क्लासमेट्स
हाय फ्रेंड्स, कसे आहात ? कशी झाली तुमची संक्रांत ? मला खात्री आहे, तुम्ही खूप धमाल केली असणार ! चला तर, आज एका हटके विषयावर आपण बोलणार आहोत.
तुमच्या फ्रेंड्स ग्रुपचे नाव काय आहे ? ग्रुपमध्ये कितीजण आहात ? आणि या ग्रुपमध्ये ते दोघे एकमेकांचे अगदी ‘खासमखास’ असे असतीलच ना ! फ्रेंड्स आमच्या टीमनेही या विषयाला समोर ठेवून एक हटके रिसर्च केला, शहरातील कॉलेजेसच्या ‘कट्टेकरी’ मंडळींना प्रश्न विचारला, तुमच्या ग्रुपमध्ये कुणी असेही आहे का, की जे आधी मित्र-मैत्रिणीच होते पण मग ते प्रेमाच्या बंधनात अडकले आणि मग त्या नंतर ग्रुपबरोबर त्यांचे संबंध कसे राहिलेत. तर चला, बघू कुणी काय, म्हणणं मांडलय, ग्रुपमधील त्या खास ‘मित्रांच्या’ जोडीबद्दल.
मित्रांनो, आमची टीम सगळ्यात आधी पोहोचली ती ‘बी. वाय. के कॅम्पसमध्ये, इथे भेटलेल्या पार्किंग ग्रुपने आमहाला बरीच ‘इन्फो’ दिली. या ग्रुपमधील मेहुल म्हणतो, “ माझा मित्र हेरंब आणि मैत्रीण केतकी अगदी जीवश्च, कंठश्च अशी आमची यारी, पण पुढे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, एक हळवं, गहिर नातं रेशमाच्या धाग्यांनी गुंफले खरे, पण आता ग्रुपसोबत त्यांचे शेअरिंग कमी झालंय. आधी असे नव्हते, आमचं ग्रुप खऱ्या अर्थाने क्लासमेट्सचा ग्रुप, आम्ही मित्र-मैत्रिणी म्हणजे मी, केतकी, अश्विनी, हेरंब, सुयोग, कल्याणी, अर्चना. आमची यारीदोस्ती कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून जमलेली. पण आता हे दोघे एकमेकांत एवढे गुंतलेत की एकमेकांशीच सतत बोलत असतात, कोपर्यातच दोघे बसतात. एकत्र फिरतात, आऊटिंग करतात, पण ग्रुप त्यांना खूप मिस करतो”. असे अत्यंत प्रांजळपणे आणि भावूक होवून मेहुल बोलून गेला.
यापुढे आम्ही गेलो ते शहरातील केटीएचएम कॉलेजच्या बोट क्लबवर. फ्रेंड्स ग्रुप्सबरोबरीनेच अनेक ‘कपल्स’ हातात हात घालून, गुजगोष्टी करत असलेले बघायला मिळते. केटीच्या बी. ए शिकत असलेल्या सतीश, सोनल, तुषार, पंकज, लोकेश आणि विशाल यांच्या ‘एक कप चहा’ ग्रुपच्या सतीशने आम्हाला प्रतिक्रिया दिली की, एक कप चहा या ग्रुपचे विशाल आणि सोनल हे मनाने एकमेकांच्या अधिकच जवळ येत गेले. मैत्रीपलीकडेही भावनिक नात्यांत ते अडकत गेले. असे काही दोघांच्यात चालू आहे हे ग्रुपला जेव्हा समजले तेव्हा त्यांनीही खुल्या दिलाने प्रेम जमल्याची कबुली दिली. एक कप चहा घेतात घेता ‘चाहत’ जरी ते बनले तरी आजही ग्रुपमधील प्रत्येकाशी त्यांची घट्ट मैत्री टिकून आहे.
मैत्री या शब्दाचा आदर केला पाहिजे, जरी तुम्ही दोघे प्रेमात आहात, ज्या क्लासमेट्सने तुम्हाला भेटवलं त्यांना विसरून चालणार नाही ना बॉस.
विशाल लोणारी.शनिवार, 17 जानेवारी 2015
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा