मनाने मनाशी जोडलेले.....
एव्हाना कसे असते सगळे काही आवरले, खाणे-पिणे झाले की मी मस्त आणि मस्ट अशी ताणून देत असतो. आताही तसेच करायचे होते परंतु त्याला वाव मुळीच नव्हता. माझ्याच राज्यात,विश्वात मी माझ्यासाठी जरी होतो तरी माझ्याबाहेर जो धुमाकूळ सुरु होता त्याला मात्र माझ्याशी माझ्या वाग्न्याशी काहीही देणे घेणे नव्हतेच ना, म्हणून माझ्याशी भांडून मी बाहेर पडलोच आणि ....... मोकळी हवा स्पर्शून गेली ...अहाहा किती सुखद, जाणीवांनी अलवार जाणीव मला वार्यांची जाणीव करून देत होती. अलबत ! ती उकाड्याची आहे त्या झुळूकेतही उष्मा आहे हे मला कळून आले. सर्वत्र निखारे निखारेच दिसत होते, माझे लक्ष आजूबाजूला गेले. इथे आता मी एकटाच होतो (पुन्हा?) नाही, मी सगळ्यांच्यासोबत होतो खरा पण बाहेर य्वून उगाच एकटेपणाला शिलगावत राहिलो, आणि मग आपसूकच केसांतून हात फिरवत मग मी बाहेरील दृश्याचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर डोकावू लागलो.
ती आतोनात अगम्य, गूढ अर्थ सांगणारी पण सारे जग कापून काढेल अशा आवेशात पुढे सरकणारी धडधड सुरु होतीच. पण बघावी नवे उमल जणू या विचारानेच मी बाहेर डोकावले तर झरोक्याच्या अल्याड नी पल्याड एकच एक उजाड, उदासीनता. झाडेच नाही, जी होती त्यांची पानझड झालेली, कुठेतरी काटेरी झाडे दिसायची ती थोडी बसकी, मध्यम आकाराची गुलाबी फुले त्यावर सृजनतेची ओळीव सुख जाणीव असलेल्या झाडांना पण ती तेवढीच बाकी सारा परिसर विलक्षण उकळत होता, काही क्षणभरासाठी मग माझा प्रवासच थांबला... तोवर सुन्नपणे मी पाहत बसायचो त्याच गुलाबी ताटव्याकडे, तेवढाच तर होता माझ्या तनामनाला थोडासा दिलासा... शीट.... राहून राहून पुन्हा गाडी माझ्याच स्टेशनावर वळवून आणतोय. पण आता रूळ चेंज.
तर, असे एकट्याशी शेवटचे बोलून मी आत माझ्या कमपार्टमेंटमध्ये जाऊन बसलो. सुज्ञ वाचकांनी मी रेल्वेतून माझ्या घरातून प्रवासाला निघालो आहे हे ताडले असेलच. बर्थवर बसल्यावर थकवा जाणवायचाच नाही, कारण इतरवेळी जो थकवा जाणवतो तो आजूबाजूचे सहप्रवासी हे अनोळखी असल्याने परंतु आता जे सोबत होते तर माझेच अपने होते ना. हो ज्यांच्याशी मनाने मनाशी नाते जोडले गेलेले होते, आणि त्यामुळेच त्यांच्यात माझ्यात कोणतीच दरी नव्हती, कोणतेच औपचारिक बोलणे, व्यवहार्य समजून, उमजूनचे नव्हते, किंवा त्यांचे माणुसकीचे वागणे माझ्यासाठी कुठलाही आव न आणताचे होते, तसेच अगदी निरलस, सहज, खरेखुरे आतून, बेबनावी असे नाही हे मी ठाम बोलू शकतो.
कुठलाही प्रवास जर ट्रेनमधून होत असेल तर त्यात गाण्यांशिवाय मजाच येणार नाही. ट्रेनच्या धडधाड आवाजासोबत लागणारे वेगचार्यांचे नाद, सूर, ताल आणि ठेके एकेक ठुमके, लचके सगळे सगळे किती प्रफुल्लतीने परिपूर्ण लगडीतलेले असते, खरंच या अशावेळी उमटणारे गाणे ज्यांना नाहीच मग कुणी कॉपीराईट, रोयाल्टीचा विषय काहीच नसतो, परवा रेडीओत काम करणाऱ्या मैत्रिणीने सांगितले की साठ टक्के गाणी ही वाजवली गेलीच पाहिजेत, आणि जी आपण गाणी वाजवण्याचे हक्क विकत घेतले आहेत ते तितक्या वेळेस ढणढणलेच पाहिजे, मात्र इथे मुक्त विहरणारे कोकीळ गाणी गात होती, मंजुळता यांच्या आवाजात नव्हतीच ती तर आधीच जन्मत होती ज्यावेळी ते गाणे हृदयातून हुंकारत होते, बेधुंद अशा उसाळून शब्दांच्या, संगीताच्या लाटा आमच्या, कमपार्टमेंटमध्ये येऊन धडकत होत्या, आम्हा रानथव्याला चिंब चिंब भिजत त्या गळ्यातून ओसंडत होत्या. फिकीर काय होती की इतरांना काय वाटेल, कुठे कोणी चिडेल ? ते त्यांच्याच भावविश्वात गुंग होते.....
मात्र, कधीच कुणाला एक टिकटिक जाणवली नाही, की खरंच एका वेळ, काळमर्यादेपर्यंत रोजचा संबंध येणारेत आपण काहीजण, आज अचानक एकात एक होऊन गेलोत, कसे काय, कसली ही जादू, मग रोज कशी नाही होत, रोजही कधी सोबत चहा, नाश्ता, जेवण सोबत घेत होतोच की भलेही एकवेळच असेल, मग आज असे काय वेगळे घडले , कुणाची कशाची भीड नाही, ठेवल्या सामानाची रखवाली नाही. मस्तवाल सारेच आपापल्या आवेगात, एकाच जोशात, काय मजा होती ती, काय तो दिवस होता, बाहेरील दृश्य, आतील दृश्य एक मिनिट दोन्ही अगम्य, बाहेर झालेल्या वाळवंटी चित्र, वैफल्य देणारेही होते, तर आतील रोमहर्ष डोळे विस्फारून, मन विस्फारून शरीरभर पसरत जात होता, शेवटी मनातली बाहेर डोकावणाऱ्या खिडकीचे कवाडेच बंद करून टाकली, आणि सरळ घुसमिसळून गेलो कमपार्टमेंटमध्ये उडालेल्या संगीत धुमश्चक्रीत, एका एका शब्द, अक्षरापासून रोजचे अनेक नवे अर्थ पुरवठा देणारी वाक्ये बनविणारा मी जेव्हा, तीच अक्षरे आयुष्यातल्याकडे दुर्बल घटकांचा मला थोडातरी विसर पाडायला लावतात, तेव्हा साली जिंदगी आहे तशीच, वेगवान धावावी असेच वाटते ........
आतले, आणि बाहेरचे असे दोन्हीही फॅक्ट्स जेव्हा मनाने मनाशी जोडले जातात तेव्हाच आयुष्याचा एक नवा, सोनेरी अर्थ कळतो, कसा, आनंद देणारी फॅक्टवर क्लिक केल्यासच... आहेत ना डोक्यात मेंदूचा किस पडणारे, ताण करणाऱ्या गोष्टी पण जरा त्या विसरून पहिल्या तर...........!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा