विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

‘आँधी’ नवीन वाट दाखवणारी


गुलजार. भारतातील प्रभावशाली कवी, पटकथाकार आणि दिग्दर्शक. गुलजारांनी अनेक सुंदर चित्रपटांचे उंची दिग्दर्शन केले, भावस्पर्शी अशा त्या कलाकृती, त्यातली एक म्हणजे “आंधी”. अजून हा चित्रपट डोळ्यांनी अनुभवण्याची संधी आलेली नाही, आयुष्यातल्या अनेक खंतनाऱ्या गोष्टींपैकी ही एक, परंतु मध्यंतरी “आंधी” सिनेमाची पटकथा वाचनात आली, हायसे वाटले. सिनेमा नाही, किमान पटकथा तरी वाचता आली म्हणून. या पटकथेचा अनुवाद वाचताना भारावलो होतो.

एकदा वाचून सोडून दिले असे गुलजारांच्या साहित्याबद्दल घडनेच अशक्य ! सतत ते मनात घोळत राहते, आणि काय बोलायचे ते विसरायला होते. यावरचा एक सहज सुचलेला उपाय म्हणजे लिहून काढणे, जे भावले, मनात तरळून राहिले त्या भावनांची मनातून शब्दांशी सांगड घालून देणे, अन कागदावर त्यास मूर्त रूप देणे, आंधी हे असेच मनात घर करून बसलेली मूर्तीच जणू.

आंधी- गुलजार, अनुवाद विजय पाडळकर या पुस्तकात सर्वप्रथम पान उलटताच गुलजार यांनी केलेली प्रस्तावना आपल्यासमोर येते. या दोन पानांच्या प्रस्तावनेतच गुलजार मनात पकड करून बसतात, पटकथा लिहिण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट करताना अगदी निर्मळ, तरल शब्दांतून तो स्पष्ट केल्याने वाचकाला मजेशीर वाटते, अन्यथा प्रस्तावना म्हणजे ...... याच प्रस्तावनेत गुलजारची पटकथा कशी पूर्ण झाली याचा किस्साही गुलजारांनी सांगितलाय, जो त्यांचे मोठेपण सिद्ध करतो.

‘खुणावणाऱ्या वाटांची कहाणी’ या शीर्षकाखाली विजय यांनी कमलेश्वर यांच्या काली आंधी ही कादंबरी व गुलजार यांची पटकथा यांची रसपूर्ण समीक्षा आपल्याला वाचण्यास देतात. आंधी चित्रपट, त्याची पार्श्वभूमी, त्यातील गाणी, कलाकारांचा अभिनय, या सगळ्यांवर भाष्य करतो, त्यानंतर पाडळकर कमलेश्वर यांच्या ‘काली आंधी’ या कादंबरीचीही सफर घडवून आणतात. पुढील पानांत एकूणच कादंबरी आणि चित्रपट यात असलेले वेगळेपण विजय पाडळकर आपल्याला समजावून सांगतात, या कहाणीच्या शेवटी विजयजी यांनी कादंबरी व चित्रपटातील ‘शेवटावर’ चर्चा केली आहे. कुठला शेवट प्रभावी आहे यावर त्यांचे मत एकंदरच पटण्याजोगे झाले आहे.

मग यानंतर सुरु होते ती खरीखुरी ‘पटकथा’. सदर पुस्तकातील जादुई पाने आपण भरभर वाचून काढावीत इतकी प्रभावित करतात. गुलजार यांनी ही पटकथा लिहितांना चित्रपटाचा ‘स्क्रीनप्ले’ जसा असतो त्या अनुषंगाने लिहिलेली नाही, तर आपण ज्याला ‘सिनेरीओ’ म्हणतो त्या शैलीत गुलजारांनी लेखन उद्धृत केले आहे. साधारणतः चित्रपटातील पटकथेत तांत्रिक गोष्टींची मोठीच भर असते मात्र त्या सगळ्या शुद्धतेला फाटा देत गुलजारांनी कादंबरी लिहिल्याप्रमाणे या पुस्तकात पटकथा लिहिली आहे. या अशा ढंगात त्यांनी लिहिल्याने पटकथा लिहिण्याची वेगळीच धाटणी सगळ्यांसमोर प्रस्तृत केली आहे.

पंच्याहत्तर प्रसंगातून गुलजारमय झालेला आंधी कसा आहे, त्यात काय असे भारावलेपण सामावालेय जे मला त्यावर लिखाणासाठी उद्युक्त करू शकले ? असा प्रश्न जेव्हा मनाला विचारला तेव्हा काहीच उत्तर मिळू शकले नाही. असा बैचेन झाल्यानंतर मग गुलजारांनी पटकथेत रम्यक पद्धतीने जसे आरतीदेवी आणि जे.के यांची आठवणींचा धांडोळा घेत जगण्याची एक पद्धती शिकवली तसेच मी ही करायचे ठरवले. या पटकथे पुरतेच कशाला ? खरंच कधीतरी असे प्रत्येक माणसाने करून पाहायला काय हरकत आहे ? आठवणींच्या फुलांना वेचत मग जाणे, आपल्या आयुष्यातल्या सुखद आठवणींची नेहमी आपल्याला भूल पडायला हवी. अधूनमधून जगलेल्या सुंदर रेशमी क्षणांना आठवून पुन्हा वर्तमानात परतावे, वर्तमानाला जसे गुलजारांचे पात्र धरून चालत आठवणी जागवत राहतात तसेच काहीसे सामान्यपणे औश्या जगताना आपणही केले पाहिजे, गुलजारांची ती गोष्ट रंगवण्याची पद्धत ती कथा ऐकताना, वाचताना समरसून जाणाऱ्याने प्रत्येकाने अवलंबून पाहायला हवी. कदाचित नवीन काही बदल, नव्य गोष्टी हलकेच हातास लागतील, नाही लागल्या जरी निसटून जमिनीवर गेल्या रेतीस पुन्हा पुन्हा उचलणाऱ्या बालपणातील आपल्या निरागस रुपाची जाणीव तरी होईल, एखाद्या लहान मुलाप्रमाणे निखळ, निर्मळ आनंद चेहऱ्यावर, डोळ्यांत चमकून येईल.

आजच्या घडीला जेव्हा कादंबरीवरून पटकथा लिहिल्या जात असताना, एकाच कथाबीजेवर पटकथा आणि कादंबरी समांतर वेळेने वाढलेले  रोप आहे. कादंबरी ही ललित, वैचारिक अशी असते. त्यातील पात्रांत, प्रसंगात मोठी गुंतागुंत असते. प्रतेक परिस्थितीची लांबी जास्त असते. कादंबरी वाचताना चटकन ती उलगडत नाही, प्रत्येकच वाचणारा कादंबरीशी स्वतःला जुळवून घेवून शकेल असे अपेक्षित नाही.  कादंबरीस शेवट हा कधीही पूर्ण नसतो, अपूर्ण असतो. पाने संपलेली असतात,पुढे कादंबरीकाराने काहीही म्हटलं ही नसतं मात्र आपण वाचत आलेली पात्रे तशीच राहतात आपल्या मनात जिवंत, त्यांच्या अजूनही काही गोष्टी घडू शकत असतील, वाटते कुठेतरी ते जगत असतील, त्यांच्यासोबत काय घडत असेल ? अशा प्रश्नांची आंधीत जणू आपले मन हरवून जाते, गुरफटते.

पटकथा मात्र कादंबरीसारखी नसते. पटकथा तिचा आकार, वर्ण, अवयव यांची रचना संपूर्णतः अलग असते. नाट्यमयता हा दोघांतला समान धागा असला तरी पटकथेला एक वेग असतो. सुरुवात असते, आणि मग कथामय दळणवळणानंतर शेवट होतो, चित्रपट संपतो, अशी पटकथा असते. नेहमीच्या संपन्न होणाऱ्या पटकथेला संपूर्ण विचार देणारा,  एखादा परिणाम साध्य झालेला शेवट असतो. गुलजारांचा आंधी इथेच वेगळा ठरतो. शेवटी जेकेच्या तोंडी असलेल्या संवादामुळे संपूर्ण कथेला कलाटणी मिळते. तत्पूर्वीच जेकेने आरतीदेवीच्या पराभवाची खात्री देणाऱ्या जेकेच्या वाक्यांच्या अंमलातून आपण बाहेर पडताच असतो, जेकेची खात्री असते आता आरती रक्जारण सोडणार, माघारी येणार, हे सगळे असेच घडणार असे आपल्यालाही वाटते, त्या जराश्या कडू-गोड शेवटाला स्वीकारण्याला मन तयारी पूर्ण करते तोच मग पुढचा प्रसंग पुन्हा मती लख्ख चमकवून टाकतो.

आरतीदेवी यांनी सुरु केलेल्या कार्याला आता विराम मिळू नये, आरतीला यशस्वी झालेल्या पाहण्याची आशा आता जेकेलाही पल्लवित करतेय असे त्याचे म्हणणे खरंच मन सुन्न करून टाकणारे होते, जेकेच्यासाठी. आरतीच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू हे केवळ आणि केवळ वाचकांच्या मनाचे रूपक म्हणूनच या पटकथेत आहेत, असे मी ठाम म्हणतो. पुढे सगळेच चांगले घडत असेल ना हाच विचार या अशा द्वैध निर्माण करणाऱ्या शेवटाला  वाचून येतो.
जेकेचे , आरतीचे एका ‘मोड’, वळणावर भेटणे, दोघांनी मग त्याच जुन्या आठवणींत गुंतणे, अन पुन्हा वर्तमानात येऊन पुढचा निर्णय घेणे, विलग होणे, हे असे सतत घडत असताना, निवडणुकीची रणधुमाळी, दोघांच्या आयुष्यातल्या पुन्हा उठल्या रोमांचकावर वार करत परतवून लावते. या कथेत मुख्य पात्रांच्या सोबतच इतर पात्रांचे संवाद आत्यंतिक परिणाम साधतात. दुरावलेली दोन मने जेव्हा पुन्हा एकत्र येतात अन आनंद घेतात तेव्हा त्यांना विचित्र परीस्थितीतून ढवळून काढण्याचे काम बाकी लोकांनी खूबीने निभावले आहे, मग चंद्रसेन, गुलशेरखान, अग्रवाल, माध्यमं आणि लल्लूलाल  यात महत्वाची भूमिका बजावतात. ही सगळी पात्रे त्यांना एकत्रही आणत असतात, परत घटनाक्रमाने  वेगळेही पाडत जातात, त्यांच्या त्यांच्या जागी, त्यांच्या भूमिकेत जगुनच. यात कुणीही त्या दोघांच्या आयुष्यात सरळसरळ घुसपटत नाही, अपवाद हॉटेलमधील एका प्रसंगाचा, जेव्हा अग्रवाल, लल्लूलाल याच्याकडे आरतीदेवीविषयी अशोभ असे वक्तव्य करतो, त्यावेळी जेकेची संतप्त प्रतिक्रिया आणि मग आरतीदेवींचे निघून जाणे, मग थेट चंद्रसेनच्या जाहीर सभेत त्याच्याच भाषणाचे धिंडवडे काढून जाहीरपाने सत्यकबुली देणे सगळेच विस्मयकारक असते, जनताही आरतीदेवींच्या त्या जाहीर कबुलीने तिच्यावर आणखीनच फिदा होते अन मग चंद्रसेनने आपल्या बाजूस जवळपास झुकवलेला निकाल त्याच्यावरच पलटतो.

भारत देशात होऊन गेलेले, असलेले किती राजकारणी स्त्रिया आरतीदेवीसारख्या धुरंधर आहेत. इंदिरा गांधी यांच्याशी मिळती-जुळती आरतीदेवी आज आपल्या आसपास राजकारण देते आहे का ? आजवरतरी अशी घटना आंधीसारख्या सिनेमातूनच सांगितली गेली आहे. असे वास्तव आयुष्यात असणे शक्य आहे पण तसे सगळ्या जगासमोर दिसणे खचितच अघटनीय, अवर्णनीय. मला तर गम्मतच वाटते, कारण कधी असा विचारच मी केला नव्हता की कुण्या राजकारण्याची अशीही प्रेमकहाणी असू शकते. मुळात राजकारण करणारी व्यक्ती सदहृदयी असणे माझ्या पिढीतील कुणासही वाटणे अचंबित करणारेच आहे. राजकारण करताना हृदयाचा कोण विचार करेल ? सगळे काही लढायचे ते कट डोक्याच्या ताकदीनेच. यातही बुद्धीजीवी राजकारणी भारतात दिसतात, अभावाने. तरीही कुटनीती खेळून डाव साधण्यासाठीची तल्लखता देशातील सर्वच आजीमाजी प्रतिनिधी दाखवतात, संवादफेक, वाचिक, मूक अभिनयाने भूरळ पाडतात. खरेच गुलजारांची आंधी वाचल्यावर नेत्यांची अभिगिरी अधोरेखित झाली. आजवर पाहिलेले राजकारण हे मुळीच समाजकारण नाही ही ठाम समजून आहे, तशीच अजन्मभरची राहणार आहे, पण, परंतु, मात्र

गुलजारांच्या आंधी या सिनेमाची पटकथा विजय यांच्या अनुवादातून ग्रहण केल्यानंतर, तिच्यात बुडाल्यानंतर, राजकीय पार्श्वभूमी, ऊर्ध्वभूमी ठेवून जीवन जगणारे ठरवणारे दोन प्रेमी, पती-पत्नी, राजकारणी समोर आलेत. यत्पूर्वी अशी कुणाही राजकारण्याची गोष्ट माझ्या वाचनात आली नसल्याने या पुस्तकाचे नाविन्य, अप्रूप मला खूप आहे. यातलं सगळंच लेखन मला भावणारे असे आहे.

घुमानला साहित्य संमेलनाच्या साहित्य जत्रेत माझ्यापुढेही  दोन शेवट होते, एक हे आंधी पुस्तक आणि एक नव्या पिढीची प्रगल्भ, प्रतिभासंपन्न अशी ब्लॉगर मनस्विनी.मनाला  रुखरुख लावूनच मी या पुस्तकाची निवड केली. कारण आधीच स्पष्ट केले आहे, गुलजार यांच्याविषयी मनात अतुल्य असा आदर राहूनही ‘आँधी’ बघू न शकल्याने हे पुस्तक घेण्याला मी आगतिक झालेलो, दोन्ही शिडांवर पाय ठेवून सांभाळताना कधी मनाने गुलजार नावाडी असलेल्या शिडीत बसून तिथून निघालो कळलेच नाही.


विशाल लोणारी, नशिक 
९५२७१३८५०५              
  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका