>> म. टा. विशेष प्रतिनिधी। नवी दिल्ली
दुदैर्वाने अंधत्व लादले गेलेली सिद्धी देसाई आणि तिची आई सुस्मिता आयुष्यातल्या संघर्षाला ज्या धाडसाने सामोऱ्या गेल्या, त्यांच्या जीवनयात्रेवर लिहिलेली 'व्हाय नॉट आय' ही कादंबरी देशातल्या लाखोंच्या आयुष्यात प्रकाशाचे किरण पेरणारी, मायलेकींच्या उजेडयात्रेची लखलखती यशोगाथा आहे... पुस्तके अनेक लिहिली जातात, राष्ट्रपती भवनात त्याचे अर्पण सोहळेही होतात मात्र, सिद्धी आणि सुस्मिता यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा हा भावस्पशीर् सोहळा मन हेलावून टाकणारा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढले.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या गतवर्षाच्या महिला दिन विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या एका छोट्याशा संघर्षकथेतून जन्मलेली 'व्हाय नॉट आय' ही वृंदा भार्गवेलिखित कादंबरी, राष्ट्रपतींना अर्पण करण्याचा सोहळा मंगळवारी राष्ट्रपती भवनात अत्यंत हृद्य वातावरणात झाला. या कार्यक्रमात प्रकाशक उल्हास लाटकर, लेखिका वृंदा भार्गवे आणि कथेची नायिका सिद्धी यांची सोहळ्यात नेटक्या शब्दांत लक्षवेधी भाषणे झाली.
सकारात्मकतेचा परिसस्पर्श करणाऱ्या या संघर्षकथेतून लक्षावधी अंधांनाच नव्हे तर व्यंग-व्याधीने ग्रस्त असलेल्या असंख्य लोकांच्या आयुष्याला हे पुस्तक प्रेरणेची नवसंजीवनी देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त करत राष्ट्रपतींनी सिद्धी आणि सुस्मिता देसाई या मायलेकींचा मन:पूर्वक गौरव केला तर, एका अप्रतिम पुस्तकाच्या निमिर्तीबद्दल लेखिका डॉ. वृंदा भार्गवे आणि प्रकाशक अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांचे कौतुक केले.
डॉ. वृंदा भार्गवे यांच्या शैलीदार आणि सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली 'व्हाय नॉट आय' केवळ सत्यकथेवर आधारीत नव्हे, तर ठाणे शहरातल्या सुस्मिता देसाई आणि सिद्धी देसाई या मायलेकींनी आजवर केलेल्या अलौकिक संघर्षाची अत्यंत हृदयस्पशीर् सत्यकथा आहे. एक मध्यमवगीर्य स्त्री आपला नवरा गमावते. सहाव्या वर्षांपर्यंत रंगबिरंगी जग पाहिलेली तिची टपोऱ्या डोळयांची कन्या देवकी (सिद्धी) अचानक चुकीच्या औषधांमुळे दृष्टी गमावते. देवकीची दृष्टी परत यावी यासाठी आई प्रयत्नांची पराकाष्ठा करते. प्रयत्नांना यश येत नाही, तरीही सारे काही संपले असे न मानता अंधारलेल्या वास्तवाचा स्वीकार करून दृष्टिहीन कन्येला डोळस बनवण्याचा अविरत प्रयत्न करते. अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता असलेली देवकी, दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रत्येक इयत्तेत सतत पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाची गुणवत्ता सिद्ध करते. कमालीची मेहनत घेऊन दहावी आणि बारावीत बोर्डाच्या परीक्षेत सर्वप्रथम येते.
कादंबरीतली देवकी उर्फ वास्तवातली सिद्धी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात कला शाखेत सध्या तिसऱ्या वर्षाची विद्याथिर्नी आहे. मुंबईच्या अलोट गदीर्त ओळखीच्या खुणांचा आधार घेत, ठाणे ते सीएसटी हा लोकलचा प्रवास कोणाच्याही मदतीशिवाय ती एकटी करते. ब्रेल लिपीतल्या कम्प्युटरवर तासनतास जगाचा शोध घेते. स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स हे तिच्या खास आवडीचे विषय. इंटरनॅशनल-इकॉनॉमिक्स विषय घेऊन आयईएसच्या (इंडियन इकॉनॉमिक सव्हिर्सेस) परीक्षेत गुणवत्ता संपादन करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. अंधारापलिकडचं जग पाहण्याची जिद्द बाळगणारी सिद्धी देसाई आणि तिच्या प्रत्येक प्रयत्नाला मनापासून साथ देणारी आई सुस्मिता देसाई यांच्या आयुष्यातील संघर्षाचा हा अलौकिक प्रवास, अंधांच्या जीवनशैलीतील अनेक बारकावे टिपत, लेखिका वृंदा भार्गवे यांनी सुरेख बावनकशी शैलीत शब्दबद्ध केला आहे. हातात घेतलेली ही कहाणी शेवटपर्यंत उत्कंठा ताणत नेते. पुस्तक वाचून संपेपर्यंत वाचक थांबतच नाही. खा. भारतकुमार राऊत यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी लेखिका, प्रकाशक व सिद्धी आणि सुस्मिाता या मायलेकींना हादिर्क शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा