विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आई ...........

आई
ई ....... तुझ्यासाठी शब्दांची माळ ओवू  कसा 
तुजवरच्या प्रेमाला कवितेत, मी गुंफू कसा
तू दिलेस मला इतके, आजवर....
मी हट्ट केला तेव्हाही...... मी मागितले नसेन तेव्हाही
डोळ्यात पाणी, गळ्यात हुंदका दाटून येई
हृदयात माझ्या डोकावता, मन सुन्न होऊन जाई
मायेने जेव्हा तू हसून माझ्याकडे  पाही.................
डोळ्यातले  अश्रू  गळताना, ओठ आर्त पुकारी ........

माझ्यासाठी किती कष्ट सोसले
उपाशी निजून तू मला पोसले
रात्र रात्र जगुन काढली ....
मी तळमळू नये म्हणून ....
काट्यांवर चालून तू  धरलीस पाखरावर फुलवाई
काळीज पिळवटून टाकता,  हुरहूर लागून राही
प्रेमाने जेव्हा तू जवळ घेई...............
अंतरात  गहिवर दाटताना, जीवनी थरथर गाई .........

मी कितीदा चुकलो
मी शरम सोडून वागलो
तुझी माया परि कमी झाली नाही .....
कायमसाठी तू मला दूर लोटले नाही ........
माझ्या भाळी दुर्दैवाची  लागली होती फेरी
 कसा बरे झालेलो माझाच मी वैरी
दूर तुला करून गेलो...........  आई
परि मला जवळ घेतलेस, थोर तू गं  बाई
आठवांची त्या उन्माळी येता
सांग कसा होऊ उतराई ............
अंगा अंगा चळचळ दाटे,  रोमरोम फुटुनी गाई .........
आई ......................आई .......................आई ....................आई .................आई


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका