पोस्ट्स

एप्रिल, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

मनाने मनाशी जोडलेले.....

मनाने मनाशी जोडलेले..... एव्हाना कसे असते सगळे काही आवरले, खाणे-पिणे झाले की मी मस्त आणि मस्ट अशी ताणून देत असतो. आताही तसेच करायचे होते परंतु त्याला वाव मुळीच नव्हता. माझ्याच राज्यात,विश्वात मी माझ्यासाठी जरी होतो तरी माझ्याबाहेर जो धुमाकूळ सुरु होता त्याला मात्र माझ्याशी माझ्या वाग्न्याशी काहीही देणे घेणे नव्हतेच ना, म्हणून माझ्याशी भांडून मी बाहेर पडलोच आणि ....... मोकळी हवा स्पर्शून गेली ... अहाहा किती सुखद, जाणीवांनी अलवार जाणीव मला वार्यांची जाणीव करून देत होती. अलबत ! ती उकाड्याची आहे त्या झुळूकेतही उष्मा आहे हे मला कळून आले. सर्वत्र निखारे निखारेच दिसत होते, माझे लक्ष आजूबाजूला गेले. इथे आता मी एकटाच होतो (पुन्हा?) नाही, मी सगळ्यांच्यासोबत होतो खरा पण बाहेर य्वून उगाच एकटेपणाला शिलगावत राहिलो, आणि मग आपसूकच केसांतून हात फिरवत मग मी बाहेरील दृश्याचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर डोकावू लागलो. ती आतोनात अगम्य, गूढ अर्थ सांगणारी पण सारे जग कापून काढेल अशा आवेशात पुढे सरकणारी धडधड सुरु होतीच. पण बघावी नवे उमल जणू या विचारानेच मी बाहेर डोकावले तर झरोक्याच्या अल्याड नी ...

गझल

गझल रंगात रंग साऱ्या मिसळे कधीकधी जग हे मुजोर बेरंग छळे कधीकधी डोळ्यात शोधताना हरवायची जिथे देहात तेच काळीज जळे कधीकधी पाहून हाल ज्यांचे रुखरूख व्हायची त्यांनीच टोचले हाय खिळे कधीकधी आनंद झूल झुलवी मज जो नभावरी दु:खे तशीच मज भेट मिळे कधीकधी कोणास काय स्मरते विसरून माणसा जातीस मोडलेल्यास गिळे कधीकधी विशू

गाज

तुला  बघू कि बघू समुद्राची गाज एकच पडलेला प्रश्न …………। दोघेही माझ्या मैत्रिणी …………। अगदी खास दोघींचाही आहे फेसाळ शुभ्र साज सांग ना, तुला बघू कि बघू समुद्राची गाज विशू 

ओरिगामी- एक समृद्ध कला

इमेज
एका चौरस कागदाचे तुम्ही काय कराल ? कुणी म्हणेल त्यावर हिशेब लिहू, यादी लिहू, किंवा सगळ्यात चांगलं चोळामोळा करून फेकून देवू. पण टोच कागद त्याला कुठेच न कापता, कुठे न चिटकवता त्यातून एक आकर्षक असे फुल, बॉल, प्राणी, पक्षी तयार करता आले तर ? किती मोहक, आकर्षक असेल ते पाहणंही. काय आठवला तो कार्यानुभवाचा तास, हे सगळे करायचो आपण, ओरीगामितून. एखादा कागद, न कापता, न चिटकवता त्याला फक्त घड्या घालून एखादी सुंदर, मोहक अशी कलाकृती तयार करता येते, ओरीगामित   कागदाला घातलेल्या वेगवेगळ्या घड्यांमुळे प्राणी, पक्षी, फुले, आर्किटेक्चर्स, बॉल आणि अन्य भौमितिक आकार त्रिमितीय स्वरूपात बनवता येतात, चित्रात ज्याप्रमाणे आकृतीत दोन बाजू दिसतात त्याप्रमाणे अधिकच वास्तववादी कलाकृती ही ओरीगामित बनते, ज्यामुळे तिचं रुपडं हे अधिक आकर्षक, देखणे दिसते.  कविता करणे असो, संगीताची चाल बंधने असो, नृत्य असो किंवा एखादी जाहिरात निर्मित्ती असो या सगळ्यांत एक गोष्ट कटाक्षाने पाळली जाते, जपली जाते ती म्हणजे त्या कलेचे सौंदर्य आणि ओरीगामितही जपानी कलाकरांच्या पूर्वजांनी हा नियम या कलेसाठी लागू केला आहे. सगळं काही तर्क...

आई ...........

आई आ ई ....... तुझ्यासाठी शब्दांची माळ ओवू  कसा  तुजवरच्या प्रेमाला कवितेत, मी गुंफू कसा तू दिलेस मला इतके, आजवर.... मी हट्ट केला तेव्हाही...... मी मागितले नसेन तेव्हाही डोळ्यात पाणी, गळ्यात हुंदका दाटून येई हृदयात माझ्या डोकावता, मन सुन्न होऊन जाई मायेने जेव्हा तू हसून माझ्याकडे  पाही................. डोळ्यातले  अश्रू  गळताना, ओठ आर्त पुकारी ........ आ ई माझ्यासाठी किती कष्ट सोसले उपाशी निजून तू मला पोसले रात्र रात्र जगुन काढली .... मी तळमळू नये म्हणून .... काट्यांवर चालून तू  धरलीस पाखरावर फुलवाई काळीज पिळवटून टाकता,  हुरहूर लागून राही प्रेमाने जेव्हा तू जवळ घेई............... अंतरात  गहिवर दाटताना, जीवनी थरथर गाई ......... आ ई मी कितीदा चुकलो मी शरम सोडून वागलो तुझी माया परि कमी झाली नाही ..... कायमसाठी तू मला दूर लोटले नाही ........ माझ्या भाळी दुर्दैवाची  लागली होती फेरी  कसा बरे झालेलो माझाच मी वैरी दूर तुला करून गेलो...........  आई परि मला जवळ घेतलेस, थोर तू गं  बाई आठवांची त्या उन्माळी येता सांग कसा होऊ उतराई .............

प्रेम कविता

इमेज
अनिमीष वाट ह्रदयात तेवूनी दिवा प्रीतीचा तुझ्या  तुज भेटण्यासाठीच जगले, अश्रू पिउन आशा कशी विझणार माझी तू सांग ना जर,  आस होती मनाची वाती, बनुन....\\धृ\\ झाले सितम लाखो धुरा आयुष्यातली सांभाळली रे तुजविना विराणी जगुन ..... नादान मोठे ठरले मला खूळे जाणती तू ना कधी सामोरला परकासा म्हनुण........\\१\\ होता बरे तो चंद्र माझ्या संगे चालला मी ध्यान केले प्रीतशशिरा तुजला स्मरुन आलास नेण्याला प्रियेला साजन तिचा अनिमीष वाटेवर उभी सय हेवा करुन...\\२\\                                                                             विशाल लोणारी

कथासंग्रह परीक्षण

इमेज
माणसं आणि माणसं माणूस काय आहे याचा अंदाज माणसांनाही येत नाही, माणूस ही जातच काहीशी अशी आहे.  आयुष्यात कुणी एक माणूस कस वागेल, बोलेल याचे कोणतेही सूत्र नाही. एकंदरच माणूस म्हणजे एक गूढ आणि अनाकलनीय प्राणी आहे. याच माणसालाही माणसाचे न कळलेले गूढ  सोडवण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणजेच जयंत बेंद्रे यांचा ‘माणसं आणि माणसं’ हा कथासंग्रह. पूर्वी काही कथास्पर्धांतून पारितोषिक विजेत्या कथांचा हा संग्रह आहे. किशोर चिटणीस,  प्रशांत देशमुख, ययाती, सुवर्णा आदी पात्रांच्या रूपकातून वेगवेगळ्या स्वभावांच्या माणसांचा लेखकाने यात वेध घेतला आहे.  यातील पात्र ही मध्यमवर्गीय , उच्च मध्यमवर्गीय अशी म्हणजेच समाजात  आपल्या आसपास वावरणारीच आहे, त्यांच्या प्रत्येकाची एक कहाणी आहे. गूढ उकलत जाताना नेहमीच वाचक पुढे काय होईल याचा अंदाज वाचक नेहमीच लावत असतात, परंतु त्यांच्या ठोकताळ्यांची माती करत या कथेचा शेवट आपल्या पुढ्यात येतो, अगदी अनपेक्षित असा. कथेतील नायक/ नायिका  ह्यांच्या काही बाजू आहेत, चांगल्या वाईट, यातून पात्र कोड्यात टाकत जाते. लेखक सिनेमा नाटकातील नट होते त्यामुळे प्रत्ये...