विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

माणूस उसना घेणे आहे

उफ्फ हो...... झाली उघडली पुन्हा विंडो, पुन्हा तीला त्रास, त्याचाही मेंदू आधी असतोच, आता पुन्हा माझ्यामुळे परेशान... का करत असेल हा ? अरे हे दुसऱ्याला  त्रास देऊन मिळणारे समाधान काय समाधान असते ? बरं याला काही बऱ्या गोष्टी साधायच्या असतात असे नाही.... तरीही विंडो उघडून बघत बसतो, चीठूरे लिहित बसतो, नाहीतर उगाच बसतो कड्या वाजवत, सांगा रे याला कुणी, उठ म्हणून, हवा आडली जाते........
कधी कधी असे होते की ही अशी नको असलेली वाक्ये आपल्याला कुणी बोलत नाहीत, त्यावेळी एकतर रात्र असते किंवा तुमच्या आजूबाजूस माणसेच नसतात. रात्र असेन तर काही विशेष नाही, पण माणसेच नसतील तर ते थोड काळजी करण्यासारखं पण नाही का ? एक ठरावीक वर्तुळ सोडल्यास तुम्हाला कुणीच न ओळखणे हे शुद्ध वेडेपणाचे लक्षण आहे. रात्री असंही फार कुणी बोलत नाही.
हो, कारण जेव्हा सुसंस्कृतपणा अंगी बाणलेल्या लोकांच्या गराड्यात आपण राहत नाहीत, किंवा असुसंस्कृत लोकांशी जवळान्वये संपर्क येतो तेव्हा सगळेच गडकिल्ल्यांचे वैचारिक बुरुज ढासळतात.

नाही म्हणता, म्हणता बरचं पकवलं का ?तसेही माझे शब्द संपत आलेत. पण शब्द जरी कमी असले तरी मी माणसे जोडायला, वाढवायला मी काही हाईगाई करणार नाही. माझ्यातून मला एक्सप्लोर लाख करेल पण मग मला सावरायलाही कुणी पाहिजेच ना, चुकलं तर सांगायला, शिकवायला, माणसे हवीत. माणूस उसना घेणे आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग