पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

तर्री

इमेज
सरसरून येते उकळूनी अन शहारून टाकते जिवा घोटा-घोटातून तेव्हा तरतरून जाते जिव्हा pic credit - Internet येती उठून तरंग खोल खोल मनातून लालबुंद तुझा तवंग सुखावून जातो आम्हा अगदी गात्रागत्रांतून तू भिणतेस क्षणा-क्षणात नव्याने नव्याने उमगत जाते प्रत्येक झटक्यात काबीज करून घेतेस काळीज आमचे प्रत्येक ठसक्यात भिजून जातो जो तो तुझ्या रंगा-संगाने अंगा-अंगाने तू ओतप्रोत प्रेम ओततेस जीव चुर-चुर झुरतो चिंब होते आम्हास घामघामाने सोबतीस साऱ्यांच्या येऊन तू जराशी मागाऊन पण, मग राहवत नाही कुणाला तुझ्यावाचून करमते ना मग तुझ्यात सामावल्यावाचून तुझ्यावरच्या प्रेमाची गोष्ट कोणा वाटेल ना खरी तरी'ही तू प्रियच ऱ्हाशील आमची 'तर्री'

आरोग्यदायी सल्ला - मिसळ खा, स्वस्थ राहा

इमेज
नाशकात प्रत्येक कॉलनीत एक खानावळ असतेच. जिथं शिकायला आलेली मुले मुली वास्तव्य करतात तिथे तर हमखास असते. त्या मुलांचे पोट भरणारी आणि खिशाला परवडणारी अशी जगातली सोय म्हणजे या खानावळी. या फोटोतील मिसळ हॉटेल त्रिमूर्तीची आहे. घरगुती पद्धतीच्या मिसळीला जरासे तिखट बनवून, मोठी शेव टाकली, लाल रस्सा झाला की झटकेदार मिसळ तयार. अशा खानावळींचे आर्थिक गणित बेतानेच जुळते. यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली खानावळ दुपारपर्यंत संपलेली असते, मग उरलेल्या रस्सावर खानावळीत आलेल्यांना भूक भागवावी लागते. तसंही, मिसळीची गंमत अशी की लोक त्या रस्सासाठीपण जीव टाकतील. खानावळीत एक आजी तर पाहिजेच. हो, शहरभरची हा प्रेमळ ट्रेंड झाला आहे. अनेक आया-आजी खानावळ चालवतात. तर, या आजी मला हा फोटो काढल्यावर म्हणताय, 'सुनेला पाठवायचा का' ? मी फोटो काढताना दिसलो म्हणून बोलल्या. इतर मुलं जी भुकेल्या चेहऱ्याने काळवंडून चालली होती, त्यांनाही मायेने चौकशी करून या आजीबाई खायला देतात. खानावळीत असा मायाळूपणा खूप जाणवतो. मिसळ खाऊन पोट आपोआप भरून जाते. पावात ईस्ट वगैरे पदार्थ असतात, ते पोटात फुगतात वगैरे गोष्टी फार लक्षात...

कविता - मिसळ..

इमेज
सकाळ झाली झोप उडाली आंघोळ केली न्याहारी आली तेज झटक्याने जीभ पोळली मिसळ प्लेट तरी फस्त केली Pic credit - internet मोडाचे धुमारे फुटलेली उसळ शेव-कांद्याची त्यात सरमिसळ चटकदार फोडणीची सळसळ जिभेला पाण्याची खळखळ दिलदोस्ती यारीसोबत मिसळ ग्रुपला टू गेदर करणारी मिसळ घराबाहेर हक्काचा नाश्ता मिसळ दिवसाला तर्रीदार स्वाद मिसळ लिंबू पिळून खाण्याची मज्जा दही कालवून खाण्याची मज्जा पापडा संगची कुरकुरीत मज्जा मिसळ म्हणजेच फक्त मज्जा जगात असा कोणीही रे नसावा त्याला कसा माणूस रे म्हणावा मिसळ ज्याने खाल्लीच नसावा संपले काव्य आता रामराम घ्यावा

चुल्हीवरची स्पेशल - साधना मिसळ

इमेज
pic credit - Internet मंत्रभूमी अशी ओळख असलेले नाशिक आता खवय्यांचे नाशिक ही ओळख मिरवणारे शहर बनले आहे. जंकफूड, फास्टफूडच्या जमान्यातसुद्धा येथील दर्दी लोक खवय्येगीरी करण्यात  नंबर एकचं स्थान अबाधित आहे. नाशिकची मिसळ ही कोल्हापुरी मिसळ इतकीच महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. तर्रीदार रस्स्याची, काळ्या मसाल्याची, झणझणीत अशा तोंडाला पाणी आणणाऱ्या अनोख्या चवीची मिसळ शहरात ठिकठिकाणी मिळते.  मिसळ खाऊ घालणारे अनेक हॉटेल्स सेवेत हजर आहेत. पोहे, शेव, कांदा, कोथिंबीर, उसळीची भाजी आणि वरून पिळायला लिंबू शिवाय या प्लेटीच्या जोडीला दही आणि पापड म्हणजे नाश्त्याचा फक्कड बेतचं जणू. शहरातील नावाजलेल्या अनेक मिसळ डेस्टीनेशन्सपैकी एक लाजवाब मिसळ स्टेशन म्हणजे गंगापूररोडवरील बारदान फाट्यालगत असणारं ‘साधना मिसळ’. गेली बरीच वर्षे साधना मिसळ नाशिककरांची भूक भागवत आलेली आहे.  नाशिककरांना लज्जतदार मिसळ खाण्याची सवय साधनाने लावून दिली आहे.  जुन्या नाशकातील हॉटेलसोबतच गेल्या वर्षीच्या अक्षयतृतीयेला साधना मिसळची अजून एक शाखा ही मोतीवाला कॉलेज रोडवर सुरु करण्यात आली.  नाशिकला खास मिसळ खाण्यासाठी म...

निसर्गरम्य पर्यटन अन लज्जत - मामाचा मळा, संस्कृती मिसळ

इमेज
तर, आज या निसर्गरम्य ठिकाणची मिसळ खाण्याचा योग आला. हे निसर्गरम्य ठिकाण दुसरं तिसरं कुठलंच नसून नाशिकमधीलच 'मखमलाबाद' गाव आहे. मुख्य शहरापासून ५ किमी अंतर्गत महापालिका क्षेत्रातील हे गाव. येथे एमटीडीसी, हॉटेल संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने काही वर्षांपूर्वी उभा राहिलेला हा कृषी पर्यटन प्रकल्प 'मामाचा मळा'. जसा त्र्यंबकेश्वर रोडवरील 'हॉटेल संस्कृती' ला पर्यटक, तसेच खवय्यांची दाद आणि पसंती असते तसाच प्रतिसाद 'मामाचा मळा' येथील 'खळ्यावरच्या चवीला' मिळते. हे ठिकाण कृषी पर्यटन अन मिसळ फॅन्ससाठी पर्वणी देणारेच ठरते आहे. photo credit - author नाशकातला माणूस तालुक्यात असणारी लग्ने सहसा चुकवत नाही. मला आठवतं, मी लहानपणीही घरच्यांसोबत अनेक लग्नात जायचोच जायचो. याचे कारण मला 'घुगरी' खायची असायची. लाल रस्सेदार घुगरी ताटात ओतलेली पाहूनच भूक चाळवायची. तिचे टपोरे मोड तर हातात घेऊ वाटायचे. अन, मग तिला वरपत, वरपत अगदी बोटं पण चाटून पुसून खात असायचो. आजच 'घुगरी' आठवायचं कारण म्हणजे आजची मिसळ. अगदीच घुगरी नसली तरी खान्देशी मसाल्याचा वापर केल्याच...

नाशकात वर्ल्ड फेमस - शामसुंदरची मिसळ

इमेज
आमच्या इथं सातपूर एमआयडीसीत छानसे एकमजली हॉटेल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिसळीसाठी नाशकात एकदम वर्ल्डफेमस आहे. मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण यावर माझं खूप वेळा बोलून झालं आहे. तरीही, मिसळला ओव्हररेटेड म्हणणारे पण अपल्या पुढ्यात नांगी टाकतील एवढं भडभडून मिसळीबद्दल बोलत बसायला माझ्याकडे वेळ नाही. तेवढ्या वेळात मी एक मिसळ फस्त करेल, एक्स्ट्रा १२ पावांसोबत. Pic credit - Internet खरेतर मिसळ हे श्रमिकांचे खाद्य आहे. एमआयडीसीत काम करणारा, कष्ट करणाऱ्या कामगाराला पोटभर जेवू घालणारा वडापाव, पाववडासोबत मिसळचाच क्रमांक येतो. परंतु, इथली मिसळ याच्या पलीकडे कधीच जाऊन पोहोचली आहे. आज खाल्ली तेव्हा पावाची साईज मागच्यावेळेपेक्षा जरा बारकी वाटली,पण चव ? अहाहा चव अशी की तिला पाहून कलेजा खल्लास झाला. तोंडाला सुटलेलं पाणी मग पुढे नाकातून खाली ओघळायला लागते, ते तुम्ही ओढून साफ करत नाही     तोच(नाकच ओढता का ? रूमालपण नाकाखालून ओढला जातोच) टाळूवरून एक थेंब हळूहळू गळायला लागलेला असतो, तेव्हा समजायचं की मिसळ अगदी योग्य प्रमाणात रस्सेदार, झणझणीत आहे. योग्यतेपेक्षा अधिक झणझणीत मिसळी पण मी तितक्या...

ऑथेंटिक - हॉटेल सुदर्शनची मिसळ

इमेज
ओठापासून पोटापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक घासाची चव ओठांवर रेंगाळते.. अन, पोटी गेल्यावरही खाल्या मिसळीचा रसस्वाद आपल्याला मनस्वी तृप्तता देत असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे खरोखर दर्दी खवय्ये गर्दी करतात. आधी सगळ्यांच नाशिककरांना बेफाम आवडलेल्या साधना मिसळीचा परिसर आजकल पर्यटकांनी फुलतो. पण, त्यांच्या मिसळ ब्रँडची ग्लोरिफाय झालेली चव आता तशी राहिली नाही हे खंतवतेच. मात्र, रामभाऊ यांच्या मिसळीची बात तशी नाही. तुम्हाला इथं येऊन काही वर्षे जरी झाले असतील तरी पुन्हा आलात तरी तीच चव तुम्हाला मिळेल, याची मी लेखी हमी देऊ शकतो. यामुळेच की काय, इथे तीन वर्षात मिसळीची किंमत ३० वरून ५० रूपये इतकीच वाढली आहे.... मला मिसळ खात जगभरच हिंडायची मनीषा आहे. ती वेळ येईन तेव्हा येईल पण जगाच्या पाठीवर उत्कृष्ट मराठी पदार्थ म्हणून मिसळ मान्यताप्राप्त आहे. ती ज्या हॉटेलची तिथेही मी जाऊन 'आस्वाद' घेतला. पण, माझा सपशेल भ्रमनिरास झाला. त्याचं काही नाही, नाशिकहून जाऊन ती खाणे, रस्ता शोधत तिथपर्यंत पोहोचणे अन, मिसळीसाठी कोरी शंभराची नोट मोडणे फारच जीवावर येऊन गेलं. फारच तेव्हा मन हेलावून गेलेलं होतं. आता, ह्या...

नाशिकची ओळख - भामरे मिसळ

इमेज
भामरे मिसळ नाशिकची ओळख' मालकांनी, असा लोगोच ट्रेड मार्क करून घेतला आहे. भामरेची मिसळ ही नाशिकची ओळख म्हणजे काय ? तर, ही मिसळ खरोखरच तुमच्या लक्षात राहण्यासारखी आहे. सामान्य तिखटपणा चालणाऱ्याला इथली झणझणीत चव सहन होणं फार कठीण आहे. याशिवाय भरपूर मिसळ, शेव, कांदा, तर्री अन रस्सा मोठ्या प्लेटमध्ये दिले गेल्यावर सहजासहजी तुम्हाला सगळी मिसळ संपूच शकत नाही. अगदी तीन पावसोबत वर अर्धा प्लेट शेव अन शेवटी ताकाचा ग्लास घेतला की पोटभरून माणसाला अगदी मोठा ढेकर आल्याशिवाय राहत नाही. तसे, नाशिक शहराला ओळखायला इतर चिक्कार गोष्टी असल्या तरी केवळ 'मिसळ' म्हटलं की कोल्हापूर-नाशिक हीच नावे तोंडाला पाणी आणणारी आहेत. अन, हे मान्य असायलाच हवे. इतर शहरांच्या मिसळीची त्यांची एक अलग ओळख अशी आहेच. लंडनमध्ये गौरवलेली फरसाण घातलेली शेवभाजीला मुंबईत मिसळ म्हटले गेले आहे. अवघ्या मुंबईत तशी ती तयार करत असतीलही, असो त्या शहराची ती शैली झाली. मोड वगैरे येईपर्यंत मटकी कोण भिजवणार, नाशिकहून इतकी मटकी मुंबईत रोज कशी कधी पोहोचणार, गटाराच्या पाण्यात पालक होतो तशी मटकी येत नाही ना म्हणून मुंबईत मग शेव, फरसाण अन म...

झणझणीत मिसळ - हॉटेल तुषार

इमेज
मिसळ .... नुसते नाव जरी निघाले तरीही मिसळीची झणझणीत चव आठवते, जीभ आपली आपणच रेंगाळून घेतो. मिसळ हा एक असा पदार्थ आहे जो नाशिक या शहरात वर्ल्ड फेमस आहे. जगात अनेक ठिकाणी मिसळ मिळते, परंतु सर्वोत्कृष्ट चव ही नाशिकच्याच मिसळीला आहे, ह्या सत्याची तिखट नोंद घ्या. इथे अशी रस्सेदार परिस्थिती आहे की ज्या ज्या कॉलनीत छोटी हॉटेल्स आहे, तिथेही वेगळ्या मसाल्यांची, तिखटाच्या प्रमाणात काहीसा कमी-जास्तपणा असणारी मिसळ ही असतेच. यातही कानिटकर रस्त्यावरची...... बुचकळ्यात पडू नका, कॉलेजरोडवरची तुषार हॉटेलची मिसळ ही भलतीच भारी. तसे मिसळीला वर्षभर सुगीचेच दिवस असतात म्हणा. मात्र, पावसाळ्यात मिसळ खायची मज्जा काही न्यारीच असते. असेही आपल्याला पाऊस पडून गेल्यावर वाफाळलेला चहा, कॉफी, कांदाभजी, मिरचीवडे खावेसे वाटतातच ना. मग त्यात मिसळीचा अपवाद कसा असेल. तर मिसळ शौकिनांची हौस पुरेपूर भागवणारे हॉटेल तुषार आहे. नाशिक शहरातील बऱ्याच हॉटेलांत अनेक सेलिब्रिटी, राजकारणी येऊन गेल्याचे फोटो लावण्याची प्रथा आहे, तुषारमध्येही आपल्याला ते दिसतात. शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणच्या जागी हे हॉटेल आहे. जिथे कॉलेजला जाणारे मुल...