विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

पुस्तक परीक्षण



भाषेचा प्रसार माध्यमांत चपखल वापर होणे आवश्यक आहे. तरीही माध्यम जसे बदलते त्याप्रमाणे भाषेचा लहेजात फरक पडत जातो. या बदलांबद्दल, भाषेच्या माध्यमांतील वापरांबद्दल सहज समजनाऱ्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक म्हणजे ‘प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा’. ज्याचे संपादन करण्यची जबाबदारी यशस्वीपणे डॉ. भास्कर शेळके यांनी पार पाडली आहे. स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करून माध्यमांत आणि मराठी भाषेसही  अभ्यासपूर्ण योगदान दिले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये दि.२७, २८ मार्च २०१०रोजी ‘प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा’ या विषयवार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना, माहितीचा अखंड प्रसार जनसामान्यांपर्यंत होत असताना याच विषयवार तज्ञ प्राध्यापक तसेच वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन आणि आंतरजाल या माध्यमांतील तज्ञ व्यक्तींनी अभ्यासपूर्ण संशोधन करून शोधनिबंध सदर केले, त्या शोधनिबंधाचे एकत्रित संकलन म्हणजे हे पुस्तक. मराठी भाषेचा वापर माध्यमांत काम करताना वाचण्यात, बोलण्यात आणि लिहण्यात कसा असावा. बातमीपत्रे, मुलाखती, कार्यक्रम सादर करत असताना भाषेचा बाज कोणता वापरावा तसेच माध्यमांचा मराठीत उगम आणि विकास कसा झाला हा इतिहास इत्यांदीबाबींबद्दल तज्ञ प्राध्यापक, मान्यवरांनी त्यांच्या शोधनिबंधातून प्रकाश टाकला आहे.
फक्त पत्रकारितेच्या विध्यार्थ्यांनाच नाही तर मराठी भाषेबद्दल कुतुहूल आणि शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्यांसाठीही या पुस्तकाच्या अभ्यासातून मराठी भाषा ही माध्यमांसाठी सजवताना कशा पद्धतीने ती सजवावी याचे प्रशिक्षण नाही म्हणता येणार पण ओळख नक्कीच करून देते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका