हाय, फ्रेंड्स. बघा, फेब्रुवारी महिना सुरु होवून काही दिवस लोटून गेलेत. जरा जरा उन, वातावरणात आहे जरा जरा थंडीही जाणवते आहे. फ्रेंड्स, हा महिना आहे प्रेमाचा, कारण या महिन्यात जगभरात प्रेमदिन साजरा करण्यात येत असतो. प्रेम, देवाने माणसाला प्रदान केलेली अत्यंत गोंडस, निर्मळ अशी भावना. याच हळव्या, गहिऱ्या प्रेमाला उत्कटपणे आपल्या प्रिय व्यक्तीकडे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी.
मित्रांनो, हा दिवस साजरा करण्यामागे एक विशेष कारणही आहेच. पाश्चात्य देशांत हा दिवस ‘संत व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. चर्च मध्ये जाऊन प्रार्थना केली जाते. या दिवशी ख्रिश्चन धर्म मुख्य असलेल्या देशांत कामकाजाला सुट्टी दिलेली असते. १४ फेब्रुवारीचे महत्व सांगणाऱ्या अनेक दंतकथा पश्चिमेकडील देशात सांगितल्या जातात. पण त्यापैकी एक विशेष आहे ती म्हणजे ‘ज्या काळी रोममधील सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नव्हती, तेव्हा सैनिकांची लग्न लावून दिल्याबद्दल संत व्हॅलेंटाईन यांना तुरुंगवास देण्यात आला होता. सुटकेच्या आधी तुरुंगाधिकारीच्या मुलीस “तुझा व्हॅलेंटाईन” अशी सही केलेलं पत्र त्यांनी लिहिला होतं, काय गंम्म्त ना, आपल्यापैकी अनेकजण १४ तारखेच्या गुलाबी पत्रात सोनेरी, चंदेरी अक्षरात सही करतात ‘युअर व्हॅलेंटाईन’ परंतु खरतर ती एक महान संत आत्म्याची स्वाक्षरी आहे, ज्याने संदेश दिला निस्सीम प्रेमाचा, प्रेम करणाऱ्या अनेक हृदयांचे मिलन घडवलं यासाठी तुरुंग भोगला. पण आता संत व्हॅलेंटाईन डे हा सर्वत्र साजरा होणारा उत्सव झाला आहे. ‘eastern orthdox church, luthern church’ इथे तर संत व्हॅलेंटाईन डे हा ६ जुलै आणि ३० जुलैसही साजरा केला जातो.
आपण आज ज्या प्रकारे हा प्रेमदिन साजरा करतो तसं प्रथम इंग्लड देशात १८व्या शतकात शुभेच्छापत्रे आणि भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला. त्या शतकातला भारताचा इतिहास पाहता, हा दिवस साजरा करण्याची प्रथा का पडली हे तुमच्या लक्षात आलेच असेल ना.. मित्रहो, धार्मिक महत्व कळावे म्हणून हा लेख लिहिला होता, पण काही मनातल्या गोष्टीही सांगतोच. प्रेमदिन आपल्या देशात नक्कीच साजरा केला पाहिजे मात्र जे ओंगाळवाणे स्वरूप आज या सणाला प्राप्त झालंय ते बदलायला हवं, आकर्षणाच्या पलीकडेही एक भावनिक, मानसिक प्रांजळ नाते दोन मनांत तयार होण्यासाठी १४ फेब्रुवारी हा किती सुंदर मुहूर्त आहे. एकमेकांचा सहवास हा हवाच पण तो चारचौघात, चव्हाट्यावर वा कुणाच्या दृष्टीत येऊन कशाला ? प्रेम ही खूप खाजगी बाब आहे मित्रांनो आणि ती ज्याची त्याने खाजगीच राहू देणे इष्ट आहे. कायदा प्रेमाचे काही वाकडे करू शकत नाही असे मानून चालू नका. हृदयी वसंत फुलू द्याच पण, मर्यादांचे उल्लंघन न करता, स्वैराचार न होता, निखळ प्रेम करा ज्यातून मन शांती आणि निर्भेळ आनंद मिळेल. ...
विशाल लोणारी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा