विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आरोग्यदायी सल्ला - मिसळ खा, स्वस्थ राहा

नाशकात प्रत्येक कॉलनीत एक खानावळ असतेच. जिथं शिकायला आलेली मुले मुली वास्तव्य करतात तिथे तर हमखास असते. त्या मुलांचे पोट भरणारी आणि खिशाला परवडणारी अशी जगातली सोय म्हणजे या खानावळी. या फोटोतील मिसळ हॉटेल त्रिमूर्तीची आहे. घरगुती पद्धतीच्या मिसळीला जरासे तिखट बनवून, मोठी शेव टाकली, लाल रस्सा झाला की झटकेदार मिसळ तयार.

अशा खानावळींचे आर्थिक गणित बेतानेच जुळते. यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली खानावळ दुपारपर्यंत संपलेली असते, मग उरलेल्या रस्सावर खानावळीत आलेल्यांना भूक भागवावी लागते. तसंही, मिसळीची गंमत अशी की लोक त्या रस्सासाठीपण जीव टाकतील.

खानावळीत एक आजी तर पाहिजेच. हो, शहरभरची हा प्रेमळ ट्रेंड झाला आहे. अनेक आया-आजी खानावळ चालवतात. तर, या आजी मला हा फोटो काढल्यावर म्हणताय, 'सुनेला पाठवायचा का' ? मी फोटो काढताना दिसलो म्हणून बोलल्या. इतर मुलं जी भुकेल्या चेहऱ्याने काळवंडून चालली होती, त्यांनाही मायेने चौकशी करून या आजीबाई खायला देतात. खानावळीत असा मायाळूपणा खूप जाणवतो.

मिसळ खाऊन पोट आपोआप भरून जाते. पावात ईस्ट वगैरे पदार्थ असतात, ते पोटात फुगतात वगैरे गोष्टी फार लक्षात घ्यायच्या नाहीत. अशावेळी, मिसळो परम धर्म म्हणून तिचा आस्वाद घेण्याचे पुण्यकर्म पटपट करून टाकायचे असते. छोट्या खानावळीत कदाचित रस्साही फार वेळा दिला जात नाही तरी शेवटी नुसता रस्सा वरपणे सोडायचे नाही. मिसळ खाताना मुळीच गद्दारी करू नये. पोळी भाजीला लावून खातो तशी खाऊ नये. यासाठीच भाजीच्या रश्यात पोळी चुरून कुस्करून खायची सवय लावूनच घ्यावी. म्हणजे, मिसळ खाताना तिचा अपमान होत नसतो.

Pic credit - author

मिसळ कधी कुणावरच कोपत नसते. काही मिसळींचा स्वभावच फारच अतरंगी ज्या पोटात जिरल्यानंतरही आपल्याला एक वेगळा 'झनाटेदार' आनंद देत असतात. असे जरी असलं तरी मिसळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती खाल्याने तुम्हाला आंबट ढेकर येऊच शकत नाही, यामुळे मिसळीमुले पोट खराब होते असे म्हणणाऱ्याचे तिखट मिठाची बटाटा भाजी खाऊन पण दुखते असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे असते. म्हणूनच स्वस्थ राहायचे असते तर मिसळ खाणे अनिवार्यच ठरते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

गुलाब - प्रेयसीवर रचलेली मराठी कविता