विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

Encoding- डिकोडींग

Encoding -डीकोडींग

कसेही बटन दाबून मनातला वैताग तिने कीबोर्डवर काढायला सुरुवात केली, पण उपयोग नव्हता, कारण तिचा मनस्ताप कमी त्याने कमी होणार नव्हताच. आयुष्यात येवून काय कमावले यावर विचारच करता येत नव्हता तिला, आताही तसेच आयुष्याने काय शिकवले हे सांगत बसली तर कित्येक रात्री अपुऱ्या पडतील इतकी अनुभवांची शिदोरी कंबरेला खोचुनच ती फिरत असायची. गर्दीतून, गर्दी ती निव्वळ लोकांची नाही तर तिच्याकडे हिणकस, किळसवाण्या, कधी कधी बीभत्स नजरेने न्याहाळनाऱ्या लोकांची गर्दी, या सगळ्या गर्दीला तिला रोजच्या रोज सामोरे जावे लागत असे, कारण त्या गर्दीपासून तोंड लपवून लांब, पळून जाता येत नव्हतं, रोजच्या जगण्यासाठी, जगण्याच्या झगड्यासाठी घराबाहेर तिला बाहेर पडावेच लागत होते. आजवर कुठेही न डगमगता, जराही न लाजता, जे पाहिजे होते ते ते मिळवत आली होती ती, समाजाचे पण एक विचित्र असते, एक तराजू तिला गुणी तोलत होता, तर एका तराजूने तिला कवडीचेही दाम दिले नव्हते, लहानपणी फार कधी त्रास झाला नाही, त्या निरागस कोवळ्या वयात कुठे लक्षात येतात अशा गोष्टी, मात्र वयात आल्यानंतर ठसठशीत होतं ना एका ‘ती’ चं अस्तित्व, जेव्हा ते कोडाचं असेल तेव्हा तर आणखीनच विदारक !
ती, आजच्या घडीला महाराष्ट्रातील नामांकीत कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिला भाषेची, वाचनाची आणि साहित्याची खूप आवड होती. तिच्या कॉलेजमधून चांगल्या मार्कांनी पास होवून मग मोठ्या पदाची नोकरी मिळवायची होती, म्हणूनच तिने तिच्या अवांतर वाचनाच्या आवडीत थोर लोकांचे चरित्र, प्रेरणात्मक लेख, सर्व प्रकारचे साहित्य या सगळ्यांचा समावेश केला होता. याशिवाय ती बिलंदर कलाकारही होती, अनेकदा कॉलेजच्या कार्यक्रमांत ती नाचायची, गायची, नकला करायची, स्वभावाने खूपच मोकळी होती, आजूबाजूला मित्र, मैत्रिणी यांचा सदैव गोतावळा असायचा, ती कुणीतरी वेगळी आहे, याची कधी कुणा मित्राने तिला जाणीव होऊच दिली नाही, कॉलेजच्या होस्टेलवर, आई-वडिलांपासून लांब ती राहायची, संध्याकाळी फोन असायचा तिच्या घरी तिचा, पण तरीही घरच्या आठवणीने टिपा गळताना तिला कॅम्पसमधल्या वडाच्या पारंब्यांनी आसरा दिला होता. अशातच तिला वाटू लागलं की आहेत ती मैत्र आहेतच पण आता खरी वेळ आली आहे, आयुष्यातल्या राजकुमारच्या येण्याची, तिचा जीव कुणाच्या तरी ओढीने व्याकूळ झालेला पाहून क्षितिजापल्याड जाणारा भास्करही आवंढा गिळत असे.
निसर्ग तिचा जुना दोस्त होता. कॅम्पसच्या बाहेरच्या वनात सहज भेटणारा, संध्याकाळी आल्हाद गारव्याने  आनंद देणारा, मऊ लुसलुशीत गवतावर कधी कुशीत घेणारा, तर झुळझुळत्या झऱ्याच्या पाण्याने तृप्त करणारा निसर्ग तिला फार आवडायचा, ती नेहमीच कॉलेजपासून थोडसं अंतरावर असलेल्या टेकडीवर वेळ घालवायला जात असे, बऱ्याचदा एकटी.
नवीन लोकांशी ओळखी व्हाव्या म्हणून तिने तिचे नाव सोशल नेट्वर्किंग साईटवर टाकलं. त्या साईटवर स्वतःच प्रोफाईल तयार केले, प्रोफाईल पिक्चरही सुंदरसा फोटो ठेवला. आता ती रोज, वेळ मिळेल तेव्हा सोशल होत असायची. अभ्यास, जेवण, झोप, कॉलेज या सगळ्यांतून वेळ काढत वीस मिनिटे रात्रीची ती खर्च करत असे, अनेक मुलांशी तिच्या ओळखी होत होत्या, अनेक मुलांशी ती गप्पा मारत असे, पण तिला भावलेलं असे कुणीच नव्हते, ओळखीतला, आपुलकी देणारा असा चेहेरा तिला कधी भेटलाच नाही, सगळेच निव्वळ ओळख खोदून खोदून विचारणारे, किंवा खोटी स्तुती करुन, फुसिला लावू बघणारे असेच तिला भेटायचे, कारण त्याशिवाय त्या मुलांचे फक्त मुलींशी मैत्री असणे, प्रोफाईल अपूर्ण, वा असबंध माहिती दिलेली असणे, शक्यच नव्हते, त्या दिवशी तिने मोबाईलचा डाटा बंद केला तो मग कायमचाच, कारण कॉलेजची वार्षिक परीक्षा जवळ आलेली, आणि अभ्यासात व्यतय नको म्हणून तिने इंटरनेटला राम राम ठोकले, पण त्या दिवसाच्या आदल्या रात्रीची तिची नव्या मित्राशी झालेली ओळख ती विसरली नव्हती, कदाचित तिला हवा तो मिळाला होता, पण एकदम कोणतेही नाते जोडायला घाई नको म्हणून आदली एकच रात्र ती बोलली होती.
 प्रोफाईलमध्ये तो कनेक्ट काय झाला, तिला जरा सुखावल्यासारखे वाटले. तिच्यापासून २५० किलोमीटर दूर असलेल्या शहरातला तो एक होता. एकच रात्रीत त्यांच्या गप्पा अशा रंगल्या की जशी काही फार जूनी ओळख आहे. त्यांच्यात साम्य असे काही नव्हते, दोघेही शिकत होते पण क्षेत्र वेगळे होते, शहरे तर लांब होतीच, त्यांना जोडणाऱ्या दुव्याने त्यांची मैत्री बांधली होती इतकेच. त्या दोघांनी प्रांजळपणे कबूल केले की त्यांनी या वेबसाईटचा आधार हा सहजीवनाचा जोडीदार शोधायला घेतला आहे, त्याची ही प्रामाणिक कबुलीच तिच्या काळजाचा ठाव घेवून बसली. मग, त्यांनी एकमेकांची ओळख करुन घेतली, वेगवेगळ्या विषयावर गप्पा केल्या, शेवटी गाडी येवून थांबलीच ती प्रेमाभोवती.
प्रेम म्हणजे आपल्या व्यक्तीला सुखात बघणे, सुखात,दुखात त्या व्यक्तीसोबत असणे, असे त्या दोघांचेही ठाम मत बनले, त्यानंतर त्याने मग काही ठेवणीतल्या प्रेमावरच्या कविता काढल्या आणि तिला पाठवू लागला, तिला कवितांची आवड होतीच, पण मग जी तिला अवघड वाटली ती समजवून घेतली, त्याने काही त्याच्याच लिहिलेल्या चारोळ्याही तिला ऐकवल्या, ती फक्त वाह, छान म्हणत राहिली, पण जेव्हा गप्पांना पूर्ण विराम देवून निद्रेच्या आभाळाला कवेत घ्यायचे म्हणून ती त्याचा निरोप घेत होती, तेव्हा तिच्या हळदीच्या पिवळ्या चेहेऱ्यात अवचित उगवलेले लाल बदाम, तिला तो आवडू लागल्याचे इमोजी उत्तर त्याला मिळत होते.
परीक्षा उरकल्यावर फार थोडे दिवस ते मित्र-मैत्रीण म्हणून बोलत होते, कारण काही दिवसानंतर त्याने पुढाकार घेत तिला प्रेमाची मागणी घातली, त्याच्या प्रोपोजाला हो म्हणायला आतुर झालेल्या तिने उत्तर देण्यासाठी दोघांनी भेटायचे ठरवले, दोघांनाही जवळ पडेल असे ठिकाण निवडून त्या एका संध्याकाळी तो दोघे भेटले, भेटीचा दिवस उजाडेपर्यंत रोजच ती सुखाची दीप्ती स्वप्नांच्या तेलाने प्रज्वलित करत असे. तो भेटला, आणि तेव्हा तिने त्याला आयुष्यातले सत्य सांगितले, जे कधीही सांगितलं नव्हतं, सोशल साईटवरुन बोलताना तिने कधीच कोड असल्याबद्दल सांगितले नाही, पण भेटल्यावर, गणपतीच्या पायऱ्या उतरुन तळ्याकाठी उभे असलेल्या त्याला तिने सारे काही सांगितले, आणि थांबली, त्याची काय प्रतिक्रिया असणार याची उत्सुकता, हुरहूर, भीती सगळेच तिला दाटून आलं होतं, तो हबकला होता, त्याला तिचा होकार ऐकायला आतुरल्या कानांनी तो इतक्या लांब आलेला होता, पण या अनपेक्षित धक्याने त्याला, अचानकच अशक्य, हातातून काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटत होते, सारखे ते जुने दिवस आठवायचे, नदीकाठी बसून मारलेल्या गप्पा, फेमस पाणीपुरी, कुल्फी आणि मेन रोडच्या गर्दीचे तिला पाठवलेले सेल्फी, आणि तिच्या कमेंट्स, ऑनलाईन घेतलेल्या आणाभाका, शपथा, सगळे त्याच्या डोळ्यासमोर झझरुन गेले, आणि तो सावरला, त्याने काहीच न बोलता, निघून जाण्याचा निर्णय घेतला, त्याला विश्वासघाताला सामोरे जावे लागल्याने त्याच्या शहरात पोहोचल्यावर तिला ब्लॉक करुन, त्यानेच नाकारले तिचे आयुष्य.
   ती(अंशू) अचानक बसलेल्या या धक्क्याने खचली. तिच्या अंगावरील कोडांमुळे पुन्हा एकदा तिच्या मनावर प्रहार झाला होता. पण यावेळेला आपणच आपल्या आयुष्याला चुकीचं इंकोडींग केल्याचे तिला जाणवले, मात्र तिने ठरवलं, जणू काही घडलेच नाही अशी आयुष्याला सुरुवात करायची. असेच सहा महिने निघून गेले. आता ती(अंशू) कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. तो(ध्रुव) आता विस्मरणात गेला होता, पण नशिबाचा जोडीदार मात्र ती शोधतच राहिली, सोशल नेटवर्किंगची व्याधी जडल्यासारखं जगत असताना अंशुच्या आयुष्यात रुद्र आला, धडकला, अंशु आता रुद्रमध्ये गुंतत चालली होती. गुरफटत असतानाच मग,
 अंशूने यावेळेस त्याला सगळं सत्य पहिल्याच ऑनलाईन भेटीत सांगायचे ठरवले, ध्रुवविषयी सांगताना नाव लपवून ठेवले. आता तिला कुठलीच रिस्क मंजूर असणार नव्हती, घरातूनही लग्नाचा विचार कर, भले तुझ्या आवडीच्या मुलाशी विवाह कर असे वारंवार सांगितले जायला लागले, मग तिने एकदिवस मनाशी निर्णय घेतलाच, रुद्र हा तिच्या हॉस्टेलपासून फार लांब राहत नव्हता, म्हणून त्याची भेट घ्यायला गेली, रुद्रला भेटून ध्रुव भेटल्यासारखा अंशूस भास झाला, मात्र तो भासच आहे अशी तिला खात्री पटली, अंशूने मनातलं सुगंधी गुपित रुद्रच्या हृदयावर शब्दांतून शिंपडले, रुद्रच्या चेहेऱ्यावरही अंशूबद्दल जिव्हाळा दाटून आलेला, दोघे कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत हमसून हमसून रडले. दोघांनी जेवण घेतले, रुद्रने अंशूला जवळ घेत एकेक घास भरवला, अंशूनेही तिच्या बाटलीतले उष्ट पाणी त्याला प्यायला दिले. पुढचे काही दिवस रुद्र आणि अंशू रोजच भेटत राहिले, अंशू रुद्रला तिला सगळ्यात जास्त मनोरम्य वाटणाऱ्या टेकडीवर घेवून गेली. तिथे एकमेकांचा त्या वातावरणात सहज श्रुंगार फुलून आला, अर्थात दोघांनीही शीलाचे पावित्र्य जपले, आता मात्र अत्यंत जड अंतकरणाने एकमेकांना डोळ्यात साठवत रुद्रने अंशूचा निरोप घेतला.
पंधरा दिवसानंतर अंशूच्या आईचा तिला फोन आला. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न जमले होते. योगायोग असा की रुद्र ज्या गावी राहत होता, तिथलं स्थळ चालून आलं होतं. रुद्रला हे कळवण्यासाठी अंशूने प्रयत्न केला, पण रुद्र तिला उपलब्ध होऊच शकला नाही, मात्र आनंदाने उधाणलेली अंशू मनात प्रेमाचा महासागर घेवून तिच्या घरी गेली. आणि तिला धक्काच बसला.
ज्या मुलाशी तिची बहिण लग्न करणार होती तो दुसरा कुणी नसून रुद्रच असल्याचे तिला कळले, संतापाने ती लालबुंद झाली, तिच्या मनातून आता तप्त लाव्हा पेट घेत होत्या, अंशू, तिचं कोड, तिचे घरचे, बहिण या सगळ्यांची माहिती तिने रुद्रला दिली होती, तरीही त्याने त्याच्या बहिणीला मागणी घातलीच कशी या प्रश्नाने तिला भंडावून सोडले, काहीही झालं तरी या गोष्टीचा छडा लावायचाच, म्हणून तिने मागचा-पुढचा विचार न करता, रुद्रचा पत्ता मिळवला आणि गाठलाही.
रुद्रला ती येणार, चिडणार याची सगळी कल्पना होतीच, बोलण्यासाठी म्हणून दोघे एका ठिकाणी जायला निघाले, पोहोचले तेव्हा अंशूच्या लक्षात आलं ते एका हॉस्पिटलमध्ये आलेत, तिथे एका आयसीसीयु युनिट बाहेरुन रुद्रने एक मुलगा अंशूस दाखवला, त्याची ओळख आहे का, असे विचारले, तो मुलगा ध्रुव होता. त्याची परिस्थिती पाहून तिला रडू कोसळले, तिने रुद्रकडे चौकशी केली, तेव्हा रुद्रने सगळा खुलासा केला, अंशूला नकार देवून आल्यावरही तिच्याबद्दलचे प्रेम ध्रुवच्या हृदयात तसेच होते, पण विश्वासघात केल्याचा धक्का रुद्रच्या बालपणीच्या मित्राला सहन न झाल्याने, त्याने धावत्या रेल्वेतून उडी टाकली, पोलवर मेंदू आपटल्याने, अंतर रक्तस्त्राव झाला आणि तो कोमात गेला, डॉक्टरांनी टू त्याच्या आयुष्यात येणं हाच त्याच्या बऱ्या होण्याचा उपाय असल्याचे सांगितला, परंतु तू विश्वासघात केल्याने माझ्या मित्राला जो त्रास झाला, ज्या वेदना झाल्या, जो घणघणता आघात झाला, त्याची पुसटशी कल्पना तुला यावी म्हणून मी तू इनकोड केलेलं ध्रुवचं आयुष्य माझ्या पद्धतीने डिकोड केलं, पण तुला फसवताना माझा मित्र माझ्या डोळ्यासमोर होता, म्हणूनच तुला आयुष्यभर फक्त पश्चाताप व्हावा म्हणून मी तुझ्या बहिणीशी लग्न करणार आहे,
आता इथून पुढे तू कुणालाच इनकोड करु शकणार नाहीस, एक प्रेमाचा, प्रेमीचा इगो दुखावणे त्याला आयुष्यातून उठवून देते, यापुढे फक्त पश्चाताप कर
-विशाल लोणारी, नाशिक  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi