लपवलेलं जग
त्याचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आयुष्य सोबत घालवण्याच्या आणाभाकाही त्यांनी नदीच्या तीरावर तासंतास एकमेकांच्या हातात हात घालून घेतल्या होत्या. ठरवलेच आहे एकुलत्या एका मुलीने तर होवूच दे मनासारखं त्यांच्या असे म्हणून तिच्या घरच्यांनी हे लग्न आनंदाने स्वीकारलं. परंतु खाष्ट, दुसरा शब्दचं समर्पक वाटू नये अशा स्वभावाच्या त्याच्या आईला काही मुलाचे हे उथळ आणि थेरं करणे पटलेच नव्हते आणि हे त्याच्या आईने घरातल्या इतर मंडळीसमोर कबुल केले होते. चालीरीती, परंपरा, रिवाज यांचा हायब्रीड भोपळ्यापेक्षा अवजड, ढबुला असा पगडा त्याच्या आईच्या डोक्यावर बसलेला होता, तिचा आत्मसन्मान दुखावालाच नाही तर ठेचलाच गेला होता, आता ती डूख धरून बसलेली जहरीली नागीणच जणू झाली होती. मात्र याचा अर्थ तिने लग्नाला विरोध केला असे मुळीच नाही. चार पाहुण्यांशिवाय हे लग्न बिना साग्रसंगीत असे पार पडले होते, पण आता चेंडू सासूबाईच्या कोर्टात होता. त्यांना कसे आउट करायचे याची काहीच कल्पना नसल्याने नवीन आलेल्या सुनेला त्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल सारख्या कर्दनकाळ वगैरे वाटल्या. त्याचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणूनच जान्हवी आणि श्रीला हे सगळंच सहनीय आणि निभावून जाण्यासारखं वाटत होतं. असो, वादळापूर्वीच समुद्रात शिडाची होडी वल्हवणार्या नाविकाला तो जर नवीन असेल तर वाऱ्याच्या वादळी सुसाटाची हळुवार कल्पनासुद्धा नसते, त्या नाविकासारखेच नवखे गाबरू श्री आणि जान्हवी होते.
आजची ही सकाळ सामान्य होती. तुमच्या आयुष्यातली जशी असते ना तशी. लग्नानंतर कुलदैवत दर्शन, हनिमून उरकून आल्यवर, खरेतर धर्म, अर्थ यांनतर तिसरा पुरुषार्थ सिद्ध करून झाल्या घटना उरकून यायच्या नसतात, पण लांबल्या गोष्टी तर काहीवेळा काही लोकांना मुळीच आवडत नाही अन म्हणूनच आईच्या अतिआग्रहाला मान झुकवत नाही तर तोडतच नवीन जोडपी महाबळेश्वरहून परत दक्षिणात्य गंगेच्या तीरावर वसलेल्या ‘हिरवळ’ या त्यांच्या घरी परतले होते. मग ही उगवलेली सामान्य सकाळ ! लुसलुशीत अंथरुणात गुलाबी उबदार चादर घट्ट ओढून झोपलेल्या जान्हवीचा चंद्र तिच्या सासूच्या मनास आकशातल्या चंद्रावरचे काळे डाग सुंदर ललनेला आणि पिवळ्याधम्म सूर्यावर येत असलेळे काळे डाग खगोलाच्या अभ्यासकांना जसे खुपतील तसेच खुपले. पण नुसतेच खुपले नाही तर सलायलाही लागले. एवढं सगळं असूनही सासू तिचे कधीकधी कौतुक, कधी गप्पा-टप्पा, टीव्हीवरच्या मालिका इत्यादी गोष्टी ज्या सुखासुखी नांदणाऱ्या सासूसुनांत असतात तशीच वागत होती. सुनही बिचारी भोळी, जान्हवीच नाव तिचे. वाटायचे की तिच्या स्वभावाने सासूच्या वागणुकीत अगदी मलईदार, मृदू बदल घडला आहे. पण डूख भरून बसलेल्यांचा भरोसा दयायचा नसतो याची तीला कल्पना असती, तर ती जान्हवी कसली. श्री बिचारा भोळासांब, आई त्याच्या दृष्टीने चांगलीच होती.
सगळ्यांचे आयुष्य असे विविध भावनांच्या भरात चालू होते. एकेक दिवस वेगळं काही घडवत नसे. पण एकदिवस दूध उतू गेलेच, दावी पापणी फडफडलीच, सूरांतील आरोह- आवरोह चुकले श्वासांच्या मात्रा. चळचळ करणारी पाने लहू लहू लहू असे प्रतेक ओळींवर चिरखडू लागली, लालबुंद माखून गेलीत सगळीच खोलीतल्या सागाच्या कपाटासह. प्रसंग असा बाकाच नव्हे तर पाठी खालचा स्नायुनाचा बाकडाच फ्रॅक्चर करून टाकणारा घडला होता. या प्रसंगाचा परिणाम अति दूरपर्यंत साऱ्यांचीच आयुष्ये भिरकावून देणार होता. याचे नक्की काय कारण घडले होते ? अगदी सुचण्याच्या विस्तारलेल्या कक्षा इतक्या रुंद होतात की काय लिहावे हे कधी सुचत नाही आणि लेखक, एकाच मुद्द्याला गोलगोल फिरवत राहतो, एकाच विहरीत स्वतःची मौत चुकवत एक बाईकस्वार फिरत असतो तसा.
नवीन घर घेतल्यावर आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतो असे इतरवेळी न भूतो न भविष्यती अशा गर्विष्ठ अविर्भावात ओरडून सांगणाऱ्यालाही घरातील संस्कार म्हणून वास्तुशांती पूजा थाटावीच लागते, त्यामुळे पै-पाहुणे लांबलांबून घरातील गॅसची बचत करण्यासाठी येतात, काही घरातील चूल पेटवण्यासाठी. असेच पाहुणे आले असताना श्रीच्या आईने जान्हवीच्या लाडक्या सासऱ्यांच्या, पाहुण्यांच्या देखत सून बाईची अगदी अघोरी स्तुती करायला सुरुवात केली. सारे जग फिरवून आणले, गोल पोळ्या खाऊ घालण्याच्या नावाखाली इथून सुरुवात झाली. भांडे घासताना जसे साबण लावायचे लक्षात राहते तसे तो लावलेला साबण घासून भांडे धुवायचे असते हे मात्र कसे विसरायला सुनेस होते असा प्रश्न सासूबाई श्रीस विचारत होत्या. भोळसट असलेली व्यक्ती असते, पण तिच्या भोळसटपणासह मूर्खपणाही मह्राहून येताना ही घेवून आली आहे, असे तिच्याच तोंडावर डोळे वटारून पाहत सांगितले. अन, शेवटी फणा काढत. खोलीच्या मधोमध उभ्याने सून कशी लोळत असते असा उद्धार केला. एक नाही पण भाराभर निंदेच्या बाभूळ शेंगांनी जान्हवीच्या हृदयाला आरपार भोके पाडली, कधीही भिली नसलेल्या सापानेच दंश केल्याने ती आता रागारागातच घर सोडून निघून गेली.
श्री मात्र या मानसिक आघाताने पार कोलमडून गेला. कुठलीच, काही कल्पना नसल्याने घडल्या प्रकाराचा त्याने धसका घेतला होता. आता समोर येणाऱ्या कोणत्याच गोष्टीवर तो विश्वास ठेवायला कचरायला लागला. काळजात खोल कुठेतरी वेदना त्याला जाणवू लागल्या. आपल्या लेकाची या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत म्हणून श्रीच्या आईवडिलांनी गावी मुक्काम हलविला. आता आयुष्यात आणि घरात एकटा श्री च राहायचा. त्यांचे घर शृंगार अपार्टमेंट मधील २बीएचकेचं घर, तेच सोडून जान्हवी तिच्या माहेरी टुमदार घरात राहायला निघून गेल्याने, एकाकीपणा श्रीच्या सोबतीस निवाऱ्याला आला होता.
हा एकाकीपणा, एकलतंद्री मोडत नेहा आली. नेहा श्रीची कॉलेजकाळातली मैत्रीण होती, कॉलेजनंतर नेहा आजच श्रीला दिसली, ते ही त्यांच्याच इमारतीत सामनासह, पण ती अशी अचानक राहायला कशी आली ? ते, ही आपल्याच बिल्डींगमध्ये हा प्रश्न श्रीला पडला, असो.. तिचे सामान शिफ्ट झाल्यावर तीला भेटण्याचे त्याने ठरवले, आणि सिगारेट शिलगावली. लाईटच्या मंद उजेडात तो आता सिगारेट ओढत बसला. हल्ली घरात जास्त स्मोक करायला लागलेला. असेच तीन महिने गेले.
अन्न शिजवून, जेवण केल्यावर तो आता नेहाकडे जातो. ती काहीश्या उदास नजरेने त्याचे स्वागत करते. दोघेही कॉफीचा मग हातात घेउन बोलण्यासाठी घराच्या बाल्कनीत येतात. गार वारा सुटलेला असतो, चतुर्दशीच्या चंद्राने आकाश उजळून टाकलेले होते. उन्हाळयाचे दिवस असल्याने जरा निरभ्र आकाशात तारेही चमचमताना दिसत होते. आता दोघांनाही मौन तोडायचे ठरवलेच, आणि श्रीला काहीही समजायच्या आतच ती त्याला घट्ट बिलगली. तिच्यावर आलेल्या परिस्थितीचे करुन्कारी वर्णन ती त्याला गोष्टीरूपात सांगत होती. सर्व काही सुरळीत चालू असताना, चार महिन्याची गर्भार असताना एका भरधाव ट्रकने तिच्या नवर्याला उडवून दिले, नेहालाच भेटण्यासाठी रस्ता ओलांडत होता, पण नियतीने त्यांचे आयुष्याच काय, पार जग ओलांडून त्याला दूर कुठेतरी फेकातून दिला होता. सारे काही सांगताना घळाघळा आश्रू ओघळायचे मुळीच थांबत नव्हते. श्रीलाही मग भरून आले विशाल सागराच्या किनारी एकटाच चालत असताना, अवचित येऊन कुणी सोबती मग भिडवा असे त्याला वाटून गेले. नेहासमोर त्याच्या घरची गीतही त्याने वाचून दाखवली.
आणि एका बेसावध क्षणी त्याच रात्री, त्याच घरातल्या नेहाच्या खोलीत, श्री आणि नेहा एकमेकांवर कामारूढ झालेत. एवढे दिवस नाही म्हटलं तरी सगळ्याच प्रकरच्या सुखास त्याचा आत्मा आसुसला होता, नेहाही नवरा गेल्यापासून एकटी होती. ती रात्र, चांदण्यांनी मंथरलेली अशी, प्रणयाच्या डोहात श्री आणि नेहा गच्च भिजत होते, एकमेकांशी शरीरातून बोलत होते, आणि अशातच मग चढणाऱ्या मोगारा रातीत ज्यांचा एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नव्हता, ते एकदम इतके बिथरले कारण बराच काळापासून त्यांचा त्यांच्या जोडीदाराशी तुटलेला संबंध, आपल्या मनाला जशा काही भावना असतात, आणि त्या आपण मुक्त व्यक्त करतो, तसेच काम ही देखील एक प्रकारची भावना असते, अन ती मग जोडीदाराशिवायही अशी परक्या व्यक्तीसोबत उपभोगली तर समाज त्या द्वायींना घृणास्पद नजरेने पाहतो, परंतु अगदी राग, आनंद, दुखः आदी षडरीपुंत काम, हे देखील येते हे जणू विसरून अनैतिक, अनैसर्गिक कृत्य केले असे म्हणून समाज उगीच दुषणे देत बसतो.
श्री, नेहा यांना आता एकमेकांच्या ओढीची आणि प्रेमाची जाणीव झाली होती, सहा महिन्यांपूर्वी विधवा झालेली नेहा आता मागचं विसरून नवीन सुरुवात करायला तयार होती, आणि श्री लाही त्याच्या बायकोचे वागणे, रुसून, रागावून जाणे पटलेले नव्हते, तिच्या घरच्यांनी तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याचेही श्रीला कळत होते, मग त्यानेही आता जान्हवीला विसरून आयुष्यभरासाठी नेहाला पत्नी बनविण्यासाठी मनाची, हृदयाची पूर्ण तयरी केली होती. त्याने घरी तसे कळवले देखील, पण घरच्यांना प्रखर विरोध दर्शवला. यावेळी तर श्रीच्या बाबांनाही त्याचे वागण्यात सुख दिसत नव्हते. पण श्री आणि नेहाचा विचार ठाम होता. आहे तिथेच राहिलो तर आजूबाजूचा दुसर्याच्या स्वातंत्र्याच्या आड येणारा आजूबाजूचा समाज, शेजारी, मित्र, सारेच टोचून टोचून बोलतील, आणि म्हणूनच दोघांनी एक निर्णय घेतला.
नेहाने नोकरी करून थोडेफार पैसे सहा महिन्यात साचवलेले होते, बँकेतल्या खात्यातली सगळी शिल्लक श्री ने गोळा केली आणि दोघेही एका दिवसात ते शहर सोडून. कुठे गेले याचा आजवर पत्ता लागलेला नाही. ते दोघे आयुष्यभराचे सुखी खरंच झाले असतील का ? त्यांच्या “लपवलेल्या जगात” ?
लेखकाविषयी माहिती :
नाव: विशाल लोणारी
पत्ता: मखमलाबाद, नाशिक
शिक्षण: बी.कॉम, एम ए(पत्रकारिता, सत्र २ रे )
व्यवसाय: मुक्त पत्रकार
मोबाईल: ९५२७१३८५०५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा