विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

चुल्हीवरची स्पेशल - साधना मिसळ

pic credit - Internet
मंत्रभूमी अशी ओळख असलेले नाशिक आता खवय्यांचे नाशिक ही ओळख मिरवणारे शहर बनले आहे. जंकफूड, फास्टफूडच्या जमान्यातसुद्धा येथील दर्दी लोक खवय्येगीरी करण्यात  नंबर एकचं स्थान अबाधित आहे. नाशिकची मिसळ ही कोल्हापुरी मिसळ इतकीच महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. तर्रीदार रस्स्याची, काळ्या मसाल्याची, झणझणीत अशा तोंडाला पाणी आणणाऱ्या अनोख्या चवीची मिसळ शहरात ठिकठिकाणी मिळते.  मिसळ खाऊ घालणारे अनेक हॉटेल्स सेवेत हजर आहेत. पोहे, शेव, कांदा, कोथिंबीर, उसळीची भाजी आणि वरून पिळायला लिंबू शिवाय या प्लेटीच्या जोडीला दही आणि पापड म्हणजे नाश्त्याचा फक्कड बेतचं जणू. शहरातील नावाजलेल्या अनेक मिसळ डेस्टीनेशन्सपैकी एक लाजवाब मिसळ स्टेशन म्हणजे गंगापूररोडवरील बारदान फाट्यालगत असणारं ‘साधना मिसळ’.

गेली बरीच वर्षे साधना मिसळ नाशिककरांची भूक भागवत आलेली आहे.  नाशिककरांना लज्जतदार मिसळ खाण्याची सवय साधनाने लावून दिली आहे.  जुन्या नाशकातील हॉटेलसोबतच गेल्या वर्षीच्या अक्षयतृतीयेला साधना मिसळची अजून एक शाखा ही मोतीवाला कॉलेज रोडवर सुरु करण्यात आली.  नाशिकला खास मिसळ खाण्यासाठी म्हणूनही अनेक पर्यटक येत असतात, बऱ्याचदा शहरातला रहिवासीही झणझणीत जेवणाची हुक्की आल्यावर मिसळ खायला म्हणून बाहेर पडत असतो. मग एखाद्या निसर्गरम्य वातावरणात,  तांब्या-पितळ्याच्या भांड्यात, बगीचा रेस्तराँमध्ये जर जिभेवर राज्य करणाऱ्या मिसळीचा आस्वाद मिळाला तर, अहाहाहा ! सुख याहून वेगळे असूच शकत नाही ना ? मित्र-मैत्रिणी, कुटुंबासमवेत निवांत वेळ घालवायला, गप्पा मारायला या इथे मोठा बगीचा आहे, मस्तपैकी मिसळ खावून झाल्यावर, तृप्तीची ढेकर दिल्यावर, जरा पाय मोकळे करून यावं आणि झोपाळ्यावर निवांत हिंदोळे घेत काही वेळ घालवावा, कदाचित फक्त मिसळ खायला म्हणून बाहेर पडलेलो आपण इथल्या आल्हाददायक वातावरणातून एक नवीन स्फूर्ती रोमारोमात साठवूनच बाहेर पडू.  या जागेच्या वैशिष्ट्यांमुळेच कॉलेजला जाणाऱ्या तरुण तरूणींच साधना मिसळ हा आवडता पिकनिक स्पॉट बनलेला आहे. स्मॉल गेट टूगेदर साठी साधना मिसळची ही जागा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. केरळ, गोवाला आल्याप्रमाणे  फील गुड इथे वाटते असे साधनात मिसळ खायला येणाऱ्या काही लोकांचे म्हणणे आहे.

मिसळीच्या चवीबद्दलच बोलायचे झाल्यास ओपन किचनमधून मिसळीचा घमघमाट हा पोटातली भूक खळबळून जागी करतो. चूल, लाकडी बाकडे, अद्भूत वारली चित्रकला अन आजूबाजूचा कवेत घेऊ शकू असा खुला निसर्ग मन हरखून जाते, थक्क होवून जायला होते, चित्त प्रसन्न होवून जाते. मिसळ खायला येणाऱ्या हा असा सुखद अनुभव निर्मळ आनंद देणारा असतो. गेली पासष्ट वर्षे जुना असलेली विशिष्ट पद्धती वापरून तयार केलेला घरगुती मसाला आणि चुलीवर ठराविक तापमानाला दिलेला शेक,  यातच काय ते मिसळीच्या अप्रतिम चवीचं गिमिक आहे असा माझा अभ्यास सांगतो. तसेही आपल्याकडचा युएसपीचे गुपित मला कुणी कशाला शेअर करेल म्हणा. साधना मिसळ ही राजन आणि मंगेश आमले ह्या दोन बंधूंच्या मार्गदर्शनाखाली वसलेलं पोटाची शुधाशांती करणारे अस्सल हॉटेल आहे, हे सगळं खाद्यवैभव उभ करण्यामागचे त्यांचे मोठे कष्ट आहे. यासाठी खरंच त्या द्वयींचे कौतुक करायला शब्द थोडे पडावेत.

 सोमेश्वरपासून काही अंतर पुढे गेलं की बारदान फाट्याला वळायचं शिवाजीनगरमधून प्रवास करता करता रस्त्याच्या कडेला नारळांची झाडे, एक झोपडी, घोडा, झोपाळे, विस्तीर्ण लॉन इतका सारा गहजबकारी लवाजमा दिसलं की आपण साधना मिसळपाशी आलो असे समजावे. इतर ठिकाणी सहसा मोठी हॉटेल्सच्या बाहेर पान टपरी असते, परंतु इथे निव्वळ मिसळीचे ठिकाण असले तरी इथेही एका भाऊने त्याचा ठेला लावला आहे.  साधना मिसळीच एक वेगळे खरेतर नाही म्हणता येणार पण आमलेंनी कधीही इथे इथे मिसळ मिळते अशी जाहिरात केलेली नाही. लोकांनी सांगितले लोकांना मग त्यांनी अजून काही लोकांना अशी माऊथ टू माऊथ पब्लीसिटी या हॉटेलची झालेली आहे. अर्थात नाशिक म्हटलं की प्रत्येकालाच बाहेर नाश्ताकार्याला पडल्याबरोबर मिसळही आठवतेच आठवते, या गोष्टीला साधना मिसळही अपवाद नाही, पण इथे येणारे लोक हे सामान्य नाशिककर नाहीत, उच्चभ्रू  आणि आर्थिक परिस्थितीने उच्च मध्यमवर्गीय आणि वरच्या दर्जाचे लोकच इथे मिसळ खाण्याचा आनंद लुटू शकतात.

जेलरोडवरील रामेश्वर नावंदर तर सांगतात, परिवारासमवेत वेळ घालवायला, अस्सल चुलीवरची मिसळ खायला आम्ही नेहमीच इथे येतो, इथे सेवाही चांगली भेटते. इथे काम करणारे आचारी, वाढपी यांच्यात मराठी बोलणाऱ्यांचे कमी तसे कमीच आहे. बाहेरील प्रांतातून रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले बरेचसे कामगार इथे पाहायला मिळतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका