छोट्या छोट्या गोष्टीतच सुख असते असे मानणारे फार लोक आहेत. मात्र यांची सुखाची, प्रेमाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्राला मानणारी आहे हेच कळत नाही मुळी. बरं अशा लोकांचा आनंदच इवलासा असल्याने मग इवली जरी जबाबदारी, विवंचना, चिंता अंगावर पडली मग रुई पण अशा लोकांना पर्वत भासते.
आपल्या भारतात फार पूर्वीपासूनच कुटुंबव्यवस्था चालत आलेली आहे, जे रूढार्थाने चालत येते त्यालाच समाज आदर्श ठरवतो, आणि मग पिढीदरपिढी हे आदर्श मुल्ये स्वीकारली जातात. परंतु काही.... काही काय प्रत्येकच वेळेस वेगवेगळ्या कुटुंबात विभिन्न सामाजिक, समृद्धी, परिस्थिती, विभिन्न झाल्याने वातावरणाचा परिणाम आयुष्यात पुढे प्रवास करताना जाणवतो
दोन कुटुंबात नवीन प्रस्थापित होणारे संबंध, त्यांच्यात घडणारे नवीन नात्यांचे बदल दोन्ही कुटुंबांना जरी सामान धाग्यात बांधत असले तरीही प्रत्येक कुटुंब आणि त्यातील व्यक्तींनी आपापल्या परीने जीवन पाहिल्याने समोरील कुटुंबाकडून असलेल्या स्वाभाविक अपेक्षा तितक्याच स्वाभाविकपणे फोल ठरतात. कधी कधी एकमेकांतील कौटुंबिक संबंधतेच्या आधारावारचे, पारंपारिक, वृद्धिंगत निकष लक्षात न आल्याने एकमेकांतील अचंब्याची भावना वाढीस लागते, कधीही न माहीत असलेल्या गोष्टींशी जुळवून घेणं मग जरा अवघडच वाटू लागतं.
या लेखाइतकीच गुंतागुंतीत कुटुंब, अन त्यातील व्यक्ती फसतात. उभ्या आयुष्यात ज्याची अनुभूती घेतलेली नसते. अशी कोणतीही गोष्ट पचनी पडणे एकदमच अवघड काम. मग उगाच दोन्ही कुटुंबात एकमेकांबद्दल फारसे चांगले समाज निर्माण होत नाही. जेव्हा कोणी अ कुटुंबातून ब कुटुंबात शामील होतो, तेव्हा अ कुटुंबातील चालीरीती, सवयी, यांच्याशी ताळमेळ बसत नाही, मग ज्याची मानसिकता नवीन बदल स्वीकारणे, शिकून घेणे असे असेल तो पुढील आयुष्यात कुणाला तक्रार करूच देत नाही. पण ज्याला पूर्वीच्या ढंगानुसार त्याची समज एका ठराविक पातळीपर्यंत विकसित झालेली असेल, त्याला मग त्रास होतो, एकतर ती कुणीही अ कुटुंबातून ब कुटुंबात आलेली व्यक्ती तिला जे तिचे विश्व होते तसेच आजही आहे असेच वाटत असते, मग तेच प्रत्येक छोट्या गोष्टीत सुख आणि छोट्या अडचणींचा बाऊ होणे असेल, वागणे, चालीरीती यांबद्दल ब कुटुंबातून जेव्हा ? उठते तेव्हा स्वाभाविकपणे :-D आश्चर्य वाटू लागते, तिकडे ब कुटुंबालाही त्यांच्या नेहमीच्या जगाण्यातील विसंगतीमुळे जी कुणी एक नव्याने प्रस्थापित नातलग आहे, त्याबद्दल, राहून राहून आश्चर्य वाटू लागते, एक खदखद तयार होते, आणि खूप दिवस ती राहिली ना तापत मग एखादे दिवशी त्याचा भडका हा होतोच.
यात मुळात काय हवं ? तर झालेले बदल दोन्हीबाजुच्या लक्षात यायला हवे. त्याबदलाला स्वीकारणारी, पचनी पाडणारी सामंजस्यशील मानसिक स्थिती हवी. समजून घेणारी हीच वृत्ती हळूहळू दोन्ही कुटुंबातील सलोखा तात्पुरता न ठेवता कायमचं सख्य निर्माण करत जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा