विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आमची स्वप्ने

पालकांना सांभाळावे की नाही

अनेकदा असे होते की आपले पालक हे ग्रामीण भागातले, मागसलेल्या विचारांचे, शिक्षणापासून अनभिज्ञ असे असतात. हजारो गोष्टी स्वभावात अशा बसलेल्या असतात की ज्यांचा खूप त्रास होतो, आणि तो ही शुद्ध अडाणीपणामुळे. मग त्या वेळेला स्वाभाविकपणे आपल्याला असा विचार येऊ शकतो की सांभाळतोय आपण आपल्या पालकांना.

सुशिक्षित घरात रोज, आठवड्यातून एकदा, महिन्यातून दोन-तीनदा कडकड भांड्यांचे आवाज येतातच. इथे तर सगळं असते म्हणजे पुढारलेपण विचारात, शैक्षणिक प्रगती असते मग तरीही मतभेद होतात. इथे एकही बाजू दुबळी नसते कोणत्याच बाजूने त्यामुळे कधीकधी जो फटाक्यांचा जॅकपॉट बार काढला जातो ना, त्याचे वर्णन इथे नाही देत बसत. मुद्दा हा  की याहीप्रकारे पालकांचा कंटाळा हा केला जाऊ शकतो.

नाही म्हणाल तरी नियती असतेच, प्रारब्ध कधी कुणाला चुकत नसते. मग ज्यांनी आपल्या आयुष्याच्या प्राक्तनाला गुलाबाचा आयाम दिला, प्राजक्ताच्या सुगंधाप्रमाणे ज्यांनी जीवनाला गंध ल्यायला त्या जन्मत्रात्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात निराधार करून टाकायचे का ? ज्यांनी आपला एकटेपणा घालवला, समाजात आपल्या अस्तित्वाला एक ओळख दिली, रूप-सौंदर्य, ज्ञान, पैसा, प्रतिष्ठा यादी न संपणारी आहे. ज्यांचे ऋण सातजन्मातही फिटणारे नाही त्यांना आपण वार्यावर सोडून द्यायचे का ?
एवढं पाषाणहृदयी माणसाने आपलं जगण्याचा अधिकारच नाकारायला पाहिजे. आपण आपल्या पालकांना सांभाळायचंच. कुठलाही क्लेशदायक पर्याय आपण स्वीकारणार नाही आहोत, कारण पालक तर आपल्यापैकीही आहेत, मग आपल्यावर अशी निराधार व्हायची वेळ आली तर. एकदा अनाथ आश्रमात जाऊन विचार त्यांना जर आई-वडील मिळाले तर ते त्यांना कधी सोडून जातील ? भळाभळा डोळे वाहू लागतील असे काहीसे ऐकायला मिळेल. आपल्या पालकांना आलवेज सांभाळा.      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi