विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

मन बांधता बांधता सुटले .............

सुबोध आज उशिरानेच घरी पोहोचला, कॉलेजच्या पहिल्या दिवशी अजिबात परतायची इच्छा नसताना मनावर एक प्रकारे ओझे घेवूनच त्याला  घरी यावे लागले ,  पहिला दिवस, नवा वर्ग, नव्या-जुन्या ओळखी, नवीन प्राध्यापक- प्राध्यापिका आणि नवीनच परिसर. हळूहळू सगळेच विस्कटत, समजत  जात असते, नव्या माणसांमध्ये  कधी तुम्ही ओळख करून घ्यायला पुढाकार घेता, कधी समोरून मैत्रीचा हात पुढे होतो. सुबोधचेही आज असेच काही झाले होते, त्याच्या क्लासमेटसपैकी सगळ्यांनीच त्याच्या हरफनमोला असण्याला, त्याच्या दिलखुलास बोलण्याला, अघळपघळ वागण्याला दाद दिली होती, आणि  आज तर त्याची  कुठल्याही वर्षी झाली  नसेल  इतक्या पटकन  मैत्री झाली होती. सुशांत, समीर, राहुल, तेजस, ‘दक्ष’, वल्लभ, रोशन,  मुलींपैकी रिया, आरती आणि वंदना इतरही काही नव्या ओळखी झाल्या. तेजस, दक्ष यांचीही एकमेकांशी चांगलीच ओळख झाली आणि पुढे ही ओळख मैत्रीचा एक नवा इतिहासही बनली. तर वल्लभ हा अगदी नावाप्रमाणेच ‘वल्ली’ मुलगा. इरसालपण, खुशमस्कर्या. रिया ही दूरच्या गावाकडून इथे शिकायला आलेली, वागायला थोडीशी कपटी, स्वार्थी. आरती ही तिच्या स्वतःच्या विश्वात रममाण राहणारी, पण मित्रांत मिसळणारी, वंदना एकदम साधी, दिसायला इंद्र्लोकीच्या अप्सरेची उपमा द्यावी अशीच. नितळ ललना, गोरीपान मुलगी होती वंदना, तिच्या सौंदर्याचा मुलींना हेवा वाटायचा, तर मुले मात्र पाहूनच लट्टू होत असत. इथे या मैत्रांतही थोडीफार तीच परिस्थिती काही अपवाद वगळता. पहिल्या दिवशी दक्षची कुणाशी खास अशी ओळख झाली नाही, तेजस सोडला तर. रोशन एक गुणी मुलगा म्हणावा तसाच होता, म्हणजे दिसत तरी तसा होता.

रेणुका अत्रे या पन्नाशीच्या आसपास असलेल्या, पीएचडी प्राप्त प्राध्यापिकेच्या अखत्यारीत असलेल्या पत्रकारिता विभागात पहिल्या वर्षाला सुबोध आणि इतर मित्रमंडळी शिकत होती. एम जे एम सी पार्ट १ असे कधी ही न ऐकलेल्या कोर्सला या सगळ्यांनीच प्रवेशपरीक्षा, मुलाखत देऊन प्रवेश मिळवला होता, या वरवरच्या उपचारांची यांच्यापैकी कुणालाच गरज नव्हती, पण तरीही ही सगळी मंडळी पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव झळकावत या कॉलेजमध्ये दाखल झाली होती.  अत्रे या शिक्षिका म्हणून खूपच चांगल्या होत्या. अत्यंत हळव्या मनाच्या असलेल्या, सर्जनशील लेखिका, कथाकार असणाऱ्या रेणुका अत्रे क्वचितप्रसंगी त्यांचा पारा हा चढवत असे, आणि त्यांनी का चढवू नये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणारी मुले ही आता त्यांचीच आपत्ये नव्हती का ? आई-बाबा आणि कुटुंबासाठी व त्यांच्यासाठीच्या असलेल्या  कर्तव्यासाठी अविवाहित राहिलेल्या त्यांनी आयुष्यात  अनेक रंग भरले होते, पुरस्कारांनी, सन्मानांनी त्यांच्याकडे आपसूकच धाव घेतलेली होती, त्या कधी लिहायला बसलेल्या आहेत असे कॉलेजमध्ये तरी घडले नव्हते.
लिहिणारा कधी, कुठेही लिहू शकतो. तरी रेणुका अत्रे यांना वाचलेल्यांना ही स्त्री अभिव्यक्त होताना, कथा रचताना मानवी मनाला स्पर्श करून अनेक क्षण तुमचे मन वजा होत राहते, चिंब होत राहते, कसे काय हे साध्य होत असे प्रश्नाने विचार करायला, रेणुका या नावाला गांभीर्याने घेण्याला भाग पाडले. रेणुका मॅडमची एक खासियत होती, की जराश्या ओळखीवरही, अन विषयापासून खूप दूर असूनही  त्यांना कुणाचे चरित्रही लिहिता येऊ शकत असे, त्या खरंच अफलातून लेखिका होत्या, कल्पनेच्या जगात अत्यंत हृदयस्पर्शी फेरफटका आधी त्या स्वतः, मग इतरांना मारून आणत असे. बोलताना त्यांचे हळवेपण पटकन समजून येत नसायचे.. संवेदनशीलता सहज जाणवू देत नसायच्या त्या.. परंतु त्यांची आदरयुक्त भिती मात्र भोवतालच्या सगळ्यांनाच होती.
___________________________________________________________________________________
काही दिवस उलटले.  सगळ्यांचीच आता एकमेकांशी ओळख होत होती. अन एकेदिवशी काहीतरी नवीन भन्नाट करायचे, अभ्यासा व्यतिरिक्त असे सगळ्या मित्रांचे ठरले. यात कुणाही शिक्षकांचा सहभाग त्यात नव्हताच, ते वेगळ्या कामांत गुंतलेले होते. वर्गाचा दरवाजा बंद करण्यात आला. चर्चेचा मुद्दा काय असावा यावर स्वतंत्र चर्चा सुरु झाली....

दक्ष: अरे, एकदम गंभीरही नको, आणि नेहमीचेच वायफाय  गप्पाही नको...
सुबोध: तू, जरा पटकन, डेफीनेट बोलायला शिक, ए करंट इशू घेवून टाका...
दक्ष: टाकू नका, बोला... आज तुम्हाला बोलावेच लागेल, थांबा जाऊ नका.......
वंदना: साहेब तब्येत बरी आहे ना आपली ???
तेजस: ओ, अप्पा मी काय म्हणतो... द्या विषय सोडून .. आपण काय बोलणार कशावर ..
वल्लभ: ए थांबा, आपल्याकडे भाषणकार, वक्ता मंडळी आहेत तेच बोलतील, काय चर्चा करयची. रिया, होऊ दे तुझं भाषण
रिया: बरं, ठीक आहे पण आपलं दक्ष खूप छान कविता करतो, त्याची एखदी कविता ऐकू या
समीर, सुबोध, राहुल: एय, कवी होऊन जाऊ दे ना एखदी............कविता.
दक्ष: हो, पण आधी रिया काय बोलतेय ते समजून घेऊ ......
रिया: हम्म.... बोलायला तसे विषय भरपूर आहेत. आज मात्र मी मनापासून ‘मन’ याच विषयवार बोलणार आहे. आपल्याशी सतत कुणीतरी संवाद साधतंय असे वाटत असतं, कुणीतरी म्हणजेच आपलं मन. आपलं आपल्या मनाशी कायम संवाद सुरु असतो. कोणतीही कृती, बाहे पडणारे शब्द, उच्चार हे सगळच आधी मनात ठरते मग त्याला मूर्त स्वरूप येते. मन नेमके शरीरात कुठे असते हे शास्त्रज्ञांना अजून कळले नाही. मला वाटते ते न कळण्यातच खरी मजा आहे शरीरातल्या ज्या गोष्टींची स्थाने आपल्याला माहिती आहे, त्यांना आपल्याला जपणे, काळजी घेणे, सांभाळणे ह्या खूप अवघड गोष्टी आहेत, जसे की आपले हृदय. पण मनाचे तसे नाही. मन ही निसर्गाची लाभलेली देणगी आहे. मन माणसाला एकटेपणाची जाणीव करू देत नाही, स्वतःच्या मनाशी बोलत राहिल्याने, शांतपणे मनात विचार केल्याने अनेक गोष्टींचा आपल्याला उलगडा होऊ शकतो. मन हे त्याचे अस्तित्व सृष्टीतल्या सगळ्याच सजीवांना भावनेतून जाणवून देते, भावना निर्माण होण्याचे ठिकाणही मनच आहे. तरी माझ्या मनात काही प्रश्न आहेतच की मन आपल्या ताब्यात कसे ठेवताही येते आणि कधी कधी हे मन बांधता, बांधता सुटून जाते..

किती किती छान बोलत होती ती, ऐकताना बिलकुल कंटाळवाणे असे वाटत नव्हते.  प्रासादिक शब्दांची सुरेख गुंफण... मोजक्या वाक्यरेखांत केलेली, नेहमीच ती  आशयगर्भ विषय मांडणी नेटक्या आणि थोडक्यात सांगून जाते. शब्दप्रभुत्व असल्याने न थांबता अर्थात एकाच मुद्यावर पाल्हाळही न लागता ती ऐकणार्यांच्या मनापर्यंत पोहोचून जाते, बोलणे भिडते, पटते आन आपण तिच्या सुरात सूर मिसळवून देतो, दाखवशील ती पूर्व दिशा असे आपसूक नजरेतून सांगून टाकतो. रसिकांची  उत्कंठा शिगेला पोहोचल्यावर पटकन असे वेगळे वळण देते की समोरच्याला आश्चर्य दाटते. परंतु रियाच्या डोळ्यात चमकतो तो आकाश गवसल्याचा आनंद.
दक्ष या विचारात गढून राहिलेला होता. सगळेच त्यालाआवाज देत होते. शेवटी सुबोधने मागून त्याच्या ‘टपली’ मारली अन तंद्री भंग केली. चला कवी, “आता तुमची पाळी आली”....... जराश्या घुश्यातच (खोट्या)  विनोदाला फाटा देत दक्ष सावरून बसला.  
रिया, तुझ्या विषयावरच माझ्याकडेही काही बोलण्यासारखं आहे.. तर, टाळ्या.......... सगळ्यांनी उत्साहात टाळ्या वाजवल्या, कारण प्रत्येकालाच कविता ही फुलांसारखी नाजूक असणार याची खात्री होती.
मन-मन-मन
कुठे बरं दडलयं मन
तुला काय वाटतं ?
त्याने सगळ्यांना प्रश्न केला
करण्याचा अवकाश की एक क्षणात तिथे कल्लोळ झाला
सगळेच स्तिमित .... पण उत्तर सांगू लागले
“यार” हा प्रश्न खूप गोंधळात टाकतो आहे...
कुणाला टाकतो आहे गोंधळात ? त्याचा पुन्हा प्रश्न
जाणीव कशाची झाली, कुठे झाली झाली, हललं, कुठे लकाकलं, थरथरलं
मग कुणाचा हात मागे गेला केसांच्यावरून फिरत.... कुणी ठोक्यांचा खणखणाट ऐकला, छातीस स्वतःचाच हात ठेवून
डिझाईनमध्ये आहे मन ............तिच्या उत्तररेषा
कदाचित कवितेत असते मन, भुवया उंचावत त्यानेही सांगितले.....अधीर-उतावीळ बनत  नेहमीसारखे
उमटतात मनाच्या पाउलखुणा  शब्द, शब्द कागदावर लिहिला जात असतो तेव्हा .....कोपर्यातून उठलेला आवाज
पण शेवटी प्रश्न तसाच निर्विकार पाहत उभा होता.
कुठे लपलंय मन ? कोण बडबडत राहते आतल्याआत न  कुणीही सांगता, विचार करतो म्हणजे नक्की काय घडते ?
वृत्ती, प्रवृत्ती, सोबत, संगत की अलिप्तता .... छंद, रंग की आयुष्य व्यतीत करण्याचा ढंग
नक्की कशात आहे रे मन ?
कुणी तरी पत्ता शोधून काढा, एखद्या पोस्टमन काकांना विचारा ............
प्रश्न एक होता तो सोडवताना आणखीन प्रश्नवन वाटेत लागले; हे मन तर बांधता बांधता सुटले


जरा वेळ सगळेच शांत होते. दक्षने बघितले सगळे हरवल्यासारखे दिसत होते, पण मग सगळे व्यवस्थित भानावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट केला. मांडला जाणारा मुद्दा हा भलेही अभ्यासाचा एक भाग नव्हता पण म्हणून एकदम चर्चेसाठी नाकारावा असाही त्यात नव्हते, नाकारून वा स्वीकारून काहीही हशीलं नसले तरी अप्राप्य गोष्टींचा वारंवार विचार केल्याने नक्कीच काहीतरी सुगावा लागू शकतो ना.  असे कॉलेज आणि अशी मित्र दक्षला  तरी आयुष्यात कधीच भेटली नव्हती, एकदा हळव्या झाल्या दक्षला पाहून सुशांत, आरती, वंदना यांनी त्याला खूप आधार दिल होता. ज्यावेळेस मनाची दैना होते, वेदना होतात, डोळ्यांतूनच नाही तर मनातून रडू कोसळते ना तेव्हा आधारासाठीचा शब्दही खूप काही समजावून जातो तर, खांद्यावर एक  ठेवलेला हातही तेव्हा बळ देतो. हसायला, आश्रू पुसायला, बोलायला आणि हो नक्कीच......उमेदीला.  
असो, आता प्रत्येकचजण मनाचा असण्याचा थोडा गांभीर्याने विचार करू पाहत होता. एक नवी किरण, नवी दिशा याकडे त्यांचा प्रवास सुरु झाला होता. जरावेल्तरी कुणी बोलण्यासारखे नव्हते, पण आरतीने बाजी मारायचे ठरवले. ती उभी राहिली आणि खूप काही वेगळे आणि आश्वासनीय असे हसु तिच्या ओठांवर उमटलेले सगळ्यांनीच पहिले. डोळ्यांतली चमक ही जगण्यातला आनंद गवसल्याचे ओसंडून जात सांगत होती. तिचा तो उत्साह बघून मग सार्यांनीच जराशी मरगळीची येत असलेली लकेर झटकून टाकली आणि ऐकण्यास आतुर झाले की नक्की ती काय मांडतेय त्यांच्यासमोर.
पण ! इतरांना तिच्या डोळ्यांतला अभिनय कळला नव्हता. ती जो उत्साह दाखवत होती, लागलीच एकदम सगळे चित्र बदलून गेले. तिला खरेतर मांडायचे होते की आपण आज काय करतोय, मन कुठे जातंय, रस्ते आपले बरोबर आहे की नाही..... शिकतोय ते आपल्या आयुष्याला आकार देईल की नाही.
आजवर मनाचा एवढा आंतरिक होऊन एकाग्र होऊन विचार केला नव्हता. बुद्धीप्रमाण मानून आजवर वाटचाल करत आले. मनही एखाद्यासाठी जगण्याचे प्रमाण ठरू शकते यावर विश्वास नव्हता, कुठलीही गोष्ट असो तिच्याकडे फक्त डोकं लावूनच पहिलं गेलंय माझ्याकडून. ती सांगत होती, ते अनेक लोकांच्याबाबतीत असलेले सत्य होते, किंबहुना अंतिम सत्यही तेच असावे मन कधी कधी अयोग्य निर्णय घेऊ शकते, पण मेंदूचे तसे नसते ते विचारप्रक्रियेतून अत्यंत सूक्ष्मपणे विषयाचा तळ शोधत विचार केल्याने अगदी अचूक असे अनुमान लावते. कदाचित म्हणुनच बुद्धिमान लोकं जास्त यशस्वी झालेत जगात..  सगळा  माहोलच बदलला.........  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका