विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आमची स्वप्ने

जीवन

जीवन. आपल्या जीवनावर काय लिहावं. खरतर जितकं लिहाल, तितकं कमीच आहे. जीवन म्हटलं की आपण एका वेगळ्याच विश्वात मग्न होतो, विचारांच्या. त्या विचारांच्या रेघांचे अगदी सहज जाळे होवून बसते. गुरफटून जेव्हा आपण एकटच असतो, आपल्याकडे सांगण्यासारखं काहीही नसते. अशा वेळेस प्रारब्ध एक वेगळ वळण घेतं, कुणी नवीन आपल्याला भेटते; आपणच नव्याने आपल्याला. पण अशा काळाच्या मखमली नेहमी उलगडल्या जायला हव्यात मित्रांनो. एखाद क्षणी ज्या समयी निर्णय घेणे कठीण असते, तेव्हा प्रवेश करून अशीच आत्मफेरी मारावी, ही मुशाफिरी जिथे संपेल, तिथून आपली पायवाट सापडून जाईल. कदाचित मग एक नवीन ध्येय्याची ती सुरुवात असेन.

 परंतु सगळ्या तयारीनिशी, खिलाडूवृत्ती ठेवून पुढे वाटांनी धावायची तयारी ठेवा. घात येतील, अडचणीच्या वळणांचे, पुढ्यात काय येईल ते कळणारे नसेल. चढवे लागतील उंच उंच चढ कारण माथ्यावर असेन विजयी सीमा, पण अडथळे अन मेहनत यांच्या बनवाव्या मोजाव्या लागतील परिसीमा. जिद्दीच्या, निश्चयाच्या, घोर आत्मविश्वासाच्या बाहुबळावर, अन ज्या समस्यांची येण्याला निमीत्त आपणच ठरू त्यांनाही काठीण्य पातळीच्या परीक्षा पार करून दूर करावे लागेन, हे सगळंच जर नको असेल तर डोळे मिटून स्वतःला ढकलून द्या, खोल दरीत खाली पडून जा, पराभावीत होऊन.

जीवन म्हणजे फक्त यश म्ह्टलं गेलं पाहिजे, स्वप्नांत अन डोळ्यांत तेच दिसलं पाहिजे, शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi