विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

एक संवाद

एक संवाद
ना: अध्यात्म, म्हणजे काय ?
आ: आत्म्याशी अधिक एकरुप होणे !
ना : पण कसे शक्य आहे ते ?
आ : का नाही ? त्यासाठी ध्यान हा पासवर्ड आहे.
ना : म्हणजे फक्त डोळे मिटून बसायचं का ?
आ : नाहीच मुळी. डोळे मिटायचे, हळूहळू बाकीचं सगळं विसरायचं, आपल्याला भावणारी, आपली ज्यावर श्रद्धा आहे, आपल्याला ती गोष्ट बघून मन एकाग्र करता येईल त्याचं चित्र डोळ्यापुढे आणायचं, संवाद त्या गोष्टीशी सुरु करायचा ! आपला तेव्हा सावकाश एक संवाद सुरु होतो, पण हे करण्यापूर्वी मनाशी दृढ निश्चय आवश्यक आहे ?
ना : मग, पुढे काय होतं ?
आ : जेव्हा काही वेळाने अनवधानाने जाग येते, किंवा कुणी बोलावते ना
ना : डोळ्यांच्या कडा पाणावतात, आपल्यात कसला तरी शक्ती संचार झाल्यासारखं वाटतं, पण
आ : पण, काही वेळापूर्वी आपण जागृत होतो, आणि कधी योगनिद्रावस्था प्राप्त झाली, तेच आठवत नाही
ना : पण, मी ... ना, मला जाणवेल ?
आ : जी गोष्ट एकाग्र चित्ताने, शांत पणे सातत्याने करत राहतो, त्यावेळी आपल्याला आजूबाजूचा सगळा विसर पडून, अगदी आतलाच एक आवाज ऐकू येत असतो तेव्हा त्याला ध्यान लागणे असे म्हणतात.
ना : विकीपीडीया ?
आ : ना.. अनुभव, कवी कविता रचतो, तेव्हा तो ध्यानच करतो, जागृतअवस्थेत ही होते, आणि मुख्य म्हणजे  मन असणाऱ्या ‘माणसाला’ जाणवतेच... कुणाला माना किंवा नका....
ना : पुढे
आ : हाच अध्यात्मबिंदू पर्यंत जाण्याचा मार्ग .  

विशाल,9527138505

आ :आस्तिक
ना : नास्तिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

गुलाब - प्रेयसीवर रचलेली मराठी कविता