पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

सैराट झालं जी

सैराट झालं जी अंग तडाडलं पावसामदी अन आभाळाला याद आलं जी, सैराट झालं जी ! शहरातील धकाधक, रोजची वर्दळ, माणसांची कोंदट गर्दी, या सगळ्यांच्या प्रदूषणाने काळवंडून जायला व्हतं, ...

एक संवाद

एक संवाद ना: अध्यात्म, म्हणजे काय ? आ: आत्म्याशी अधिक एकरुप होणे ! ना : पण कसे शक्य आहे ते ? आ : का नाही ? त्यासाठी ध्यान हा पासवर्ड आहे. ना : म्हणजे फक्त डोळे मिटून बसायचं का ? आ : नाहीच मुळ...

Encoding- डिकोडींग

Encoding -डीकोडींग कसेही बटन दाबून मनातला वैताग तिने कीबोर्डवर काढायला सुरुवात केली, पण उपयोग नव्हता, कारण तिचा मनस्ताप कमी त्याने कमी होणार नव्हताच. आयुष्यात येवून काय कमावले यावर विचारच करता येत नव्हता तिला, आताही तसेच आयुष्याने काय शिकवले हे सांगत बसली तर कित्येक रात्री अपुऱ्या पडतील इतकी अनुभवांची शिदोरी कंबरेला खोचुनच ती फिरत असायची. गर्दीतून, गर्दी ती निव्वळ लोकांची नाही तर तिच्याकडे हिणकस, किळसवाण्या, कधी कधी बीभत्स नजरेने न्याहाळनाऱ्या लोकांची गर्दी, या सगळ्या गर्दीला तिला रोजच्या रोज सामोरे जावे लागत असे, कारण त्या गर्दीपासून तोंड लपवून लांब, पळून जाता येत नव्हतं, रोजच्या जगण्यासाठी, जगण्याच्या झगड्यासाठी घराबाहेर तिला बाहेर पडावेच लागत होते. आजवर कुठेही न डगमगता, जराही न लाजता, जे पाहिजे होते ते ते मिळवत आली होती ती, समाजाचे पण एक विचित्र असते, एक तराजू तिला गुणी तोलत होता, तर एका तराजूने तिला कवडीचेही दाम दिले नव्हते, लहानपणी फार कधी त्रास झाला नाही, त्या निरागस कोवळ्या वयात कुठे लक्षात येतात अशा गोष्टी, मात्र वयात आल्यानंतर ठसठशीत होतं ना एका ‘ती’ चं अस्तित्व, जेव्हा ते कोड...