विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आमची स्वप्ने

राबायचं का ?

युवा चेतना, युवा प्रेरणा, युवा शक्ती. भारत देशाची ही युवा ताकद कशासाठी वापरत यायला हवी ? बरोबर, खरंच या तरुण, उफाळत्या, सळसळत्या रक्ताची ऊर्जा परत तरुणांकरीताच उपयोगी यायला हवी आहे. नित्य वागणुकीतून, वैयक्तिक तामझामातून आपली सार्वत्रिक अशी एखादी तरी गोष्ट घडू शकत नाही का ? नक्कीच घडू शकते. यार हो, राबायचं खऱ्या अर्थाने याचकरीता. जेणेकरून आपली पिढी आणि भविष्यातील आपला निसर्ग हा सुरक्षित, पोषणात्मक मूल्यवर्धित आयुष्य जगू शकेल. याचबरोबर आज आपली व आपली पूर्वजांची, गुरुजनांची, वडीलधार्यांची म्हणजेच मागची पिढीही आपण विसरून चालणार नाही. राबायचं ते वर्तमान, भूत आणि भविष्यासाठी.

एक कथा वाचली. थंडीने कुडकुडनाऱ्या एका म्हातारीने त्याच्या मुलाला शाल आणायला सांगितली, तर त्याने उर्मटपणे घरखर्च आणि तिच्या सुनेच्या कपड्यांवर खूप खर्च झाला आहे तर पुढच्या थंडीत शाल घेऊन देईल असे सुनावले. आपल्या मुलाला थंडी वाजू नये म्हणून वेळप्रसंगी स्वतः फाटक्या चादरी पांघरून, लेकराला गोधडीत लपेटलेले उबदार बालपण देणाऱ्या आईने त्याच रात्री जीव टाकला. अंत्यसंस्कारांच्यावेळीस त्या मुलाने नवी महागडी शाल आईस पांघरली. बोध हाच घ्या की वेळ निघून गेल्यानंतर हाती काहीच उरत नाही, आणि उशिरा सुचलेले शहाणपण माणूस परत मिळवून देत नाही. राबायचं ते आईवडिलांसाठी, त्यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहण्यासाठी.


बस बाकी हुल्लडबाजी, चैनबाजी, इश्क़बाजी यांकरिता राबायचं नसतं मुळीच. आपल्या माणसांच्या सुखासाठी, त्यांचे दुःख मिटविण्यासाठी, हास्य, आनंद, समाधान देण्यासाठी. क्रौर्य नाही तर प्रेम, स्नेह वाढविण्यासाठी. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi