विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

संकल्पांनी दिलं काय ?

वर्ष कुठलेही असो म्हणजे मराठी किंवा इंग्रजी, जानेवारीत म्हणा, चैत्रात म्हणा त्याची नवीन सुरुवात ही होतेच. जुने वर्ष सरते म्हणजे काय ? जुन्यातून नवे स्थित्यांतर, नवीन वेळापत्रकही कधीकधी, वृत्तपत्रांच्या, वाहिन्यांच्या बाबतीत मात्र कार्यकारिणीत बदल केला जातो, काही वेळेस कामांची पद्धती बदलली जाते, पण हटकून दरवर्षाची एक सवय मात्र आपली तशीच टिकून आहे, हो अनेक लोकांची सवय असते. कुठली ? सोप्पं उत्तर आहे, संकल्प करायची. हे संकल्प नवीन येत्या वर्षांच्या गाजेवरून मनात उसळून, उफाळून येतात. कुणी खरंच दर्यात तुफान झेलून नेणारा खलाशी असेल तर तो संकल्पसिद्धीस नेतोच, पण कुणी जर त्या लाटांवरच गटांगळ्या खावू लागला असेल तर मात्र संकल्प लाटे सोबतच विरून जातो. यंदाच्या वर्षी मी संकल्प सोडला होताच, अनेक लोकांप्रमाणे, सुटलेलं पोट कमी करायचा, जेवण कमी करायचा. पण काहीच उपयोग झाला नाही ओ ! पण एक संकल्प असाही होता जो तडीस नेले गेला, पूर्ण झाला त्याविषयी जास्त काही बोलणार नाही.

बारीक व्हायचंच हा निर्धार अगदी पक्का असल्याने मी एक वेळापत्रकच ठरवून टाकलेलं. सकाळी सहा वाजता उठायचे आणि रोज शंभर सूर्यनमस्कार घालायचे, ते पण मंत्रोच्चारासहित, मग रोजच्याप्रमाणे कॉलेज, दुपारी घरी आल्यावर जास्त जेवायचे नाही, आहार एकदम कमी, चहा फार घ्यायचा नाही. हे असे सगळं मी जिकरीने निभावून नेयचंच असे मनावर बिंबवून टाकलं. पण म्हणतात ना, ज्या गोष्टी घडायचा असतात त्या आपण टाळू शकत नाही. माझ्या संकल्पाचा फियास्को व्हायचा अटळ होताच तो झालाच.

कॉलेज जून महिन्यात सुरु झाले त्यावेळी मी माझ्यापरीने शंभर टक्के यशस्वी होतो, पण काही व्यक्ती आयुष्यात मैत्रीचे बंधन बांधून आली आणि माझ्या यशस्वीतेचा पतंग उंचच उंच जाताना अचानकच तुटला आणि जमिनीवर जिथे भरपूर जंक फूड, वाफाळलेल्या चहाच्या किटल्या, पावाच्या गाद्या आणि खूप मसाले असलेल्या कॅन्टीन नामक ध्यानकेंद्राच्या टपावर जाऊन विसावला.


अर्थात ! कॉलेजमध्ये नावे मित्र भेटले, नव्या ओळखी झाल्या आणि महत्वाचं म्हणजे आयुष्याला कलाटणी मिळाली, आयुष्याच्या गाडीची चाके सुसाट धावत सुटलीये आता, कोणत्या स्टेशनला थांबायचं आहे ते उमगलंय अगदी व्यवस्थित. जरी संकल्प मोडला असला तरीही. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग