजे ती जादूची
कांडी जी फिरवल्यावर ग्राहकांना वाचता येण्यास सुलभ असा मजकूर आपण तयार करू शकतो.
केवळ मजकूरच नव्हे तर इतर प्रत्येक माध्यम, ज्यात कंटेटचा प्रामुख्याने वापर केला
जातो ते सर्वच ऑप्टिमाईज केलेलेच असतात. असे ऑप्टिमाईज कंटेट ग्राहक पसंतीस उतरतात.
ज्याने करून अशा कंटेटची विभागणी मग ग्राहकच सर्वदूरपर्यंत पोहोचवतो. यामागचे
मुख्य कारण म्हणजे ग्राहकाला विविध गोष्टी इतरांशी शेअर करत राहण्याची लागलेली सवय.
यामुळेच डिजीटल मार्केटिंग करताना ऑप्टिमाईज कंटेट तुम्हाला प्रसिध्द करून देण्यात
हातभार लावतो.
1.
ज्या विषयावर लेख लिहायच आहे, त्याचे पूर्ण आकलन हवे.
2. विषयाची मांडणी मुद्देसुद हवी. त्यातून विषयाचा विकास होत गेला पाहिजे. त्यात तर्कशुध्दता हवी. एकातून दुसरा मुद्दा उपस्थित झाला, एवढी सहजता असावी.
3. सुरूवात आकर्षक असावी व शेवट ठाम असावा. म्हणजेच त्यात वैचारिक स्पष्टता असावी.
4. शब्द, वाक्य, उद्गार, विधाने, सुभाषिते, म्हणी इत्यादींचा योग्य वापर असावा.
5. शैली सहज-सुंदर व ओघवती हवी.
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा