पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

इंदीरा संत.

पुस्तकांतली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे; पिसाहुनि सुकुमार कांहिसे देतां घेतां त्यांत थरारे. मेजावरचे वजन छानसे म्हणुन दिला नाजूक शिंपला; देतां घेतां उमटे कांही मिना तयाचा त्यावर जडला. असेच कांही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा; देतां घेतां त्यातं मिसळला गंध मनांतिल त्याहुन हिरवा. इंदीरा संत.

सुधीर मोघे

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश, पाणी, तारे-वारे सारे सारे ताजे होतात वर्षांच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात संभ्रम, स्वप्नं, तळमळ-सांत्वन किती किती तर्‍हा असतात सारय़ा सारख्याच जीवघेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात प्रेमाच्या सफ़ल-विफ़लतेला खरतरं काहीच महत्व नसतं इथल्या जय-पराजयात एकच गहिरं सार्थक असतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं

कुसुमाग्रज

कुसुमाग्रज - थेंब महासागराचं चरित्र मला माहीत आहे माहीत आहे त्याची महतीही, पण मी राहतो आहे फुलाच्या पाकळीवर अवकाशातून उतरलेल्या दहिवराच्या एका लहानशा थेंबामध्ये; मला माहीत आहे हेही की जगातील सार्‍या थेंबांवर अंतिम मालकी आहे महासागराची, आणि तरीही माझी बांधीलकी पृथ्वीला वेढणार्‍या त्या सीमाहीन महातत्त्वाशी नाही, ती आहे -- माझ्याच अस्तित्वाने ओथंबलेल्या स्फटिकाच्या या थेंबाशी; कारण -- माझी बांधीलकी ज्ञानाची नाही आहे फक्त प्रेमाची.

सौमित्र

----- सौमित्र (किशोर कदम) जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे, जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे, मना सारखा अर्थ लागायचे, अन मना सारखे शब्द ही यायचे. नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे, नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे, निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे. उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे, असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे, रुतून रुतुनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे, मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे, मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे, मना भोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे, आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे, आता पावलेही दुखू लागले की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, न...

cortsey: marathiworld.com

गझलच्या उजेडात गझलविषयी गझल म्हणजे काय? कवितेची व्याख्या करणं जसं कठीण तसंच गझलची व्याख्या करणंही कठीण. पण तिची प्रकृती आणि त्या प्रकृतीची वैशिष्टये सांगता येतील असं वाटतं. गझल म्हणजे, - अंतिम ज्ञानाच्या मौनाआधीचं संगीत. गझल म्हणजे, ध्वनींच्या कोलाहलात राहून दूरचे नाद ऐकणं, आणि मग ते इतरांना ऐकवणं. गझल म्हणजे, - मर्म जाणणं. ते जाणलेलं मर्म उलगडून दाखवणं. गझल म्हणजे, ब्रह्मांडाच्या विराट पोकळीत एका केंद्र बिंदुवर स्वत:ला स्थापन करून तल्लीन होत समाधी साधणं. गझल म्हणजे, - आपल्या शरीर आणि आत्म्यासकट एकूणच अस्तित्त्वाचं भिंग करून आसपास, भोवतालच्या विश्वाला निरखणं. गझल आणि शेर: गझल हे केवळ एका काव्यप्रकाराचं नाव नाही, ते एका विशिष्ट विचारशैलीचं नाव आहे. ते विशिष्ट अशा जीवनदृष्टीचं नाव आहे. ते एका तिरकस प्रकृतीचं नाव आहे. अशी प्रकृती जिला पठडी मान्य नाही, जिला चाकोरी मान्य नाही, जिला दुनियेची दुनियादारी आणि तिची दंडेली मान्य नाही. गझल म्हणजे, अशी प्रकृती जी कालसंगिनी आहे. तिचं एक पाऊल वर्तमानाच्या डोक्यावर असतं तर, दुसरं भविष्याच्या. गझल ही अशी प्रकृती आहे, जिला इति...

courtsey: unique features

‘’मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ किंवा ‘त्रिशंकू’ या अधिक ’माहीत असलेल्या पुस्तकांवर लिहिण्याची संपादकांची अपेक्षा असली, तरी या लेखात लिहायचं आहे ते ‘’मुखवटा’ या 1999 साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीबद्दल. खरं म्हणजे ‘’मुखवटा’ची (पृ. 554) आतापर्यंत चार पुनर्मुद्रण झाली आहेत, पण ती या इतर कादंब-याइतकी चर्चिली गेली नाहीत त्यास काही कारणं असावीत. वरील पहिल्या दोन कादंब-या मराठी वाचनसंस्कृती ऐन भरात असताना प्रसिद्ध झाल्या आणि त्यांचे विषयही मराठी कादंबरीसाठी नवीनच. ’मुखवटा’ आली तेव्हा संगणकीय-डिजिटल क्रांतीचा ब-यापैकी प्रसार होऊन तरुणांचं वाचनावरून लक्ष उडू लागलं होतं. त्याचं धक्का देणारं प्रत्यंतर आलं. एक-दोन महत्त्वाचे अपवाद वगळता प्रतिष्ठित नियतकालिकांनी कादंबरीकडे दुर्लक्ष केलं. जाणकार समीक्षकांनी तेव्हा आणि नंतरही कधी दखल घेतली नाही. वाचकांच्या पत्रांचा मात्र समाधानकारक प्रतिसाद होता. पत्रं येत ती कार्डावर किंवा इनलँडवर नव्हे तर 8-10 पानी. इंटरनेट सुलभ झालं तेव्हा प्रतिसाद वाढला. इथे ही कादंबरी निवडण्याचं हे कारण नव्हे. मला स्वत:ला आणि ज्यांना मानतो अशा पुष्कळ वाचकांना ’मुखवटा’ अनेक कारणांनी ...

पब आणि मराठी संस्कृती.

  नाशिकसारख्या छोट्या शहरात कॉलेज रोड, गंगापूररोडवर तरुण-तरुणींचा धिंगाना रात्रभर सुरु असतो.   मेट्रो-सिटीज म्हणून नावारूपाला आलेल्या मुंबई-पुणे शहरात याचे प्रमाण अफाट आहे. वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्रात ‘सांस्कृतिक स्थित्यंतर’ किंवा ‘पाश्चिमात्य अनुकरणाचा’ पाया हा याच मेट्रो सिटीजमध्ये रोवला जातोय. का ?   आपल्या मराठमोळ्या संस्कृतीतही नृत्य, गायन या कला तुम्हाला करमणूक करवून देण्यासाठी समृद्ध आहेतच. मनोरंजन करू शकतीलच परंतु त्यातून   विचार विनिमय आणि   प्रबोधन करू शकतील असे कित्येक लोककलेचे प्रकार मराठी संस्कृतीत रुजलेले आहेत,(इतर भाषिक संस्कृतीतही आहेत, पण मला ज्यांची पूर्ण माहिती आहे त्याबद्दल मी सांगतो) जसे की भारुड, कीर्तन, अभंग, भजन, लोकगीते, लोकसंगीत आणि नृत्य, जागरण-गोंधळ   त्यांना   जोपासून, विकसित करून, जतन- संवर्धन करून आपली अस्मिता टिकवून पुढच्या पिढीस देणे हे मी   महाराष्ट्रीय किंवा जय भवानी-जय शिवाजी अशी हरोळी   देणाऱ्या, नुसताच मराठीपणाचा   टेंभा मिरवणाऱ्या प्रत्येक कलंदराचे आदिकर्तव्य होते. मात्र,   मराठी/ भारती...

पाणी हेच आहे प्राण्यांचे जीवन ......कविता

पाणी हेच आहे प्राण्यांचे जीवन .... न मिळता पाणी प्राण्यांचे होते   मरण ....... मुक्या प्राण्यांनी टाहो कसा.   फोडावा.... आक्रोश त्यांचा सहण्यापलीकडचा...   सत्कार्याचे पाऊलुया ......... सारे मिळून उचलुया ...... मुक्या प्राण्यांचा जीव वाचवूया   पाण्याने भरले भांडे........ ठेवूया     परिसरात ……. आपल्या परिसरात द्या ओ   ठेवूनी........ मिटवा   तहान   मुक्या प्राण्यांची........... घोटभर पाण्याने   मिटवा   काहिली तुम्ही   त्या बिचाऱ्याची ..... खरोखरीच घडेल सेवा मानवतेची............. भूतदयेची............................................ आनंद नांदू लागेल घरी दारी .............. ...... आनंद नांदू लागेल घरी दारी ..............                                                  विशाल लोणारी  

शूटिंगचा अनुभव

  कदाचित पुढील प्रसंग वाचून, काय फेकतोय हा ! अशी प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटेल, मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवणे अवघड वाटेल. तरीही बिनघोर प्रस्तुत प्रसंग हा खरा आहे आणि तो योगायोग नाही बरं का ! पावसाळ्याचे दिवस असतील. पाऊस मुसळधार पडून गेल्यानंतरचे कोरडे, ढगाळ हवामान होते. वारा सुखद आणि आल्हाद गारव्यासह. एके दिवशी रविवारी सकाळी साडे आठ-नऊ वाजेच्या सुमारास बाईक राईडसाठी म्हणून मी निघालो घरापासून जवळच असणाऱ्या आणि नवे नवे डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवत होतो. रस्ता शहरातील   म्हसरूळ आणि गिरणारे यांना जोडणारा होता, या रस्त्यावरून जाताना दरी, मातोरी, मखमलाबाद अशी छोटी   गावं लागतात, माझ्या हिरो होंडा पॅशन गाडीवरून वाऱ्याशी मी बोलत निघालो . व्ह्रूम व्ह्रूम करत फिरताना   रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती नजरेस   पडली. एक दोन साधी घरे, माडाची झाडे, फुलांची शेती, द्राक्षाचे बाग आणि लांबवर असलेले तरी   नजरेत मावणारे हिरवा थाटमाटाचे   डोंगरही दृष्टीत सामावले गेले. मला ते   माझ्यासोबत रहावे असे वाटले, यासाठी त्यांचे   फोटोज काढणे ...

सक्सेस सिक्रेट

झालं ! पुढचे काही दिवस तरी ‘एन्जॉय’ हा शब्दच युथच्या डोक्यातून डीलिट होणार. दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होत आहेत ना. मग प्रचंड दडपण, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत अभ्यास, बदाम-खारीक, आक्रोड, दूध अधिक प्राणायाम, ध्यान, देवपूजा आदी अनंत उपाय... परीक्षेत सर्वोत्तम मार्क्स मिळवून यश मिळवण्यासाठी. आयुष्यात अत्यंत महत्वाचे टप्पे म्हणजे दहावी आणि बारावी. ही दोन वर्ष का महत्वाची, तर इथून आयुष्याला, शिक्षणाला एक नवीन वळण मिळत असते, इथे संपादित केलेले यश पुढे भवितव्य घडविणारे असते, त्यामुळेच मग पुढचे काही दिवस सिनेमा, टीव्ही, रेडीओ, सोशल नेटवर्क, फिरणे, खाणे-पिणे या सगळ्या धमाल मस्तीला फाटा देत अभ्यास एके अभ्यासचा चाप्टर युथवर्गात ऑन असणार आहे. दहावी-बारावी सोबतच पदवीस असलेल्यांचाही येत काळ कसोटी पाहणारा आहे, तेव्हा आज थोड यावर डिस्कस. मित्रांनो, बोर्ड असो वा युनिव्हरसिटी, ते तुमचे आयुष्याला दिशा देतील, पण तुमची कोण आहात, कसे आहात हे ठरणे काय तुम्हाला मिळणाऱ्या ३५ किंवा ९० मार्कांवर अवलंबून नाहीये. कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी जायचे ठरवल्यास तुमचे मार्क्स किती हे नाही तपासले जात...

मन बांधता बांधता सुटले .............

सुबोध आज उशिरानेच घरी पोहोचला, कॉलेजच्या पहिल्या दिवशी अजिबात परतायची इच्छा नसताना मनावर एक प्रकारे ओझे घेवूनच त्याला  घरी यावे लागले ,  पहिला दिवस, नवा वर्ग, नव्या-जुन्या ओळखी, नवीन प्राध्यापक- प्राध्यापिका आणि नवीनच परिसर. हळूहळू सगळेच विस्कटत, समजत  जात असते, नव्या माणसांमध्ये  कधी तुम्ही ओळख करून घ्यायला पुढाकार घेता, कधी समोरून मैत्रीचा हात पुढे होतो. सुबोधचेही आज असेच काही झाले होते, त्याच्या क्लासमेटसपैकी सगळ्यांनीच त्याच्या हरफनमोला असण्याला, त्याच्या दिलखुलास बोलण्याला, अघळपघळ वागण्याला दाद दिली होती, आणि  आज तर त्याची  कुठल्याही वर्षी झाली  नसेल  इतक्या पटकन  मैत्री झाली होती. सुशांत, समीर , राहुल, तेजस , ‘दक्ष’, वल्लभ, रोशन ,  मुलींपैकी रिया, आरती आणि वंदना इतरही काही नव्या ओळखी झाल्या. तेजस, दक्ष यांचीही एकमेकांशी चांगलीच ओळख झाली आणि पुढे ही ओळख मैत्रीचा एक नवा इतिहासही बनली. तर वल्लभ हा अगदी नावाप्रमाणेच ‘वल्ली’ मुलगा. इरसालपण, खुशमस्कर्या. रिया ही दूरच्या गावाकडून इथे शिकायला आलेली, वागायला थोडीशी कपटी, स्वार्थी. आरती ...

सकाळ वृत्तपत्रातील माझा लेख

इमेज
ब्लॉगवरील लेखाची सकाळ नाशिक या वृत्तपत्रानेही दखल घेत आजच्या प्रेमदिनाच्या शुभमुहूर्तावर प्रसिध्द करण्यात आला आहे. ब्लॉगवाचकांसाठी खास सकाळमधील लेख इथे देत आहे. http://epaper5.esakal.com/14Feb2015/Normal/Nashik/page6.htm

हृदयी वसंत फुलताना..............

हाय, फ्रेंड्स. बघा, फेब्रुवारी महिना सुरु होवून काही दिवस लोटून गेलेत. जरा जरा उन, वातावरणात आहे जरा जरा थंडीही जाणवते आहे. फ्रेंड्स, हा महिना आहे प्रेमाचा, कारण या महिन्यात जगभरात प्रेमदिन साजरा करण्यात येत असतो. प्रेम, देवाने माणसाला प्रदान केलेली अत्यंत गोंडस, निर्मळ अशी भावना. याच हळव्या, गहिऱ्या प्रेमाला उत्कटपणे आपल्या प्रिय व्यक्तीकडे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी.       मित्रांनो, हा दिवस साजरा करण्यामागे एक विशेष कारणही आहेच. पाश्चात्य देशांत हा दिवस ‘संत व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. चर्च मध्ये जाऊन प्रार्थना केली जाते. या दिवशी ख्रिश्चन धर्म मुख्य असलेल्या देशांत कामकाजाला सुट्टी दिलेली असते. १४ फेब्रुवारीचे महत्व सांगणाऱ्या अनेक दंतकथा पश्चिमेकडील देशात सांगितल्या जातात. पण त्यापैकी एक विशेष आहे ती म्हणजे ‘ज्या काळी रोममधील सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नव्हती, तेव्हा सैनिकांची लग्न लावून दिल्याबद्दल संत व्हॅलेंटाईन यांना तुरुंगवास देण्यात आला होता. सुटकेच्या आधी तुरुंगाधिकारीच्या मुलीस “तुझा व्हॅलेंटाईन” अशी सही केलेलं पत्...