विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आमची स्वप्ने


फेसबुक कशासाठी ?


गेल्या काही वर्षात प्रचंड विस्तृत झालेलं हे माध्यम. फक्त मैत्रीसाठी सुरु करूनदेखील मार्क फेसबुकवर प्रेमात पडलाच आणि विवाहबद्ध झाला. फेसबुक हे मैत्री आणि लग्न यांतील एक प्रकारे दुवाच बनून राहिलंय. फेसबुक व्यावसायाकरिताही वापरले जाते; पण जाहिरात, विक्री आणि सरळ भाषेत ‘धंदा’ करण्यासाठी बांधले गेलेलंच नाही किंबहुना तसा उपयोग याचा व्हायला नको होता. फेसबुक शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक प्रश्न यांकरिता मंचित होऊन बदल घडवू शकते, फेसबुक वापरामागचा हा एक दृष्टीकोन बरोबर वाटतो. दुसरं असे की सध्याचे युगात  ‘कागदावरील सर्जनशीलता’ विस्मृतींत जात आहे. आपल्यानुसार अनेक नवोदितांचे कोणतेही सादरिकरणाचे व्यासपीठ फेसबुक बनलंय, त्यातून समाज विकास आणि उन्नती साध्य करण्याचा आणि अर्थात स्वतःचीही प्रगती करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा, पण अनिष्ट रूढी इथे रुजू देऊ नये, तसेच गैरफायदाही घेवून कुणाचा छळ करू नये. यासाठीच फेसबुक वापरायला हवे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

गुलाब - प्रेयसीवर रचलेली मराठी कविता