विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

निसर्गरम्य पर्यटन अन लज्जत - मामाचा मळा, संस्कृती मिसळ

तर, आज या निसर्गरम्य ठिकाणची मिसळ खाण्याचा योग आला. हे निसर्गरम्य ठिकाण दुसरं तिसरं कुठलंच नसून नाशिकमधीलच 'मखमलाबाद' गाव आहे. मुख्य शहरापासून ५ किमी अंतर्गत महापालिका क्षेत्रातील हे गाव. येथे एमटीडीसी, हॉटेल संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने काही वर्षांपूर्वी उभा राहिलेला हा कृषी पर्यटन प्रकल्प 'मामाचा मळा'. जसा त्र्यंबकेश्वर रोडवरील 'हॉटेल संस्कृती' ला पर्यटक, तसेच खवय्यांची दाद आणि पसंती असते तसाच प्रतिसाद 'मामाचा मळा' येथील 'खळ्यावरच्या चवीला' मिळते. हे ठिकाण कृषी पर्यटन अन मिसळ फॅन्ससाठी पर्वणी देणारेच ठरते आहे.

photo credit - author

नाशकातला माणूस तालुक्यात असणारी लग्ने सहसा चुकवत नाही. मला आठवतं, मी लहानपणीही घरच्यांसोबत अनेक लग्नात जायचोच जायचो. याचे कारण मला 'घुगरी' खायची असायची. लाल रस्सेदार घुगरी ताटात ओतलेली पाहूनच भूक चाळवायची. तिचे टपोरे मोड तर हातात घेऊ वाटायचे. अन, मग तिला वरपत, वरपत अगदी बोटं पण चाटून पुसून खात असायचो. आजच 'घुगरी' आठवायचं कारण म्हणजे आजची मिसळ. अगदीच घुगरी नसली तरी खान्देशी मसाल्याचा वापर केल्याचा ठसका या मिसळला जाणवतो. सोबतीला पापड, दही, जिलेबी असा एकूण सगळा लज्जतदार बेत होतो. याशिवाय खासमखास गोष्ट म्हणजे रस्सचा एवढा मोठा मग मी नाशकात कुठेच पाहिला नव्हता. इतका महाकाय मगभर रस्सा देऊन कितीही घ्या, भरपेट खा हेच इथल्या यजमानांना सुचवायचे असेल नाही ?
'मामाचा मळा' येथील यशस्वी कृषी पर्यटन मोहीत करणारे आहे. वृक्ष, लॉन, बैलगाडी, खळ्यासारखी बैठक रचना हे सगळं पाहून रोजच्या धकाधकीला थोडंस विसरायला होतं. आल्हाददायक अनुभव घेता येतो.

photo credit - author

नाशकात ठिकठिकाणी एवढी चविष्ट अन झणझणीत मिसळ मिळते. अन खवय्या नाशिककर तिच्यावर मनमुराद प्रेम करतो. यांच्यातील प्रत्येकजण आपापल्या आवडत्या ठिकाणी जात मिसळीवर आडवा हात मारून येतो. हे पण ठिकाण हटकून वेळ काढून भेट देण्यासारखं आहे. तेव्हा नक्कीच जायला काही हरकत नाही. लहान मुलांना खेळायला खूपशी जागा, खेळणी आहे. उंटाची, घोड्याची सफर आहे. 'बिस्की' ही पग कुत्री, ससे बालगोपाळांचे मनोरंजन करतात. समोरच असलेला कारंजा ही मोठ्यांना सुखावह दृश्यमयता देतो.
मखमलाबाद गावातून दरी मातोरी रस्त्यावर हे ठिकाण आहे. जाण्यासाठी मुंगसरा बसने जाता येते अथवा स्वतःचे वाहन असल्यास उत्तमच. मग, कधी येताय 'मामाचा मळा' ला 'मिसळ खायला' ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका