विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

Long live……….My मराठी भाषा

(स्थळ: चकचकित ऑफिस, दोन भारतीय मराठी माणसे यांच्यात हा संवाद)

मुलाखतकार : नाव सांगा तुमचं ?
गंपू        : गंगाराम पुचराट, पण संमदे मला गंपू हाक मारत्यात!, खालच्या आळीतली शिवानी गंगाराम राव म्हणती .......हेः J

मुलाखतकार : बरं, बरं विचारेल तेवढेच सांगा, शिक्षण किती झालंय ?
गंपू        : हं, आता तुम्हाला वाटेल मी दुपारपर्यंत असंच म्हणेल, पण न्हाय म्या डिग्री होल्ड केलीये हो............

मुलाखतकार : मग भाषा का अशी ? एवढी................

गंपू        : आपली भाषा काढायची न्हाय हं, मराठी शाळा दुरवस्थेत असतील, आपली भाषा माय भाषा........मराठी हाय न्हा, बास ...

मुलाखतकार : हो, पण ही नोकरी पाहिजे असेल तर इंग्लिश मस्ट...

गंपू        : ए, एकंच गुलाब वापरून आपण दोन गर्लफ्रेंड पटवतो, तर तुझं इंग्रजी झाडायचं काय रे मुश्कील...

मुलाखतकार : हाऊ रब्बिश युअर बिहेवियर ! गेट लोस्ट !

गंपू        : केरफुली...... केरफुली बोला  हं माझ्याशी..... मराठीतले इतिहासाचे धडे, जरी गाळत असले ना, शासन जरी मराठीस दुय्यम दर्जा देत असेल पण आपल्यासाठी आपली भाषा हीच खरी तुळजाभवानी आहे. रगात तो मराठ्यांचा इतिहास जिवंत आहे म्हटलं...

मुलाखतकार : तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही... तू मराठी मीडीयममधून शिकलास, मी नोकरी देऊ शकत नाही...

गंपू        : ए भाऊ, खाली ये जरा आवाजाने, आता जो बाहेर गेला ना इंग्रजीत फडफडणारा क्रो, त्याच्यापेक्षा जास्त टक्के मार्क्स मला मिळालेत, हे बघ मार्कशीट.

मुलाखतकार : हो, पण तो इंग्रजी व्यवस्थित बोलू शकतो. जे या नोकरीसाठी गरजेचे आहे. आपले कंपनीचे सगळे व्यवहार इंग्रजीत होतात...... अंडरस्टुड

गंपू        : आपल्याला बी येतं न भावड्या इंग्रजी चालता-बोलता ....

मुलाखतकार : हो ते कळतंय, काय बोलत असाल आपण ते, मराठीच एवढ चांगले बोलताय, इंग्रजीचे विचारायलाच नको, आणि इथे चालायला नाही, पळायला लागते.
गंपू        : शट अप मिस्टर पाटील, यु शुड बी फायर्ड फोर युअर ईनटीप्रीटेशन.
मुलाखतकर  : तुम्हाला माझं नाव कसे माहित ?

गंपू         : कारण मी तुझ्या कंपनीचा सिनियर एच आर ऑफिसर आहे.

मुलाखतकार  : सर, तुम्ही ? पण हे असे सगळं का ?

सर         : सखाराम पांडुरंग वीटकर याला, तू फक्त मराठीत सगळं शिकला म्हणून रिजेक्ट केलंस ? मग तो आणि काही असेच तू रिजेक्ट केलेले माणसे मला येऊन भेटलीत. अरे, तू ही एक मराठीच आहेस. एवढ्या लवकर आईला विसरलास. तू काय, चिऊ काऊची गोष्ट विसरलास, इसापनीतीच्या गोष्टी विसरलास, अथर्वशिर्षाचे पाठ विसरलास, शिवाजी महाराज, जिजाऊ, मराठीतले कवी- साहित्यिक, तुकोबाराय... सगळी सगळी सुरुवातीची, बालपणीची संस्कारांची शिकवण विसरलास काय रे ?

पाटील       : नाही सर, पण आपल्या कंपनीतल्या वातावरणामुळे त्या शिक्षणावर, संस्कारांवर माती चढली गेली, मन गंजून गेलं सर या इंग्रजीच्या दमट हवेमुळे... सर, इथे काम करत असताना, इंग्रजी भाषेच्या एवढ्या आहारी गेलो की माझे मलाच कळले नाही, की मी केव्हापासून अशा प्रकारे इंग्रजीचा अट्टाहास धरू लागलो. कंपनी, कंपनीहित पाहताना, मी माझ्यातले मराठीपण चंद्रभागेच्या, गोदावरी नदीच्या काठावरून वाहत्या प्रवाहात कधी विसर्जित करून गेलो, माझे मला जाणवलेच नाही सर.. मी ही जेव्हा तुमच्याकडे नोकरी मागायला आलो, तेव्हा मला तरी कुठे इंग्रजीचा गंध होता, मी तर माय मराठीचे कौतुक सोहळे, ती भाषेतली साहित्यसुमने, कवने, अभिमानाने गात, त्यात न्हात होतो सर. पण मला बदलायला लागले सर, कारण, भाषेवरच्या अतोनात प्रेमाचा समिंदर माझे पोट भरू शकणार नव्हता.

सर       : हो, खरंय, व्यवस्थेचा बळी ठरणे हे आपल्यातल्या आपल्यापणाचा निर्घुण खून करणारे असते. पण मराठी भाषा मागे पाडणारी व्यवस्था ही खिळखिळी करण्याची उर्मी, उर्जा मराठी माणसाच्या मनगटात तप्तावस्थेत असते. पण, आगडोंब कधीच फुटत नाही. ज्वालाग्राहीच्या उसळत्या गर्र्म लाटा मराठी माणसाच्या मनालाच उकळवीत बसतात. ही संयमाची, नाही तर षंढपणाची खून आहे. पटली जरी, ओळखू जरी आली तरी पावले मात्र कधी पुढे पडतच नाही, व्यवस्थेची, इंग्रजाळलेल्या लाकडी ओंडक्यांत आपल्या भाषेच्या खोडातून चंदन उगाळण्याची, हिम्मत कधीच कुणी शूर मराठा करताना दिसत नाही. मराठी, मराठी बाणा हे फक्त स्वार्थापोटी म्हणतात आता लोक. शिवजयंतीला चालणारे ते ओशाळवाणे धिंगाणे. छ्य, बोलायलाही लाज वाटते.
पाटील     :  आणि म्हणूनच मी ठरवलंय. की आपल्या कंपनीच्या मालकांना याबद्दल कळवणार. मराठी भाषेला कमी लेखले, मराठीत शिकले म्हणून दुय्यम दर्जा आणि झिडकारून न लावण्याची. अरे, आजकाळात मराठी भाषेची खरोखर दीन, केविलवाणी अवस्था समाजानेही केली आहे. एकतर आपल्या मुलाने खूप आधीपासून म्हणजेच २र्या वर्षापासूनच शिकायला लागावं इतकी मानसिकता पालकांची बदलली. इंग्रजीचे धडे निट बोलताही न येणाऱ्या तान्ह्या बाळाने कसे घोकावे ? स्पर्धेच्या युगात मूल मागे राहू नये हा उद्देश्य जरी योग्य असला पण प्रत्येक गोष्टीची योग्य रीत, वेळ आहे याचे नव्या पालकांना विस्मरण होते आहे. इंग्रजी शाळेतला मुलाचा अभ्यास त्याला जवळ बसवून, शिकवावाच लागतो, पण नोकरी करणारे पालक त्यासाठी वेळ काढू शकत नाही आणि मग मूल मागे पडत जाते, मानसिक अस्वस्थ होते. पण, मराठीतून धडे असतील तर ते गिरवायला, समजून घ्यायला पाल्यास सोपे जाते. एवढं साध तत्व असते पण भविष्यातल्या स्पर्धेच्या भ्रमाच्या भोपळ्याच्या भीतीपायी पालक गैर्समज  करून घेतात, आणि इंग्रजी शाळा मोक्कार पैसे उकळतात.. सगळं चिंत्य आहे.

सर      : तुझ्यात एवढं बदल होईल याची खात्री नव्हती, परंतु तो निश्चितच स्वागतार्ह आहे. लगेच मालकांना पत्र लिही… हुश्श... काही भास अत्यंत बह्यंकर असतात. काहिली माजवतात विचारांच्या जंजाळात गुरफटताना काळ्या विस्तीर्ण भीतीचे पदर कापरे भरवतात, काळजाचे... आनंदी आनंदच आहे रे आज मराठीसाठी!
पाटील    : कशाची भिती, मी समजलो नाही.... कोणता काळाकभिन्न दलदलडोह तुम्हाला आत खेचतोय...

सर       : आपण जे करू ते आपल्या संस्थेपुरते झाले... या पुढे बसलेल्या आणि इंग्रजीला निर्ढावलेल्या समाजाचे काय...

पाटील    : त्यावर एक होऊ शकते सर, मराठीची मराठीच असणार्या माणसांच्या अंतरात पुन्हा रुज्जीकरण करणे. हे शक्य होऊ शकते जर आपल्या भाषेला आपण जागतिक स्तरावर सन्मानित, कीर्तिवंत बनविले तरच. मराठीतले साहित्यकार, कलावंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, माणसांचा जागतिक गौरव ही जरी आजकाळात नित्याची बाब झाली असली तरी खरी गरज आहे ती आपली भाषा ही किती पराकोटीची समृद्धतेने नटलेली आहे, हजारो वर्षापूर्वीच्या इतिहासाने शृंगारलेली आहे हे जगताला ओरडून सांगण्याची, ते सांगण्यासाठी पहाडात दुमदुमून त्याला खिंडार पाडेल अशा बुलंद हारोळीची आणि त्यासाठी शिवाजी महराजांचे मावळे, वस्न्हाज म्हणून खोटा दिमाख थोबाडावर दिमाखाने मिरवत शिरा ताणत हर हर महादेवाचा गजर करणाऱ्या फौजांची खरी गरज आहे ती भाषेला, आपल्या धमन्यांतून रक्ताच्यारुपात वाहत नव्हे तर सळसळनाऱ्या बलशाली बाहूदंडाची गरज आहे आजाआपल्या महाराष्ट्राला, आणि मराठी भाषेला.

सर      : याची एक चाहूल म्हणून आपल्या राज्यसरकारने मराठीस ‘अभिजात भाषा’ हा दर्जा मिळवून द्यायला हवा... हो ना ?

पाटील   : अलबत, सर माझ्या मनोज्ञ असलेली गोष्ट वाखाणलीत आपण. 
सर     : भाषावृद्धीसाठी आणि मुळात ज्या मराठी भाषेसाठी हा सगळा खेळ मांडला ती महाराष्ट्रात हृदयस्थ राहिली, तिच्यासाठी लढण्याच्या प्रेरणेने लोकमानसात बदल घडला म्हणजे साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली असे म्हणायचे.
पाटील  : नक्कीच, का नाही सर, प्रत्येक मराठी माणूस यासाठी लढा उभारेल. खात्री आहे. गर्व आहे मला मी मराठीतून बोलतो याचा.

(ठरल्या प्रमाणे त्यांच्या मालकास ते मराठीबद्दलची तळमळ आणि रोखठोक भूमिका वदतात, मालकही त्यास दुजोरा देत उपरोक्त धेय्य साध्य करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्याचे कळवतात)

 विशाल लोणारी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका