पोस्ट्स

मार्च, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

बहुमाध्यमी पत्रकाराची गरज

इमेज
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र, आता हा स्तंभ, स्तंभ न राहता अवघी एक भव्य इमारत झाली आहे. असे म्हणण्याचा अर्थ हाच की आता, पत्रकारितेच्या आणि पर्यायाने पत्रकारांच्या कामकाजाच्या कक्षा या रुंदावत चालल्या आहेत. वृत्तपत्र, आकाशवाणीबरोबरच आता दूरचित्रवाणी, आंतरजाल (टीव्ही आणि इंटरनेट) या माध्यमांचाही वावर जनसामान्यांपर्यंत पोहोचलाच नाही तर त्यांच्या अंगवळणी पडला आहे आणि म्हणूनच आज भारतातल्या पत्रकारितेत ही एक नवीन गरज निर्माण झाली, ती म्हणजे अपुर्या मनुष्यबळामुळे असेल कदाचित पण बहुमाध्यमांत बहुखुबीने काम करू शकणाऱ्या पत्रकारांची. बहुमाध्यमी पत्रकार ही संकल्पना स्पष्ट करताना माध्यमे कोणती याचा जरा विचार करूया, टीव्ही, इंटरनेट, वृत्तपत्रे, आणि आकाशवाणी, ही ती सध्याची प्रमुख माध्यमे जी माहिती, मनोरंजन आणि बातम्यांच्या जागतिक प्रसारांसाठी कारणीभूत ठरतात. बहुमाध्यमी म्हणजेच या सर्व माध्यमांतून एकाचवेळी प्रसारकाचा अवतार धारण करू शकणारा पत्रकार होय. अशा पत्रकाराने प्रथमतः बातमी गोळा केली पाहिजे मग ती उंची, रुंदीच्या रकान्यात व्यवस्थित संपादित करून घुसडली पाहिजे मग तीच बातमी त्याने सा...

कोळसा ... लोणारी

इमेज
कोळसा, लोणारी   :  वनस्पतिजन्य कार्बनयुक्त पदार्थ  भागशः जाळल्यास किंवा हवेशिवाय तापविल्यास पाणी, डांबर, वायू इ. बाष्पनशील पदार्थ उडून गेल्यावर जो भाग उरतो, त्याला लोणारी कोळसा म्हणतात. सामान्यतः वनस्पतिजन्य कोळशालाच लोणारी कोळसा म्हणतात, परंतु प्रस्तुत नोंदीत वर्णनाच्या सोईसाठी प्राणिजन्य कोळशाचाही समावेश केला आहे. लोणारी कोळशात कार्बन अशुद्ध स्वरूपात असतो. इतिहास   :  लोणारी कोळशाचा वापर ईजिप्शियन व भारतीय लोक फार पूर्वीपासून करीत आहेत. घरगुती कामासाठी आणि धातुनिर्मितीसाठी कोळशाचा वापर कधी सुरू झाला हे अनिश्चित आहे. इ. स. पू. ४००० मध्ये धातुनिर्मितीत उच्च तापमानासाठी कोळशाचा वापर करीत असत. कोळशाचा उपयोग अधिशोषक (पृष्ठाशी संपर्कात येणारे पदार्थ पृष्ठावर शोषून साचविणारा पदार्थ) व औषधात साहाय्यक पदार्थ म्हणून बराच काळ करण्यात येत होता. १७७३ मध्ये शेले यांनी वायूंच्या अझिशोषणासाठी त्याचा उपयोग केला. १८०० मध्ये सर हंफ्री डेव्ही यांनी त्याचा उपयोग विद्युत् अग्रासाठी केला. मध्ययुगीन काळातील त्याच्या वाढत्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड करण्यात आली. विसाव्या शतका...

माणूस उसना घेणे आहे

उफ्फ हो...... झाली उघडली पुन्हा विंडो, पुन्हा तीला त्रास, त्याचाही मेंदू आधी असतोच, आता पुन्हा माझ्यामुळे परेशान... का करत असेल हा ? अरे हे दुसऱ्याला  त्रास देऊन मिळणारे समाधान काय समाधान असते ? बरं याला काही बऱ्या गोष्टी साधायच्या असतात असे नाही.... तरीही विंडो उघडून बघत बसतो, चीठूरे लिहित बसतो, नाहीतर उगाच बसतो कड्या वाजवत, सांगा रे याला कुणी, उठ म्हणून, हवा आडली जाते........ कधी कधी असे होते की ही अशी नको असलेली वाक्ये आपल्याला कुणी बोलत नाहीत, त्यावेळी एकतर रात्र असते किंवा तुमच्या आजूबाजूस माणसेच नसतात. रात्र असेन तर काही विशेष नाही, पण माणसेच नसतील तर ते थोड काळजी करण्यासारखं पण नाही का ? एक ठरावीक वर्तुळ सोडल्यास तुम्हाला कुणीच न ओळखणे हे शुद्ध वेडेपणाचे लक्षण आहे. रात्री असंही फार कुणी बोलत नाही. हो, कारण जेव्हा सुसंस्कृतपणा अंगी बाणलेल्या लोकांच्या गराड्यात आपण राहत नाहीत, किंवा असुसंस्कृत लोकांशी जवळान्वये संपर्क येतो तेव्हा सगळेच गडकिल्ल्यांचे वैचारिक बुरुज ढासळतात. नाही म्हणता, म्हणता बरचं पकवलं का ?तसेही माझे शब्द संपत आलेत. पण शब्द जरी कमी असले तरी मी माणसे जोडायला, व...

तुझ्या आठवणीत ..........विशू

तुझ्या आठवणीत........... जरा ओल पापणीत मनी मेघ हे दाटले...... परी शब्द ओठी अडले घडत होते बरेच काही, अन बाकीही होत्या बऱ्याच गोष्टी परि तूटून पडली विश्वासाची माळ .... विखरून स्पंदने मग साऱ्या चुकीच्याच घडल्या, गोष्टी..... असा बसलोय, कुठलासा दिवसांचा हिशोब लावत चुकले जे गणित माझे  ...............ते ही निघून गेले दिवस जसा विरघळून जातो तुझ्या आठवणीत जरा ओल पापणीत ...... कधी बरसते श्रावणधार...........नेते मज आठवांच्या झाडीत... आजूबाजूचा ताटवा ही पाचोळ्यागत उडू लागतो माझ्याभोवती............... आठवणीत अवचित आकाशला घालून हात.........मी ढग बोलावून घेतो ...... टोचणारे सारे क्षण त्याला, सांगून टाकतो ......ढसाढसा रडतो, माझा माझा पाऊस द्यायला आलेला सुख मला तो, उधार टिपूसं घेउन जातो, माझ्याकडून..... भिजला जो पाऊसढग  माझा............ तो, ही निघून जातो  दिवस जसा विरघळून जातो तुझ्या आठवणीत ,, जरा ओल पापणीत 

पुस्तक परीक्षण

इमेज
भाषेचा प्रसार माध्यमांत चपखल वापर होणे आवश्यक आहे. तरीही माध्यम जसे बदलते त्याप्रमाणे भाषेचा लहेजात फरक पडत जातो. या बदलांबद्दल, भाषेच्या माध्यमांतील वापरांबद्दल सहज समजनाऱ्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक म्हणजे ‘प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा’. ज्याचे संपादन करण्यची जबाबदारी यशस्वीपणे डॉ. भास्कर शेळके यांनी पार पाडली आहे. स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करून माध्यमांत आणि मराठी भाषेसही   अभ्यासपूर्ण योगदान दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये दि.२७, २८ मार्च २०१०रोजी ‘प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा’ या विषयवार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना, माहितीचा अखंड प्रसार जनसामान्यांपर्यंत होत असताना याच विषयवार तज्ञ प्राध्यापक तसेच वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन आणि आंतरजाल या माध्यमांतील तज्ञ व्यक्तींनी अभ्यासपूर्ण संशोधन करून शोधनिबंध सदर केले, त्या शोधनिबंधाचे एकत्रित संकलन म्हणजे हे पुस्तक. मराठी भाषेचा वापर माध्यमांत काम करताना वाचण्यात, बोलण्यात आणि लिहण्यात कसा असावा. बातमीपत्रे...

समुद्रावरची संध्याकाळ

जगण थोडं थोडं सहन करायला शिकलोय मी ! काव्य थोडं थोडं न सुचणारं.... लिहायला शिकलोय मी ! व्याख्या जगण्याची कुणालाही करता आली नाही काव्याची अशी मुळी व्याख्याच नाही ... फुल लुभावण्याचे काम काव्यासाठी करते जगण्यालाही , फुल जगण रे शिकवते.... मी फुलासोबत या राहू लागलोय काव्यातलीच एकं, कल्पक दुनियेत जगू लागलोय. जगण थोडं थोडं सहन करायला शिकलोय मी ! काव्य थोडं थोडं न सुचणारं .....लिहायला शिकलोय मी ! तू ! माझ्यासोबत राहत होतीस खरी ... पण खरंच सांग, माझ्यात किती राहत होतीस ? समुद्र मउलशी वाळूत ही किनार कुणी बांधली असावी ? आयुष्याची ! ती ही संध्याकाळी ! याचा विचार करत होतीस ? नाही रे, टाळता न येणाऱ्या गोष्टींनाही ...मी टाळून दाखवेल असा अटळ निश्चय केला असल्याचे ... आयुष्याला सांगायला जमवलयं मी सुर्कुतली खळीतही हसु उमलताना, पाहिलंय मी मी ! तुझ्याच सोबतच जगायला लागले मी कवितेचं म्हणशील तर, खरं बोलू ? तुझ्या या काव्यातून तुझ्यातच राहते, कदाचित म्हणूनच फुलापेक्षाही तुझ्यातच जगतेय मी !                    ...

Long live……….My मराठी भाषा

(स्थळ: चकचकित ऑफिस, दोन भारतीय मराठी माणसे यांच्यात हा संवाद) मुलाखतकार : नाव सांगा तुमचं ? गंपू        : गंगाराम पुचराट, पण संमदे मला गंपू हाक मारत्यात!, खालच्या आळीतली शिवानी गंगाराम राव म्हणती .......हेः J मुलाखतकार : बरं, बरं विचारेल तेवढेच सांगा, शिक्षण किती झालंय ? गंपू        : हं, आता तुम्हाला वाटेल मी दुपारपर्यंत असंच म्हणेल, पण न्हाय म्या डिग्री होल्ड केलीये हो............ मुलाखतकार : मग भाषा का अशी ? एवढी................ गंपू        : आपली भाषा काढायची न्हाय हं, मराठी शाळा दुरवस्थेत असतील, आपली भाषा माय भाषा........मराठी हाय न्हा, बास ... मुलाखतकार : हो, पण ही नोकरी पाहिजे असेल तर इंग्लिश मस्ट... गंपू        : ए, एकंच गुलाब वापरून आपण दोन गर्लफ्रेंड पटवतो, तर तुझं इंग्रजी झाडायचं काय रे मुश्कील... मुलाखतकार : हाऊ रब्बिश युअर बिहेवियर ! गेट लोस्ट ! गंपू        : केरफुली...... केरफुली बोला  हं माझ्याश...

शूटिंगचा अनुभव

कदाचित पुढील प्रसंग वाचून, काय फेकतोय हा ! अशी प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटेल, मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवणे अवघड वाटेल. तरीही बिनघोर प्रस्तुत प्रसंग हा खरा आहे आणि तो योगायोग नाही बरं का ! पावसाळ्याचे दिवस असतील. पाऊस मुसळधार पडून गेल्यानंतरचे कोरडे, ढगाळ हवामान होते. वारा सुखद आणि आल्हाद गारव्यासह. एके दिवशी रविवारी सकाळी साडे आठ-नऊ वाजेच्या सुमारास बाईक राईडसाठी म्हणून मी निघालो घरापासून जवळच असणाऱ्या आणि नवे नवे डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवत होतो. रस्ता शहरातील  म्हसरूळ आणि गिरणारे यांना जोडणारा होता, या रस्त्यावरून जाताना दरी, मातोरी, मखमलाबाद अशी छोटी  गावं लागतात, माझ्या हिरो होंडा पॅशन गाडीवरून वाऱ्याशी मी बोलत निघालो . व्ह्रूम व्ह्रूम करत फिरताना  रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती नजरेस  पडली. एक दोन साधी घरे, माडाची झाडे, फुलांची शेती, द्राक्षाचे बाग आणि लांबवर असलेले तरी  नजरेत मावणारे हिरवा थाटमाटाचे  डोंगरही दृष्टीत सामावले गेले. मला ते  माझ्यासोबत रहावे असे वाटले, यासाठी त्यांचे  फोटोज काढणे वा शूट करून घेणे...