विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

नाशिकची ओळख - भामरे मिसळ

भामरे मिसळ नाशिकची ओळख' मालकांनी, असा लोगोच ट्रेड मार्क करून घेतला आहे. भामरेची मिसळ ही नाशिकची ओळख म्हणजे काय ? तर, ही मिसळ खरोखरच तुमच्या लक्षात राहण्यासारखी आहे. सामान्य तिखटपणा चालणाऱ्याला इथली झणझणीत चव सहन होणं फार कठीण आहे. याशिवाय भरपूर मिसळ, शेव, कांदा, तर्री अन रस्सा मोठ्या प्लेटमध्ये दिले गेल्यावर सहजासहजी तुम्हाला सगळी मिसळ संपूच शकत नाही. अगदी तीन पावसोबत वर अर्धा प्लेट शेव अन शेवटी ताकाचा ग्लास घेतला की पोटभरून माणसाला अगदी मोठा ढेकर आल्याशिवाय राहत नाही. तसे, नाशिक शहराला ओळखायला इतर चिक्कार गोष्टी असल्या तरी केवळ 'मिसळ' म्हटलं की कोल्हापूर-नाशिक हीच नावे तोंडाला पाणी आणणारी आहेत. अन, हे मान्य असायलाच हवे.
इतर शहरांच्या मिसळीची त्यांची एक अलग ओळख अशी आहेच. लंडनमध्ये गौरवलेली फरसाण घातलेली शेवभाजीला मुंबईत मिसळ म्हटले गेले आहे. अवघ्या मुंबईत तशी ती तयार करत असतीलही, असो त्या शहराची ती शैली झाली. मोड वगैरे येईपर्यंत मटकी कोण भिजवणार, नाशिकहून इतकी मटकी मुंबईत रोज कशी कधी पोहोचणार, गटाराच्या पाण्यात पालक होतो तशी मटकी येत नाही ना म्हणून मुंबईत मग शेव, फरसाण अन मटार, मूग, चवळी आदी कसला रस्सा केला की मिसळ होते. असोच असो, कारण मिसळ खाऊन घामाघुम झालं तर आधीच गर्दीने पिचलेल्या मुंबईकरला कपडे ऑफिसात वाळत घालून काम करावे लागेल. म्हणून जी आहे ती बरी आहे. आता, खरंच असो ह. चला परत, भामरे मिसळकडे.
Pic credit- author 

तर, मुख्य शहरापासून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच सध्याची भामरे मिसळ स्थायिक आहे. हॉटेल म्हणून हे ठिकाण नक्कीच नाही. इथे ज्याचं येणं होतं तो प्रत्येकजण मिसळच खायला येतो. अगदी मिसळ म्हणजे अती नावाजलेला अन उगाचच प्रसिद्ध पावलेला पदार्थ समजणाराही एकदा तरी इथली मिसळ खाऊन गेलाच पाहिजे. पोटाच्या सगळ्या त्यांच्या सगळ्या तक्रारी दूर होतील ही खात्री देतो.
लालेलाल रस्सा, पिवळीधम्म अन आकाराने रुबाबशीर शेव, कुरकुरीत बारीक शेव अन मोड आलेली चवदार मटकी ही मिसळ ज्यावेळी आपण ताटात कांदा टाकून सजवतो. तेव्हा जणू अस्सल रूपखणी स्त्री साजशृंगार लेवून डोळ्यांनी पाहावी तशीच भासते. मग या मिसळीभोवती रस्सा, अन तर्री ओतून सजवली की या मिसळीचे रूप नयनात फक्त साठवून घ्यावे असेच खुलते. मऊशार गादीप्रमाणे लुसलुशीत पाव त्यात घोळून जिभेवर ठेवताच तुमच्या रसनेची परीक्षा होऊन जाते. डोळ्यांचे पारणे फेडत फेडत मिसळ कधी चट्टामट्टा होऊन फस्त होते समजूनसुद्धा येत नाही. रक्तवर्णी डोळे, डोक्यावर जमणारा घाम मिसळीचं आपल्या अंगभर झिरपत जाणे स्पष्ट करते. मिसळ म्हणजे खाताना तल्लीन होऊन, मग्न होऊन जाणे, अन तो अनुभव ही मिसळ खाताना नक्कीच येतो.
मध्यंतरी चुलीवरच्या मिसळीचा किळसवाणे, ओंगळ रूप समोर आले होते. नाशकात मिसळ खाऊ घालणे हे श्रद्धापूर्वक केले जाणारे काम असायला हवे. नाशकात पोट भरत नाही म्हणून कुणी मिसळ खायला येत नाही. मिसळ एक फॅटसीसारखी आहे. नवनवीन अनुभव देणारे मायावी व्यंजन म्हणजे मिसळ आहे. व्यवसाय करताना हे जपलं पाहिजे.मिसळीचा बाजार मांडले जाऊ नये. मिसळशी भावनात्मक नाते आहे. ते जपले तर लोक तुमचं हॉटेलच काय अगदी गाडा जरी असला साधा तरी त्याकडे ओढले जातात. असो. नाशकात अनेक ठिकाणी याच भावभक्तीने मिसळीकडे बघणारे लोक आहेत, हे विसरले जायला नको. मिसळ खाऊ घालणारे अस्सल मिसळप्रेमी हवे, व्यवसायप्रेमी झालं की संपलाच विषय !
या पोस्टचा पण विषय संपला म्हटलं !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका