कपडे आणि फॅशन
फॅशन, करावी का ? हो, पण कशी आणि कोणती ? हा आपल्या सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, यावर अनेक कमी लोक हो बोलतील. आपले कपडे कसे असावे, तर ज्या कपड्यांत आपण सहजतेने रोजची दिनचर्या जगू शकतो तीच. असंच राहावं, तर रोज वावरताना सुलभता येईल, अन्यथा उगाच आपले चार चौघात हसु होऊ शकते. आपल्याला कळते ना की काय शोभेल, त्याचाच विचार करून कपड्यांची यथोचित निवड करायला हवी, ते आकलन, ती समज आपल्याला प्रौढत्व येईपर्यंत अर्थातच आलेली असते.
कपडे आणि त्याची फॅशन ह्यांचा स्वतःचा एक आवेग आहे, जो सतत धावता असतो, यात नेहमी बदल झालेले दिसतात. पण बदल होतात, नव्या तऱ्हेचे कपडे येतात म्हणून आपणही प्रत्येक प्रकार अंगीकरावाच का ? कशाला ? रोज रोज रस्त्यांवर, दुकानांत........ हो त्या तुमच्या.... मॉल्समध्ये चिक्कार गर्दी असते, करोडोंची उलाढाल होते तिथे, पण एकतरी कपडे उत्पादकाला वाटू नये की अरे, देशात लाखो लोक असे आहेत, की त्यांच्या अंगावर एकाच कपडा आहे, छिद्र, छिद्र घालून गरिबांच्या पोरी, खांद्यावर अफू पाजलेला, गाढ निद्रिस्त झालेलं तान्ह मुल फिरवत भिका मागत फिरतात, अशा एकतरी गरीब आया-बहिणीच्या अंगावर एक शाल टाकावी, तिलाही एक सलवारकमीज द्यावी, असे एकही उद्योजकाच्या मनात येत नाही ? असे करून संपूर्ण फॅशन मार्केट बूमवरून खाली थोडीच ना येणार ?
एखाद दुसरा समाजसेवक पुढे येऊन समाजात मोठा बदल कधीच घडत नाही, त्याकरिता मोठे संघटन पुढे येणे अपेक्षित आहे, अगदी बरोबर.... रिलायन्सकडेच माझ्या बोलण्यातली खोच आहे, देशातल्या गरिबांच्या अंगावर कपडे चढवण्याचा ट्रेंड त्यांनीच सेट करायला हवा, नाहीतरी वर्षानुवर्षे तीच तीच कपडे मॉल्समध्ये अजून कितीकाळ विकणार आहात ? आणि स्वाभाविकपणे अशीच अपेक्षा आपल्या मोदी साहेबांकडून होणारच...... ये मेरी मन की बात है|
अन एक खदखद, आपल्या समोर तोकड्या कपड्यांत स्त्री आली, किंवा कुणीही असे तोकडे कपडे घालून येत असेल तर बऱ्याचदा आकर्षणामुळे लपलेला हिंस्र पशु हा जागाच होतो, तसा तो संपूर्ण अंग झाक्लेल्यांपुढे ही होतो, पण तेव्हाची मानसिकता मुळातच तशी असते, अचानक पुढ्यात तोकडेपण आले तर ते काही रानटी, बीभत्स, पाशवी प्रवृत्ती जागृत होतात, ज्याप्रमाणे मानवाला इतर भावनिक संवेदना असतात तशाच या ही, तेव्हा याचा आपणच विचार करायला हवा. जर स्वैरपणा बाणत वाफाळ वागणे करायचे असेल तर होणाऱ्या विखारी परिस्थितीला सामोरे जाण्याची आग असायला हवी.
पण, याउलट आपण जास्त चांगला विचार रुजवून, चांगलाच विचारांचा भारत घडवू शकतो ना ? फॅशन तीच करावी ज्यातून स्वतःला आनंद मिळेल, अशी फॅशन नसावी जी दुसर्याला आनंद ओरबाडून, कुस्करून, तोडून घेण्याला प्रवृत्त करेल. विचार बरोबर आहे ना ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा