मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
नमस्कार मित्रांनो. बऱ्याच जणांना आपला व्यवसाय ऑनलाईन करायचा आहे. अन त्यासाठी त्यांना Amazon चा पर्याय आवडतो आहे. पण, त्यांना अगदी सुचक असा प्रश्न पडतो की Amazon सेलर व्हायचे कसे. या वेबसाईटवर आपला व्यवसाय कसा स्थापन करायचा. त्याबद्दलची फी किती घेतली जाणार, त्यातून मला किती, कसे पैसे मिळणार, मालाची डिलीव्हरी मी करायची की Amazon करून देणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या ब्लॉगद्वारे देण्याचा प्रयत्न करेल. तरीही काही शंका असल्यास आपण मला ब्लॉगवरील संपर्क फॉर्मद्वारे किंवा कमेंट्समध्ये विचाराव्यात.
व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला व्यावसायिक असल्याची नोंदणी करणे आवश्यक असते. जसे, तुम्ही तुमच्या दुकानांची नोंदणी शासनदरबारी करून घेतली आहे. तसेच इथेही तुम्हाला Sell on Amazon या लिंकवर जाऊन सेलर अकाऊंट सुरू करून घ्यायचे आहे. त्याशिवाय आपल्याला या वेबसाईटवरून व्यवसाय करता येणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया असून यासाठी तुम्हाला फक्त १५ मिनिटांचा अवधी लागतो.
तुमचे सेलर अकाऊंट तयार झाले की, तुम्हाला सेलर सेंट्रल डॅशबोर्ड मिळतो. ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट विक्री करणे सुलभ होण्यासाठी हे पोर्टल तुम्हाला उपयोगी पडते.
Upload your listings
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमच्या प्रॉडक्टची मांडणी या ऑनलाईन दुकानात तुम्हाला करायची आहे. यासाठी तुम्ही सेलर सेंट्रल चा वापर करावा. याखेरीज तुम्ही सेलर App चाही उपयोग करू शकतात.
जर तुम्हाला प्रॉडक्ट फोटोग्राफी, वर्गवारी किंवा विक्रीसंदर्भात कोणतीही समस्या आलीच तर सर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क इथे तुम्ही संपर्क करावा.
Customer see and buy products on amazon
तुमच्या प्रॉडक्टची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ग्राहक Amazon वर तुमचे प्रॉडक्ट बघू शकतील. तसेच ते तिथून विकतही घेऊ शकतात. अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला जाहिरातीही कार्यन्वित करता येते. Amazon fulfilment चा पर्याय आपण निवडला असल्यास Amazon Prime प्रॉडक्ट म्हणून आपल्या वस्तुला लौकिक प्राप्त होतो.
Product Delivery
जेव्हा तुमच्या प्रॉडक्टसाठी ऑर्डर देण्यात येते. तुम्हाला ईमेलद्वारे तसेच सेलर डॅशबोर्डद्वारे याची सूचना देण्यात येईल. जर तुमच्याकडून Fulfilment पर्याय स्वीकार झाला असेल, तर त्या प्रॉडक्टच्या डिलीव्हरीची सर्व जबाबदारी Amazon घेते. त्यासाठी अगदी स्टोरेज, पिकींग, पॅकिंग, शिपिंग या सगळ्या गोष्टी प्राधान्याने पूर्ण केल्या जातात.
जर तुम्ही Fulfilment स्वीकारले नसेल तर तुमचे प्रॉडक्ट Easy Ship सेवेद्वारे तुमच्याकडून कलेक्ट करण्यात येते, त्यासाठी एक ते दोन दिवसांचा अवधी जाऊ द्यावा लागतो. त्यानंतर Amazon च्या जागतिक दर्जाच्या शिपिंग सेवेने ते प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येते.
जर तुमच्याकडे दुकान आहे. जिथे तुम्ही वस्तू ठेवू शकतात. तसेच ऑर्डर आल्यानंतर एक ते दोन दिवसांत तुम्ही तुमच्यातर्फे प्रॉडक्टची डिलीव्हरी लोकल क्षेत्रात करू शकत असाल तर प्राईम बेनिफिट्स न घेताही तुम्ही सेलिंग करायला हरकत नसते. त्यासाठी लोकल दुकाने ज्या भागात आहे, तेथील पिन कोडची नोंदणी तुम्हाला करता येते.
Payments recceiving
पे ऑन डिलिव्हरी ऑर्डरसहीत तुमचे पेमेंट्स (Amazon Seller fees) वगळून तुमच्या बँक खात्यात प्रत्येक सात दिवसांनी डिपॉझिट केले जाते. या सगळ्यांची नोंदणी तुम्हाला सेलर सेंट्रल डॅशबोर्डवर अपडेट होताना दिसेल.
Important Links
Amazon Business Account Sign up - register
Complete useful guide about amazon selling - buy
see new release books - New Releases
hassle free reading with kindle - Kindle Store
व्यवसाय किंवा कंपनी सरकारकडे रजिस्टर असली पाहिजे का ?... Amazon वर नोंदणी करण्यासाठी GST नंबर लागतो..तो वैयक्तिक मिळतो की रजिस्टर कंपनी व रजिस्टर व्यवसाय असलेल्यांना मिळतो...
उत्तर द्याहटवाजीएसटी रजिस्टर कंपनीसाठी अनिवार्य आहे. तो वैयक्तिकरित्याही घेता येतो. त्यानंतरच तुम्ही Amazon वर व्यवसाय नोंदणी करू शकाल.
हटवा