विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

झणझणीत मिसळ - हॉटेल तुषार

मिसळ .... नुसते नाव जरी निघाले तरीही मिसळीची झणझणीत चव आठवते, जीभ आपली आपणच रेंगाळून घेतो. मिसळ हा एक असा पदार्थ आहे जो नाशिक या शहरात वर्ल्ड फेमस आहे. जगात अनेक ठिकाणी मिसळ मिळते, परंतु सर्वोत्कृष्ट चव ही नाशिकच्याच मिसळीला आहे, ह्या सत्याची तिखट नोंद घ्या. इथे अशी रस्सेदार परिस्थिती आहे की ज्या ज्या कॉलनीत छोटी हॉटेल्स आहे, तिथेही वेगळ्या मसाल्यांची, तिखटाच्या प्रमाणात काहीसा कमी-जास्तपणा असणारी मिसळ ही असतेच. यातही कानिटकर रस्त्यावरची...... बुचकळ्यात पडू नका, कॉलेजरोडवरची तुषार हॉटेलची मिसळ ही भलतीच भारी.

तसे मिसळीला वर्षभर सुगीचेच दिवस असतात म्हणा. मात्र, पावसाळ्यात मिसळ खायची मज्जा काही न्यारीच असते. असेही आपल्याला पाऊस पडून गेल्यावर वाफाळलेला चहा, कॉफी, कांदाभजी, मिरचीवडे खावेसे वाटतातच ना. मग त्यात मिसळीचा अपवाद कसा असेल. तर मिसळ शौकिनांची हौस पुरेपूर भागवणारे हॉटेल तुषार आहे. नाशिक शहरातील बऱ्याच हॉटेलांत अनेक सेलिब्रिटी, राजकारणी येऊन गेल्याचे फोटो लावण्याची प्रथा आहे, तुषारमध्येही आपल्याला ते दिसतात. शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणच्या जागी हे हॉटेल आहे. जिथे कॉलेजला जाणारे मुलामुलींसह विविध खाजगी क्षेत्रात काम करणारे लोकही जमतात. रविवारच्या दिवशी हमखास तुम्हाला जागा मिळावी यासाठी वाट पहावीच लागते. तुषारनंतर अनेक हॉटेल्स नाशकात आली, प्रत्येकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, पण मला वाटते की खरंच हॉटेल तुषारच्या मिसळीला ते तोड देऊ शकतील अशी ‘टेस्ट’ नाही.

photo credit : internet

तांबडा रंगाचा रस्सा. लाल तर्री, आणि मटकी, कांदा व लिंबू असे चवदार काँबिनेशन तुम्हाला ऑर्डर दिल्यावर अगदी पाच मिनिटात हजर होते. मग ती मस्तपैकी मिसळीचा आस्वाद घेत असताना, शक्यच नाही की तुम्ही कुणाचा फोन घेणार, किंवा मेसेज करणार, जर परिवार, मित्र यांच्यासोबत एकत्र मिसळ खायला घेलात तर गोष्ट वेगळी. पण अशावेळीही वाटतेच, यार मला माझ्या मिसळीसोबत एकटे सोडून द्या. जोवर तुमचे उदभरण होत नाही तोवर इथले लोकही तुम्हाला सोडत नाही, प्लेट तुडुंब भरून रस्सा वाढतात. खवय्या जो आपल्याकडे आलाय त्याने त्याची आवड पुरेपूर भागवावी अशी तिथल्या लोकांची इच्छा. तर कदाचित जास्तीच रस्सा दिल्याने पाव जास्त खाल्ले जातील अन गिऱ्हाईक पोट भरता भरता माझा गल्ला ही भरेल अशीही ‘माफक’ अपेक्षा असू शकेल. असतेच, त्यासाठी तर हॉटेल सुरु केले ना.

बरं, तुषार हॉटेलच्या अप्रतिम चवीच्या मिसळीचे एक सणसणीत वैशिष्ट्य असेही आहे की आजवर कोणत्याच पेपरात जाहिरात नाही, सोशल मीडीयावरही नाही. पब्लिसिटी ही कदाचित तुषार हॉटेलने मागच्या दशकातच स्वाः करून टाकली आहे. अथवा त्यांना ती नेहमीच शुल्लक गोष्ट वाटली असेल. या मिसळीची लोकांकडूनच होणारी प्रशंसा ही एकमेव मार्केटिंग स्ट्रेटेजी या हॉटेलची राहिली आहे. लहानपणी मी खायला गेल्याचे आठवत नाही मात्र माझ्या तारुण्यात प्रवेश केल्यावर अधूनमधून मी जात असतो, बऱ्याच आठवणी यावेळी मग तुषार हॉटेल, मिसळीशी निगडीत होतात. तुषार नावाचे मित्रही खूप जवळचे झालेत. मिसळ..... आईशप्पथ, भन्नाट


कसे जाल :- नाशिकमधील कॅनडा कॉर्नरवरून कॉलेजरोडकडे जाताना, मलेरिया स्टॉपसमोरच तुषार मिसळ आहे. 
कॉलेजरोड हे नाशकातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे जाण्यासाठी शहरातून रिक्षा, शहर बससेवा उपलब्ध असते. तसेच आता खासगी कॅबनेही जाता येते. पायी जायचे असल्यास कॅनडा कॉर्नरवरून जवळ पडते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका