विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं?

“तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय?
आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.”


“मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.”

मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी (NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह संपत्ती बनविण्याचा मार्ग सुकर होऊ लागला आहे.

ओळख म्युच्युअल फंडाची

अनेक गुंतवणुकदारांकडून जमा झालेला पैसा, जो तज्ज्ञ फंड मॅनेजरकडून विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात येतो. जसे की, शेअर्स, बाँड्स, डिबेंचर्स, गवर्नमेंट सिक्युरिटीज, इत्यादी भांडवली पर्यायांत गुंतवला जातो. ज्यात गुंतवणुकादारांना त्यांनी गुंतवलेल्या रक्कमेचे युनिट्स मिळतात. मात्र, त्याकरिता त्यांना प्रत्यक्ष बाजारातील कंपन्यांचा अभ्यास करण्याची गरज नसते. याचे कारण अनुभवी फंड तज्ज्ञ गुंतवणुकदारांसाठी सखोल ज्ञान, अभ्यास अनुभवाच्या जोरावर योग्य कंपनीत पैसै गुंतवत असतात. म्हणजेच म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजारांतील कंपन्यात केलेली असते. अन् त्याद्वारे गुंतवणुकदारांना बाजाराचा अभ्यास,वेळ न घालवता अत्यंत सोयीस्करपणे शेअर बाजारात म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करता येते.

म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणते ?

म्युच्युअल फंडांचे विविध प्रकार आपल्या गुंतवणुकीच्या लक्ष्यानुसार आपण निवडू शकतो. इक्विटी फंड दीर्घकालीन वाढीव परताव्यासाठी योग्य असतात. तर डेट फंड हे तुमच्याकडील असलेल्या संपत्तीला स्थिरता व कमी जोखमीसाठी उपयुक्त ठरतात. हायब्रीड फंडद्वारे इक्विटी व डेट यांचा समतोल साधला जातो. तर ELSS फंड म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हींग स्कीम कर बचत करण्यासाठी गुंतवणुकदारांना मदत करतात. गुंतवणूकदार आपल्या उद्दिष्ट, गरजा व यामधील अद्ययावत ज्ञान असलेल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या सहाय्याने फंड निवडू शकतात.

गुंतवणुकीच्या पद्धती कोणत्या आहेत?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. ज्यांना SIP Lumpsum असे म्हटले जाते. Lumpsum पद्धतीत एकरकमी रक्कम गुंतवण्यात येते. तर, SIP मध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्यात येते. नव्यानेच गुंतवणूक करणार्यांसाठी SIP ही पद्धत सर्वाधिक योग्य समजण्यात येते. ज्यात त्यांना Rupee Cost Averaging, Compounding यांचा मोठा फायदा मिळतो. बाजार वर-खाली कसाही होत राहिला तरी नियमित गुंतवणूक केल्याने सरासरी परतावा हा चांगला मिळतो.

एका छोट्या उदाहरणाने हे समजून घेऊ. अ नावाच्या व्यक्तीने जर ५,००० रुपयाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू केली. अन् तो दरवर्षी या मुद्दलीत किमान १० टक्के जरी वाढ करत असेल तर, १५-२० वर्षानंतर चक्रवाढ परतावा मिळत असल्याने  सुरूवातीची छोटी रक्कम मोठ्या गुंतवणुकीत परावर्तित झालेली असते. कुठलंह झाड लावलं तर त्याला फळे यायला काही काळ जाऊ द्यावा लागतो मात्र त्याला नियमित पाणी, खत घालावं लागतं. त्याप्रमाणे SIP पद्धतीने म्युच्युअल फंडात दीर्घकाळाने मोठा परतावा मिळतो. संयम आणि सातत्य राखणे या पद्धतीत अत्यंत आवश्यक असते.

कर-बचतीचा सुवर्णमध्य

टॅक्स बचत करण्यासाठी सर्व स्तरातींल गुंतवणूकदार हे ELSS फंडाचा पर्याय निवडतात. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत १,५०,००० रुपयांचा कर याद्वारे वाचवता येऊ शकतो. ८० टक्के गुंतवणूक ही इक्विटी शेअर्समध्ये असल्याने ELSS फंडावर दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे संपत्ती निर्माण होण्यास वाव असतो. टॅक्स बचतीप्रमाणेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्यांना कमी-दीर्घ कालावधीकरिता करदेखील लागू होतो. इक्विटीमध्ये दीर्घ कालावधीसाठी १.२५ लाखांचा नफा हा करमुक्त असतो. तर, त्यावरील नफ्यावर २० % कर बसतो. डेट फंडासांठी टॅक्स स्लॅबनुसार कर आकारणी होते.

 SIP चे महत्त्व

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना दीर्घकालीन दृष्टीकोन अतिशय महत्त्वाचा मानला जातो. “Time in the market” हा “Timing the market” अधिक प्रभावात्मक सिद्ध होते. योग्य फंडांची निवड करून, नियमित SIP, स्टेपअप करीत गेल्यास मोठा निधी नक्कीच तयार होतो.

गुंतवणूक सुरू करताना घाबरण्याची आता गरज उरलेली नाही. याचे कारण, तुम्हाला अगदी १,००० रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करण्याचा पर्याय म्युच्युअल फंडाद्वारे निर्माण झाला आहे. बाजाराची समज-उमज येत गेली की ही गुंतवणूक वाढवताही येऊ शकते. सुरूवात करणे आणि सातत्य राखणे हे म्युच्युअल फंडात यशस्वी होण्याचे गुपीत आहे.

आजच सुरुवात का करावी?
✔ ₹1000 पासूनही सुरुवात शक्य
✔ वेळ हा सर्वात मोठा फायदा आहे
✔ उशीर = नुकसान

अखेरीस हेच नमूद करावेसे वाटते की म्युच्युअल फंड हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर, संपूर्णतः  Wealth Creation and Management (श्रीमंत होण्याचा प्रभावी मार्ग) आहे. योग्य नियोजन जर तज्ज्ञ व्यक्तीद्वारे केले गेल्यास कोणत्याही व्यक्तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास अडचण येऊ शकत नाही.  

VHN FINSERV आणि विशाल लोणारी (NISM CERTIFIED) यांच्या सहाय्याने आपल्याला  आर्थिक ध्येय्यापर्यंत जाण्यासाठी योग्य दिशा मिळू शकेल. तेव्हा आजच निर्णय घ्या. सुरक्षित उद्यासाठी व समृद्ध आयुष्यासाठी आजच छोट्या गुंतवणुकीतून सुरूवात करा.

तुमच्यासाठी personalised SIP plan हवा असेल तर आजच मला message करा.
तुमच्या आर्थिक लक्ष्यांनुसार योग्य योजना तयार करून देतो.”

डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखीमेच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग