विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

शूटिंगचा अनुभव


 

कदाचित पुढील प्रसंग वाचून, काय फेकतोय हा ! अशी प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटेल, मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवणे अवघड वाटेल. तरीही बिनघोर प्रस्तुत प्रसंग हा खरा आहे आणि तो योगायोग नाही बरं का !

पावसाळ्याचे दिवस असतील. पाऊस मुसळधार पडून गेल्यानंतरचे कोरडे, ढगाळ हवामान होते. वारा सुखद आणि आल्हाद गारव्यासह. एके दिवशी रविवारी सकाळी साडे आठ-नऊ वाजेच्या सुमारास बाईक राईडसाठी म्हणून मी निघालो घरापासून जवळच असणाऱ्या आणि नवे नवे डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवत होतो. रस्ता शहरातील  म्हसरूळ आणि गिरणारे यांना जोडणारा होता, या रस्त्यावरून जाताना दरी, मातोरी, मखमलाबाद अशी छोटी  गावं लागतात, माझ्या हिरो होंडा पॅशन गाडीवरून वाऱ्याशी मी बोलत निघालो . व्ह्रूम व्ह्रूम करत फिरताना  रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती नजरेस  पडली. एक दोन साधी घरे, माडाची झाडे, फुलांची शेती, द्राक्षाचे बाग आणि लांबवर असलेले तरी  नजरेत मावणारे हिरवा थाटमाटाचे  डोंगरही दृष्टीत सामावले गेले. मला ते  माझ्यासोबत रहावे असे वाटले, यासाठी त्यांचे  फोटोज काढणे वा शूट करून घेणे गरजेचे होते. यातून मला दोन फायदे होणार होते,  फोटोग्राफर मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार कोणतेही रॉ शूट वाया जात नाही(कोणत्याही बातमीच्या पॅकेजमध्ये त्याचा वापर करू शकलो असतोच ना) दुसरे म्हणजे परत, परत थोडीच ना अशी निसर्गाशी गट्टी जमवायला आले असते. तेव्हा वेळ न दवडता  आयुष्यातलं पहिलंवहिलं शूट उरकायचे होते. कसे बरे जमवता येईल.. विचार करत असताना ट्यूब पेटली. गाडी थांबवली.

खिशातून मोबाईल काढत काही फोटोज काढले ज्यात पानांनी गच्च बहरून आलेल्या द्राक्षबागा होत्या, मातोरीतून दरीस जाणारा तो खडकाळ अरुंद रस्ता, त्याच्या कोपर्यावरचे झाड, दिसायला खूप छान होते ते. यानंतर फोटो काढले ते डोंगराचे, उभा राहिलेलो तिथून ते डोंगर १२ किलोमीटरवर असूनही रुबाबदार उंचीमुळे  उठून दिसायचे. मी पूर्ण हौस भागवून घेतली मित्रांनो. परत जायचे म्हणून मग नाशिकच्या वेशीपासून वळलो; तरी हे सारे अनन्य वैभवी गर्द क्षण हातून सुटत चालल्यासारखे वाटू लागले, यांना एकत्र समेटून घेण्यासाठी अजून एक शक्कल लढवली.

पुन्हा एकदा गाडी थांबवली, कॅमेरा सुरु केला यावेळेस व्हिडीओचा,  पिक अप घेत गाडी पुन्हा भन्नाट, स्पीड, गेअर्स शिफ्टसोबत कधी मोबाईल उजव्या हातात, मग डाव्या हातात, समोरून जाणारे सायकलवाले, ट्रक्स, पायदळी असलेली मंडळी यांनाही भोवतीच्या मस्त हिरव्या निसर्गासोबत  मोबाईलमध्ये उतरवत होतो, अशा वेळेस क्लच हातात न घेता गेअर्स कमी-जास्त करत हुल्लडस्वारी करणे म्हणजे  भंबेरी उडवणारी, जीकरीचीच राईड होती.

गाडी वेगात असली, मोटारसायकल जरी असली तरीही कधी शूट करायचे असेल तर तेव्हा नक्कीच हा अनुभव माझ्या कामी येणार आहे. एकटा  असल्याने स्वतःला स्वतःची अशी भिती नव्हती, त्यावेळी मला पळता भुई थोडी  खरच भासली. या सगळ्यांतून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो, धाडस करायला, एकट्याने बेधडक कुठेही जायला निघायला. घाबरायचं सोडून दिलयं आता.

                                                         विशाल लोणारी, नाशिक. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग