विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

आमची स्वप्ने ...


पब आणि आम्ही
नाशिकसारख्या छोट्या शहरात कॉलेज रोड, गंगापूररोडवर तरुण-तरुणींचा धिंगाना रात्रभर सुरु असतो.  मेट्रो-सिटीज म्हणून नावारूपाला आलेल्या मुंबई-पुणे शहरात याचे प्रमाण अफाट आहे. वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्रात ‘सांस्कृतिक स्थित्यंतर’ किंवा ‘पाश्चिमात्य अनुकरणाचा’ पाया हा याच मेट्रो सिटीजमध्ये रोवला जातोय. का ? कशासाठी ? आपल्या मराठमोळ्या संस्कृतीतही नृत्य, गायन या कला तुम्हाला करमणूक करवून देण्यासाठी समृद्ध आहेतच की. त्यां जोपासून, विकसित करून, जतन- संवर्धन करून आपली अस्मिता टिकवून पुढच्या पिढीस देणे हे मी  महाराष्ट्रीय टेंभा मिरवणाऱ्या प्रत्येक कलंदराचे आदिकर्तव्य होते. परंतु मराठी/ भारतीय  संस्कृती ही  परकीय भाषा, परंपरा यांच्या मुसळधार, अविरत अशा भडीमाराने लोप पावत चालली आहे, किंवा तिचे दर्शन दुर्लभ झाले आहे. परदेशातील लोक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आपण भारतीयांची खिल्ली उडवत राहतात, बहुतांश देशात भारतीय नागरिकांना जगताना मानहानी, त्रास होत आहे, आणि भारतीयांनी त्यांच्या म्हणण्यानुसार वागले पाहिजे असा त्यांचा हेका आहे. बळजबरीचा ! मग मला सांगा आपण भारतीय का एक प्रकारे षंढ बनलो आहोत, अगदी सहजपणे आपण परकीय संस्कृती, भाषा, परंपरा स्वीकारतो, अंगिकारतो आहोत. अस्मिता, अभिमान, स्वाभिमान या गोष्टींची जाण काही विशेष प्रसंगात का करत राहतो आपण ? यातूनच पुढे वाढीस लागली आहेत व्यसनाधीनता खासकरून आम्ली पदार्थांचे व्यसन.

हे सगळ सोडून, चला एक प्रयत्न करूया, भारतीयांची बदलेली जीवनशैली, जी पाश्चिमात्यपद्धतीकडे झुकली गेली आहे, तिला तिचे मूळ वैभव प्राप्त करून देण्यासाठी झटूया. प्रामाणिक प्रयत्न करून सुधारणा केली गेली नाही तर भविष्यातील आपली पिढीला भलताच भारत ठावूक होईल, आपली संस्कृती नामशेष झाली तर पुढची पिढी सुसंस्कारी कशी बनेल, ज्ञानी कशी बनेल, आज्वर जे वैभव आपण पाहिलं, जपलं त्याचा वारसा पुढे चालूच राहणार नाही. या सगळ्यांचे अत्यंत वाईट भोग आपल्यापैकीच लोकांना भोगावे लागतील.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग