पोस्ट्स

मे, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

‘आँधी’ नवीन वाट दाखवणारी

गुलजार. भारतातील प्रभावशाली कवी, पटकथाकार आणि दिग्दर्शक. गुलजारांनी अनेक सुंदर चित्रपटांचे उंची दिग्दर्शन केले, भावस्पर्शी अशा त्या कलाकृती, त्यातली एक म्हणजे “आंधी”. अजून हा चित्रपट डोळ्यांनी अनुभवण्याची संधी आलेली नाही, आयुष्यातल्या अनेक खंतनाऱ्या गोष्टींपैकी ही एक, परंतु मध्यंतरी “आंधी” सिनेमाची पटकथा वाचनात आली, हायसे वाटले. सिनेमा नाही, किमान पटकथा तरी वाचता आली म्हणून. या पटकथेचा अनुवाद वाचताना भारावलो होतो. एकदा वाचून सोडून दिले असे गुलजारांच्या साहित्याबद्दल घडनेच अशक्य ! सतत ते मनात घोळत राहते, आणि काय बोलायचे ते विसरायला होते. यावरचा एक सहज सुचलेला उपाय म्हणजे लिहून काढणे, जे भावले, मनात तरळून राहिले त्या भावनांची मनातून शब्दांशी सांगड घालून देणे, अन कागदावर त्यास मूर्त रूप देणे, आंधी हे असेच मनात घर करून बसलेली मूर्तीच जणू. आंधी- गुलजार, अनुवाद विजय पाडळकर या पुस्तकात सर्वप्रथम पान उलटताच गुलजार यांनी केलेली प्रस्तावना आपल्यासमोर येते. या दोन पानांच्या प्रस्तावनेतच गुलजार मनात पकड करून बसतात, पटकथा लिहिण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट करताना अगदी निर्मळ, तरल शब्दांतून तो स्पष्ट...

कुटुंबाबद्दल

छोट्या छोट्या गोष्टीतच सुख  असते असे मानणारे फार लोक आहेत. मात्र यांची सुखाची , प्रेमाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्राला मानणारी आहे हेच कळत नाही मुळी. बरं अशा लोकांचा आनंदच इवलासा असल्याने मग इवली जरी जबाबदारी , विवंचना , चिंता अंगावर पडली मग रुई पण अशा लोकांना पर्वत भासते. आपल्या भारतात फार पूर्वीपासूनच कुटुंबव्यवस्था चालत आलेली आहे , जे रूढार्थाने चालत येते त्यालाच समाज आदर्श ठरवतो , आणि मग पिढीदरपिढी हे आदर्श मुल्ये स्वीकारली जातात. परंतु काही.... काही काय प्रत्येकच वेळेस वेगवेगळ्या कुटुंबात विभिन्न सामाजिक , समृद्धी , परिस्थिती , विभिन्न झाल्याने  वातावरणाचा परिणाम आयुष्यात पुढे प्रवास करताना जाणवतो दोन कुटुंबात नवीन प्रस्थापित होणारे संबंध , त्यांच्यात घडणारे नवीन नात्यांचे बदल दोन्ही कुटुंबांना जरी सामान धाग्यात बांधत असले तरीही प्रत्येक कुटुंब आणि त्यातील व्यक्तींनी आपापल्या परीने  जीवन पाहिल्याने समोरील कुटुंबाकडून असलेल्या स्वाभाविक अपेक्षा तितक्याच स्वाभाविकपणे फोल ठरतात. कधी कधी एकमेकांतील कौटुंबिक संबंधतेच्या आधारावारचे ,  पारंपारिक, वृद्धिंगत निकष लक्षा...

असतंच असे नाही

प्रेम कविता करणाऱ्याचे ' प्रेमाशी ' विरह रस पाजनाऱ्याचे ' विरहाशी ' सावली देणाऱ्या झाडाला तोडले म्हणून झाडांवर कविता करणाऱ्या ' सामाजिक कवीचे ' झाडांशी बारबालांचे डान्सशी भीक मागत्या चिमुकल्यांचे ' पैसाशी ' वाचणाऱ्याचं लिहिणाऱ्याशी तर डोळ्यांशी हलकीशी उघडझाप तू करताना , माझ्या हृदयाच्या वाढलेल्या ' धडधडीशी ' दरवेळी एक वेगळ नातं असतंच असे नाही " भाकरी भाजणाऱ्या हाताचा गंध आणि कष्ट उपसलेल्या घामाचा थेंब याचं मात्र नातं असतं चिरकाळाचं बाकी मग शेतकऱ्याचे आणि सुखाचेही चिरकाळ नातं असतंच असे नाही © विशू

विराणी

इमेज
तुझावर चांदणे हे भाळले, होते कितीदा  सखे तू मोगर्याला माळले होते कितीदा कसा प्रेमात भिजलो चिंबलेल्या  सांजवेळी सकाळी पावसाला टाळले होते कितीदा वळूनी पाहता पुन्हा दिलाला बहर आला  जरी विरहात त्याला जाळले होते कितीदा तुझ्या डोळ्यांतल्या रे तारकांना, भूलताना असे रे स्वप्न माझे गाळले होते कितीदा विराणी एकटी होती उभी घाटावरी या  नदीशी भेटणे तू पाळले होते कितीदा विशू

मुंबई

इमेज
लगालगा  लगागागा लगालगा लगागागा(ज्युलियन बहर) मुंबई कधी कधी असे घडते घडू नये असे घडते हसू खुलून ओठी पण... हसूत दुख रे लपते......\\धृ\\ अबोलसे वळण घेते अवचित जिंदगी अपुली मनात उमटल्या शल्यास, बोल मौन का फुटते कठोर वेदना अलवार टोचती फुलांवरल्या दवात ओघळूनी थेंब मोतिया मनी सलते हसू खुलून ओठी .......................................\\१\\ मिटून घेतले डोळे मिटून मन कसे घेवू थमून श्वास जातोच साठवण न ती थमते दिसून येत नाही चेहर्यात, माणसे शोधा सपाट चेहर्यावरती सुसाटशी गती दिसते हसू खुलून ओठी .................................\\२\\ असे तसे कधी घडते तसे बरे कधी घडते जुळून एक गाठीशी तुटून ही बया जुळते........................\\धृ२\\  विशू 

लपवलेलं जग

इमेज
                                                  लपवलेलं जग त्याचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आयुष्य सोबत घालवण्याच्या आणाभाकाही त्यांनी नदीच्या तीरावर तासंतास एकमेकांच्या हातात हात घालून घेतल्या होत्या. ठरवलेच आहे एकुलत्या एका मुलीने तर होवूच दे मनासारखं त्यांच्या असे म्हणून तिच्या घरच्यांनी हे लग्न आनंदाने स्वीकारलं. परंतु खाष्ट, दुसरा शब्दचं समर्पक वाटू नये अशा स्वभावाच्या त्याच्या आईला काही मुलाचे हे उथळ आणि थेरं करणे पटलेच नव्हते आणि हे त्याच्या आईने घरातल्या इतर मंडळीसमोर कबुल केले होते. चालीरीती, परंपरा, रिवाज यांचा हायब्रीड भोपळ्यापेक्षा अवजड, ढबुला असा पगडा त्याच्या आईच्या डोक्यावर बसलेला होता, तिचा आत्मसन्मान दुखावालाच नाही तर ठेचलाच गेला होता, आता ती डूख धरून बसलेली जहरीली नागीणच जणू झाली होती. मात्र याचा अर्थ तिने लग्नाला विरोध केला असे मुळीच नाही. चार पाहुण्यांशिवाय हे लग्न बिना साग्रसंगीत असे पार पडले होते, पण आता चेंडू सासूबाईच्या कोर्...

मर्मबंध

इमेज
मला माझाच स्वतःचा राग येत होता.  एकतर माझे मन आता ऐकवत नव्हते, जसा, जसा उशीर होत होता, तसे ते बेफिकीर, उदान घेऊ पाहत होते, मात्र मागे माझीच माणसे थांबली होती., कदाचित मला डोळेभरून पाहत होती, मी कधीही त्यांच्यापासून एकट्याने एवढा दूर प्रवास केला नव्हता ना, त्यामुळे एक काळजी, माया, ममता सगळेच आर्त भाव मला त्यांच्या डोळ्यात साठलेले दिसू लागले होते.. एकीकडे त्यांचे माझ्यासाठी गहिवरून येणे होते आणि एकीकडे होते माझ्या मनाचे भिरभिरणे. मला विचार करून इतकं अस्वस्थ व्हायला झाले की हे लोक असे कितीवेळ ताटकळत उभे राहतील ? त्याने माझ्या मुक्त, स्वच्छंद जगाचा नीट आनंदही मी उठवू शकत नव्हतो, अन पुन्हा मलाही त्यांची ओढ लागायची, मध्येच मग त्या वेळेचं, आपल्या माणसांचं तिथेच थबकनेही खटकायचं, कधीकधी विचार येऊन जायचा, आपण खरंच दूरवर(टूरवर) निघालोय खरं, मात्र सगळ्यांना सोडून जाताना कापरी स्पंदने विचार करायची जे होतेय ते चूक, अपराध, गुन्हा तर नाही ना... कारण माझ्यासोबत माझ्यावर प्रेम करणारी माणसे होतीच पण रक्ताच्या नात्यांची ओढ, त्यांची ममता यांना तोड ही नसतेच ! किमान ज्यांना ती असतात त्यांना तरी. येणकेन स...

हरविलेल्या काचांचे तुकडे....

इमेज
जेव्हा कधीही व्यक्तीचा प्रवास सुरु असतो, असा प्रवास जो बहुकाळ, लांबच्या अंतरापर्यंत असतो तेव्हा अस्थित असे काहीही नसतेच मुळी. ना आपलं शरीर   स्थिर असते, न आपल्या आजूबाजूची शरीरे स्थिर असतात, असते ती फक्त गतिमानता, ती गतिमानता जी चळाचळा कापत सुटते, ग्लानी चढून आलेले, थकलेल्या आपल्या मनाला, एकेक मनाचे तुकडे करून उधळून   टाकत जात असते त्यांना मनाच्याही खोल असलेल्या दरीत, हो नक्कीच आजूबाजूस कितीही गोंगाट, अन घामाचा मेणचट वास असला, कुठे दारू, सिगारेट, कांद्याचा दर्प भणभणता असला ना तरीही प्रत्येकाला,अगदी प्रत्येकाला नोस्तेल्जिक व्हायला होतेच   ! मला आठवते, स्पष्ट आठवते, मी सातवीत गेलो तेव्हा शाळेत नवीन रंगरंगोटी झालेली, आता परवाच जेव्हा वर्दळीच्या महात्मानगरपासून, मग मी दलित वस्तीच्या कलानगर, मग कामगार नगर असा आडवाटेचा प्रवास करून शाळेच्या बाहेर असलेल्या रस्त्याने लागलो तेव्हा ती, आमची जोडीची साखळी पळताना दिसली, विहिरीच्या कडेला डब्बे खाणारे शेंबडी पोरंही मला हात हलवून टाटा करत होती, मला दिसले की कसे मग जोड्या तूटताच एखादा बिचारा जोरदार  मार खावून घ्यायचा, अगदी कधी कधी मार...