विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

तुझ्या आठवणीत ..........विशू

तुझ्या आठवणीत........... जरा ओल पापणीत
मनी मेघ हे दाटले...... परी शब्द ओठी अडले
घडत होते बरेच काही, अन बाकीही होत्या बऱ्याच गोष्टी
परि तूटून पडली विश्वासाची माळ .... विखरून स्पंदने
मग साऱ्या चुकीच्याच घडल्या, गोष्टी.....
असा बसलोय, कुठलासा दिवसांचा हिशोब लावत
चुकले जे गणित माझे  ...............ते ही निघून गेले
दिवस जसा विरघळून जातो
तुझ्या आठवणीत जरा ओल पापणीत ......

कधी बरसते श्रावणधार...........नेते मज आठवांच्या झाडीत...
आजूबाजूचा ताटवा ही पाचोळ्यागत उडू लागतो माझ्याभोवती............... आठवणीत
अवचित आकाशला घालून हात.........मी ढग बोलावून घेतो ......
टोचणारे सारे क्षण त्याला, सांगून टाकतो ......ढसाढसा रडतो, माझा माझा पाऊस
द्यायला आलेला सुख मला तो, उधार टिपूसं घेउन जातो, माझ्याकडून.....
भिजला जो पाऊसढग  माझा............ तो, ही निघून जातो 
दिवस जसा विरघळून जातो

तुझ्या आठवणीत ,, जरा ओल पापणीत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग