विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

तर्री

सरसरून येते
उकळूनी
अन शहारून
टाकते जिवा
घोटा-घोटातून तेव्हा

तरतरून जाते जिव्हा

pic credit - Internet

येती उठून तरंग
खोल खोल मनातून
लालबुंद तुझा तवंग
सुखावून जातो आम्हा
अगदी गात्रागत्रांतून

तू भिणतेस क्षणा-क्षणात
नव्याने नव्याने
उमगत जाते प्रत्येक झटक्यात
काबीज करून घेतेस काळीज आमचे
प्रत्येक ठसक्यात

भिजून जातो जो तो
तुझ्या रंगा-संगाने अंगा-अंगाने
तू ओतप्रोत प्रेम ओततेस
जीव चुर-चुर झुरतो
चिंब होते आम्हास घामघामाने

सोबतीस साऱ्यांच्या येऊन
तू जराशी मागाऊन
पण, मग राहवत नाही कुणाला
तुझ्यावाचून
करमते ना मग तुझ्यात
सामावल्यावाचून

तुझ्यावरच्या प्रेमाची
गोष्ट कोणा वाटेल ना खरी
तरी'ही तू प्रियच ऱ्हाशील आमची 'तर्री'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग